शनिवार, २७ जुलै, २०२४

परंपरा

 परंपरा


जुन्या चालीरीती रिवाज

पुढे चालवणे ही परंपरा 

जतन करणे  संस्कृती ला

हीच शिकवण मनी धरा.  १


 रुढी चालीरीती  परंपरांचे

  करतोय आपण जतन

भारतीय संस्कृती  आपुली

आहे   अति पुरातन.    २


साजरे करितो सणवार उत्सव 

 दिसते तयातून रूढी परंपरा

उत्सवातून दिसे समाजप्रेम

 समतेची ध्वजा हाती धरा. ३


किती वर्णावी परंपरेची गाथा

येथेच जन्मले संत, वीर महान

अन् अंतराळात जाणारे शास्त्रज्ञ 

काय सांगावी परंपरेशची शान.  ४


अशी महान परंपरा  भारतीय

असावा मनी सदा अभिमान

साहित्य , कला, क्रिडा ,संगीतात

एक एक चमकते तारे महान.      ५



जुन्या रिती रिवाजात

सामाजिक   करुन बदल

नव्या रितींचे अनुसरण केले

 हे घडले ते ही नवल.             ६



सण वार पारंपारिक 

होतात देशभर साजरे

  होता संस्कार  संस्कृतीचे जतन

दिसती सर्वत्र चेहरे हासरे.            ७



लाभलाय आपल्याला

भक्ती रस साहित्याचा 

 संत वाणीचा वारसा

तोची अमुल्य ठेवा परंपरेचा.  ८


गुरुवार, २५ जुलै, २०२४

कर्तव्याच्या पथावर

*स्पर्धेसाठी*

काव्य पुष्प साहित्य मंच आयोजित 
55व्या पाच दिवसीय राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा 
25/7/24
विषय... कर्तव्याच्या पथावर
शीर्षक.. जाण कर्तव्याची 
...........................
संपताच बालपण 
येते जाण कर्तव्याची 
ऋण असे पालकांचे
ठेवू ध्यानात सदाची.   


समाजात वावरतो
त्याचे पण, देणेकरी 
समाजोपयोगी राहू
कर्तव्याच्या पथावरी

जीवनात निरंतर 
कर्तव्यांची असे रांग
निसर्गाचे संवर्धन 
याला मारु नका टांग

स्वच्छ देश अभियान 
मंत्र ठेवूनी ध्यानात 
आत्मनिर्भरता हवी
बलशाली  करण्यात 

देहातून देवाकडे 
जाता मधे लागे देश
देशभक्ती हवी याचा
मनी ठेवावा संदेश

अशी मौलिक कर्तव्ये 
जरी वाटे खडतर
पाळावीत जीवनात 
कर्तव्याच्या पथावर

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, २४ जुलै, २०२४

अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे


*स्पर्धेसाठी*
मनस्पर्शी स्पर्धा समूह 
मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित स्पर्धा 
5व्या वर्धापन दिनानिमित्त निमित्ताने 
विषय.. *अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे*

अभिमानी नसावे कधीच 
स्व चा अभिमान असावा
भेद जाणू स्वाभिमानी ,अभिमानी
गर्विष्ठ  कधीच  स्वभाव नसावा .



असता स्वभावे स्वाभिमानी
 तयाचाच मान रहातो जगती 
 ताठ मानेने जगणे उचित 
तरच होते जीवनी प्रगती.

अभिमानी नसावे कधीच
गर्वाने   होतो पराजय
बलाढ्य असूनही रावण
मिळवू शकला नाही विजय.

मोडेन, पण नाही वाकणार 
 स्वाभिमानी वृत्ती असावी 
 विनयाने शोभावे जीवनी
पण, लाचारता कधी नसावी.

*अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे*.
याची द्यावी  मनाने  ग्वाही 
मग यश संपादन करण्यात 
कधीच  अडचण येणार नाही.


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
8141427430

मंगळवार, २३ जुलै, २०२४

काव्यांजली. ओल्या तनूवर

 शब्दरजनी साहित्य मंच 

काव्यांजली काव्यप्रकार 

विषय ...ओल्या तनूवर

 शीर्षक. आनंद जाहला 


पाहता पाहता 

बरसल्या मृग धारा 

वाहे थंडवारा

चोहीकडे 


आसुसलेली धरा

ओले थेंब प्राशिता

आसमंती दरवळिता

मृद्गंधाने


सख्या वरुणाने

ओल्या थेंबाने तनूवर

पसरविला बहर

हिरवाईचा


जाहली किमया

पलटली सारी काया

जलधाराची माया

वसुधेवर


बळीराजा हर्षभरे

 उंचावून पाही नभाकडे 

क्षणात शिवाराकडे

आनंदाने 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

प्रवाह

भारतीय कोल्हापूर मंच 
दि 23/7/24
विषय ... प्रवाह 

पाणी असते प्रवाही
कालांतराने जर वाळते 
एका जागीच साचले 
तर डबकं बनते

आपले जीवन पण
सतत  असावे प्रवाहशील 
पुढे पुढे चालत रहावे 
तर होतो प्रगतीशील 

असता प्रवाह पतित
म्हणजे करीत तडजोड 
जीवन होते सुखकर 
प्रयत्नांची असावी जोड


नदी प्रवाहाने येते वहात
आजुबाजुला करते संपन्न 
संस्कृती संस्कार परंपरा
जपतेय, म्हणून मन प्रसन्न 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

भस्मासूर प्रदुषण रोगराई आमंत्रण

 मोर्चा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र 

23/7/24

विषय ...*भस्मासूर प्रदुषण*

              *रोगराई आमंत्रण*

         शीर्षक..जतन पर्यावरणचे


जळी स्थळी सर्वत्रची

*भस्मासुर प्रदुषण*

ठेवा स्वच्छता अन्यथा

*रोगराई आमंत्रण*


करा सदा कटाक्षाने 

निवारण कच-याचे

स्वच्छ देश अभियाना

करा पालन नियमाचे 


वृक्ष देती प्राणवायु 

वृक्षतोड थांबवुया

लावा झाडे सभोवती

वनश्रीला वाढवुया


स्वच्छ राखुनी शहरे 

करुनीया हरित धरा

पटकावू की उच्चांक!

समृध्दीचा वाहो झरा


फटाक्यांच्या आवाजाने 

हवेचे, ध्वनीचे प्रदुषण 

नको -हास पर्यावरणचा

कमी करुयात दुषण


निसर्गाचा  नसे कोप

मानवाचा अती लोभ

प्रगतीच्या नावाखाली

थांबवुया आता क्षोभ.



वैशाली वर्तक 

अहमदाबाद

सोमवार, २२ जुलै, २०२४

चित्र चारोळी


कवी कट्टा आयोजित उपक्रम 
दि 22जुलै,2024
विषय .. चित्र चारोळी
      समजूतदार शेळ्या
शेळ्यांसम व्हा समजदार 
मी लीन होऊन जाते खालून 
 नको भांडण तंटा उगाच 
गुण्यागोविंदाने नांदू जपून 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
8141427430

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...