शनिवार, ८ जानेवारी, २०२२

अष्टाक्षरी ऋतूचक्र

 ऋतुचक्र

अष्टाक्षरी


निसर्गाची पहा कृपा

तोची आसे एकमात्र

कधी गर्मी कधी वर्षा

त्याची सत्ता दिन रात्र 


येता  वर्षा रूक्ष धरा

पहा कशी बहरली

ओली चिंब होता माती

तृणांकुरे अंकुरली


वृक्ष लता वेली सा-या

दिसे हिरवे सर्वत्र 

शालू  हिरवा धरेचा

रंग तिचा एकमात्र


रुप भूमंडळाचे ते

बदलले पहा कसे 

दिन सुगीचे ते येता

रुप नवे शोभतसे


होता पाने ती पिवळी

जागा करी हिरव्यास 

नियमच तो सृष्टी चा

होत नाहीत उदास 


शरदाची  पानगळ 

निस्तेजता वृक्षावरी

पाचोळ्याच्या पसा-याने

पीत रंग भूमीवरी


मोहरेल तो बहावा

फुटे नव पाने वनी

नव चैतन्याची सृष्टी 

फुले वसंत तो मनी


ऋतू मागूनी ऋतू ते 

बदलत जाती असे

निसर्गाची ही किमया 

भूमंडळी  शोभतसे


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

जुन्या नव्याची सांगड (तडजोड मनाची)


सिद्ध  साहित्यिक  समूह
४/१/२२ व ५/१/२२
विषय - नव्या जुन्याची सांगड
            
       *तडजोड मनाची*
जुन्या नव्याची सांगड
नसे आजचा  विचार 
चालणार कालांतरी
प्रश्न नाही सुटणार

काळा प्रमाणे बदल
नेहमीच घडणार
करा तडजोड मनी
सोपे सारे भासणार

प्रश्न तो सन्मवयाचा
जाणा काळाची आवड
होते मग बाब सोपी
जुन्या नव्याची  सांगड

दोन काळात साम्यता
कसा जमवावा मेळ
सुसंवाद करा पहा
 जमे छान ताळमेळ 

काळा प्रमाणे पाऊल
टाका  अगदी सहज
पहा साधेल सांगड
नाही वादाची गरज

नव्या युगाचे तंत्रज्ञ
करी जगाला प्रगत
झाली उन्नती जगाची
   झालो  आता सहमत

वैशाली वर्तक .
अहमदाबाद 
५/१/२२

रविवार, २ जानेवारी, २०२२

माझ्या आवडीचा कोपरा

उपक्रम
विषय -- माझ्या  आवडीचा कोपरा

आवडीचा कोपरा असे 
मागच्या अंगणातील खूर्ची
जिथे बसता मजला मिळे
विचारांची सदा स्फूर्ती 

  रोपे दिसती हिरवी छान
 पाने भासे टाळ्या वाजविती
वा-यासंगे हलून हासती
 भासती  मजलाच बोलाविती 

मधूनच खारुताई  धावूनी
लक्ष माझे वेधून घेई
उगाच हलवे शेपटी
स्वतःचे  आस्तित्व दावून जाई

थंड वा-याची येई झुळुक
करी मनाला प्रफुल्लित
 येती विचार मनात माझ्या 
जे करीती लिखाणास उत्तेजित

अशा निर्मळ  वातावरणी
 गुणगुणे हळुच डांस कानी
भुणभुण त्याची असता चालू 
दुर्लक्षित करते मोठ्या मनानी

वैशाली वर्तक
येथे ऑक्टोबर ०९, २०२० कोणत्याही

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...