गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

साथ तुझी हवी


साथ तुझी हवी

कशी राहू मी एकटी
तुज विण क्षणभर
जीवा सवय जडली
तुझी आता जन्मभर

माझे मजला कळेना
कशी तुझ्यात गुंतली
लक्ष लागेना कामात
माझी  न मी उरली


तू मोहन ची माझा 
कधी झाली  मी राधा
सहवास वाटे हवा
जडली तुझीच बाधा

साथ तुझी असता
साहीन ग्रीष्म झळा
तुझ्या  नित्य संगतीचा
लागलाय मला लळा

तुझी साथ हवी मला
वाटे न कशाचे  भय
अक्राळ काळ येता
तुची असे माझा अभय


वैशाली वर्तक

सोमवार, २५ एप्रिल, २०२२

को-या पाटीवर नशिबाचे अक्षर

*स्पर्धेसाठी*
विशेषकाव्य लेखन स्पर्धा 
दि 21/4/22
विषय - को-या पाटीवर नशिबाचे अक्षर

*शिकस्त केली प्रयत्नाची*

आस होती सुयशाची
शिकस्त केली प्रयत्नाची
झाली अक्षरे सुवर्णांची
साथ मिळता नशिबाची

 चाले  मधे विनाशाचा खेळ
न होता तरी कष्टी जीवनी
  उपसल्या कष्टाच्या  राशी
मोद, समाधान सदा मनी


  सदा उभा आहे पाठीशी
प्रयत्नांची कास धरी 
यश मिळणार सांगे कानी
दृढ विश्वास   तो देवावरी

करीता परिश्रम नेटाने
दैव घडते  मनगट बळावर
देव घडवितो नशीब प्रेमाने
*को-या पाटीवर नशिबाची अक्षर*

उघडले द्वार स्वर्गाचे
यश मिळाले पदरी
आनंदाला नसे पारावार
प्रसिद्धी ऐकून  जन अधरी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

रविवार, २४ एप्रिल, २०२२

बाल काव्य....मामाच्या गावाला जाऊया

काव्यपुष्प साहित्य  मंच समूह आयोजित  राज्य स्तरिय काव्य लेखन  स्पर्धेसाठी
स्पर्धा  क्र ३४
बाल कविता
विषय - ओळ काव्य 
*मामाच्या गावाला जाऊया*

   *तेच नेमके घडत नसे*
     

विसरा आता पाटी पूस्तक
हर्ष उल्हासे गीत गाऊया
धमाल करण्या आपण सारे
*मामाच्या गावाला जाऊया*        1

 लवकर उठणे कदापि  नको
मस्त गादीत पडू लोळत
उठून सकाळी खेळ गोट्यांचा
 गच्चीत पत्ते डावाची रंगत               2

मामाचे घर  पहा मोठे 
वरती खालती किती खण
झुल्यावर झुले   घेतच राहू
आनंदाने भरण्यास  मन               3

 विविध चाॕकलेटने  भरलेला
 फ्रीज मामाचा आहे  मोठा
भेळ पाणी पुरी खाऊया
आईस्क्रीमला नाही तोटा                 4

रोजच हवी सुट्टी  शाळेला 
वाटते  मनी सदैव असे
मजा करण्या मामाकडे जाऊ
पण तेच  नेमके    घडत नसे.                   5

वैशाली वर्तक
अहमदाबाद







मामाच्या गावाला जाऊया*
   *तेच नेमके घडत नसे*

     
विसरा आता पूस्तक पाटी
 देवाजवळ नैवेद्य वाटी
हर्ष उल्हासे गीत गाऊया. 
मामाच्या गावाला जाऊया*        1

 
 आहे  घराला खूपच खण
पहा आनंदे  भरले  मन
झुल्यावरती झुले   घेऊया 
मामाच्या गावाला जाऊया       २



मनी वाटते  सदैव असे
 तेच  नेमके    घडत नसे. 
शाळेला सुट्टी रोज देऊया
मामाच्या गावाला जाऊया    ३



उशीराच उठूया सदोदित 
  लोळत पडणे आवडे खचित    
पत्ते गोट्यांचा खेळ मांडुया
 मामाच्या गावाला जाऊया.     ४



फ्रीज मामाचा आहेच  मोठा
आईस्क्रीमला नाहीच तोटा
भेळ न् पाणी पुरी  खाऊया
मामाच्या गावाला जाऊया       ५
            
       
मनी वाटते  सदैव असे
 तेच  नेमके    घडत नसे. 
शाळेला सुट्टी रोज देऊया
मामाच्या गावाला जाऊया    ६


वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...