बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

निशु शब्दिका आस मनीची

आस मनीची
निशु शब्दिका

विठुराया सावळा
तुलसी माळा
भक्ती भावाचा
सदा दाटे उमाळा

नाम  तयाचे घेता
जीवा विसावा
लागे जिव्हाळा
नामात ची गोडवा

उठता नि बसता
स्मरू तुजला
तुझीच सेवा
ही तारण्या मजला

राहो सदाची  मुखी
तुझेच  नाम
प्रसन्न करी
असावे कर्म काम

पाहता रुप तुझे
वाटे आनंद
जीवा लागला
तव दर्शन  छंद

हेची मागणे विठू
दावा चरण
विनंती तुज
आले तुजशी शरण

वैशाली वर्तक

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

जेव्हा निसर्ग कोपतो


विषय --जेव्हा निसर्ग कोपतो        12/8/2019

निसर्गाचे किती , गावे गुण गान
असे  सदा तोचि , ईश्वर समान

तयाच्या कृपेने , सजे सारी सृष्टी
भरलेली त्यात , सुखकारी दृष्टी    

निसर्गाचा  राहो,  सदा सम-तोल
कधीच  न व्हावा, तो अ-समतोल

अती वृष्टी होता , ओला  तो दुष्काळ
हरवते सुख ,  न दिसे सुकाळ

अवकाळी धारा , बरसल्या अशा
सर्वस्व बुडाले,  झाली अवदशा

नको कधी कोप ,  तूच रे तारक
नको बनू असा , सृष्टी चा मारक

भुकंप ,प्रलय , निसर्ग  कोपाचे
होतसे घातक , सृष्टी च्या नाशाचे

नसे सृष्टी कोप , मानवाचा लोभ
प्रगती नावाचा, थांबवावा क्षोभ

वैशाली वर्तक.
निसर्ग
निसर्गाचे किती  गावे गुण गान        
असे  सदा तोचि  ईश्वर समान  
       
तुझ्या  कृपा दाने सजे सारी सृष्टी    
भरलेली त्यात  सुखकारी दृष्टी    

निसर्गाचा  राहो सदा सम-तोल
व्हावा न कधीच तो अ-समतोल

अती वृष्टी होता ओला तो दुष्काळ
हरवते सुख  न दिसे सुकाळ

अवकाळी धारा बरसल्या अशा
सर्व ते  बुडाले झाली अवदशा  

नको कधी कोप तूच रे तारक
नको बनू असा  सृष्टी चा मारक

भूमी कंप पूर  निसर्ग  कोपाचे  
असे  ते घातक सृष्टी च्या नाशाचे

नसे सृष्टी कोप मानवाचा लोभ
प्रगतीच्या नावे थांबवावा क्षोभ

वैशाली वर्तक.

रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

श्रावण

स्पर्धे क्रमांक 20
विषय--श्रावण                                  10/8/2019
पाचोळा उडला सभोवती
वाहे वारा सोसायट्याचा
फेर धरुनी नाचली पाने
बरसल्या सरी  श्रावणाच्या 

धरणी झाली तृप्त भिजूनी
श्रावणात  आली बहरुनी.
सर्वत्र एकच रंग  दिसे धरेचा
श्रावण सरी येता बरसूनी.

श्रावणात चाले  रोजच
ऊन पावसाचा  सदाच खेळ
इंद्रधनु तोरण शोभे नभी
सौंदर्य पहाण्यास हवा वेळ
  
श्रावण मास  सणवारांचा
येती लेकी बाळी माहेरासी
चाले पूजन मंगळागौरीचे
वाहूनी बल्व पत्र शंकरासी
   
बांधूनीया झुले अंगणात
लावुनिया मेहंदी हातावरी
मुली झुलती झोके घेउनी
पूजती नागराजाला घरोघरी

असे सा महिना नव सृजनाचा
तोचि मास   असे श्रावण
येई आनंदाला उधाण
सर्वांचा असे मन भावन

वैशाली वर्तक
      
                                                       

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...