शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

चित्र काव्य लावण्यवती

यारिया साहित्य  कला समुह
चित्र  काव्य

रुपवती
वर्णावया तव रुप
शब्द  पडती तोकडे
तव सौंदर्य  पहाण्या
जाते  नजर तुझ्या कडे

स्वर्गाच्या अप्सरांशी
सहज होईल बरोबरी
बघतील त्या वळुनी तुला
कोठुनी आलीस सांग तरी

 गळा हार,  बिंदी लोभस
 शोभे आभुषणे सहज
 कुणीही मोहात पडावे
 वदण्याची न भासे गरज

कमनीय बांधा तुझा 
चाल पण  ती डौलदार
बहरलेले तव यौवन
अदा  किती तुझी ऐटदार

पीत वर्णी वस्त्र परिधान
 कांती केतकीचे पान
हास्य  विलसले मुखी
तुझ्या रुपाची वेगळी शान

वैशाली वर्तक

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

नाचु खेळू बालगीत

नाचु खेळू

सुट्टी  लागताच ती दिवाळीची               
गंमत जंमत  होते  जीवाची           धृव पद

नाचुया खेळूया आली  दिवाळी  
मोद करुया रोजच सकाळी     
लुटूया मजा   रोज फिरण्याची  
गंमत जंमत होई  जीवाची       1


  पुस्तक  पाटीचे नकोच नाव       
  नाचणे खेळणे एवढे  ठाव 
  करु मौज दिनरात रोजची
 गंमत जंमत  होई जीवाची      2

  खेळू गोट्या पत्ते लगोरी डाव
  लाडु चकली वर मारु ताव   
  किल्ले दावती शान शिवबाची
  गंमत जंमत होई जीवाची       3
  
  
सुट्टी  लागताच ती दिवाळीची               
गंमत जंमत  होते  जीवाची 


   
      
      

   
    

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

रास खेळुया


सिध्द साहित्यिका समुह आयोजित चित्र काव्य  उपक्रम

**रास खेळुया**

छान सजलीत दोघे
खेळावया  आज रास 
रात्र भर  रंगणार 
गरब्याचा मनी ध्यास

नाचू गाउ धुंद  होउ 
देत ताल टिपरीचा
जणु रंगेल गरबा
 वाटे  तो गोकुळीचा


किती पहाते रोखूनी
डोळे हे जुलमी गडे
 वेड लागेल मजला
नको पाहू  माझ्या कडे

चल सावर ना आता
तव चणियाचा भार
रात्र सरुन जाईल
नाही  आता वेळ फार

आल्या जरी सरी किती
आज रास खेळणार
टिपरीच्या तालावर
रास पहा रंगणार

वैशाली वर्तक

पहिल्या भेटीचे क्षण

पहिल्या भेटीचे क्षण...
      विषय वाचताच गाणे  माझ्या ओठी आले.
"भेट तुझी माझी स्मरते....आजून त्या दिसाची...""
      खरच पहिल्या  भेटीच्या क्षणांची आठवण काही औरच.  कोण आधी बोलेल ..काय बोलेल.  मन थोडे भयभीत  असते. कशी बर आणि काय   सुरुवात करु ?. कुठल्या विषयात हात घालू ..काही.sss. काही समजत नसते.
 मग उगाचच पदराचा चाळा चालतो वा वेणीशी खेळ करत बोलणे होते. 
         तसच काही से झालेले ते क्षण डोळ्यासमोर  आले.  ती पहीली भेट. ओढ तर असतेच ..कसा असेल आपला सखा.  आपले विचार मांडणे मनात चालू होते  .  तेवढ्यात मनाचा निर्धार  करुन .दोघांच्या तोंडून  एकच शब्द निघतात .,"...मी म्हणत होतो / मी म्हणत होते. .."आणि पुन्हा  स्तब्धता. 
          असेच काहीसे बावचळलेले क्षण  होते व सर्वांचेअसतात. मग  मात्र  गंभीर पणे एकमेकांची  आवड  ..संगीताची आवड वगैरे  आहे का करत गप्पा सुरु होतात. आजु बाजुला चालत असलेली हालचाल  डोळ्यांना  दिसत असते पण लक्ष मात्र  नसते. क्षण च तो असतो  तसा ... एकमेकांना  जाणून घेण्याचा .एकमेकात गुंतण्याचा. असेच गुंतत आम्ही पुढे चालत होतो. सहजच झालेला ..नाही.... नाही जाणून बुजून केलेला तो स्पर्श ..अजून आठवणीने मन शहारते. असतोच  क्षण तसा तो. सहजचतेने हात हाती घेऊन टाकत गेलो काही  पावले. 
    एकत्र  पावले.. जणू मनास आनंद..  धीर ..विश्वास ..मनात वाटलेले ते क्षण. जणू 
क्षणात भासले आता काहीही संकट आपल्यावर येऊ शकत नाही ..असा त्या वेळेचा वेडा ......हो वेडा ..आता भासतो. पण तेव्हाचा दृढ विश्वास ..  कारण वेळच अशी असते.एकमेकां शिवाय काही दिसत नसते. आपल्याच विश्वात गुरफटलेले असतो. 
असे मोहक क्षण अनुभवत .बोलत वेळ जातो.  मग मात्र  सहज झालेला स्पर्श  हवा
हवासा वाटतो. व जणू जीवनाची  वाटचाल कशी असेल याची मनी स्वप्न रंगवीत 
पावले हातात हात गुंफवित वाटचाल करु लागलो.. 
         चालत चालत कधी घराशी आलो कळलेच नाही. टाटा बायबाय करत 
उद्या च्या भेटीची आतुरता दोघांनी दर्शवत .निरोप घेत .पहिली भेट अविस्मरणीय मनी ठरवत... मनात आनंदाने  घरी परतलो.
      असेच असतात ना ते  पहिल्या  भेटीचे क्षण. !

वैशाली वर्तक 

         

         

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

कंकण

कंकण
 लग्नातील एक विधी
असे बांधणे कंकण
जन्मभर देऊ साथ
याचे मनास बंधन


बांधी सैनिक कंकण
देश  सेवा रक्षणाचे
येवो कितीही संकटे
 व्रत पूर्ण  करण्याचे


हाती कंकण आनंदे
जन सेवेचे बांधिले
 फुले ज्योतिबारावांनी
सारे आयुष्य  वेचिले

येते शोभा कंकणाने 
हात  शोभून दिसती
दान देता शोभा वाढे
 संत  सदाची वदती

कंकणाची किणकिण
 सवाष्णींना सुखावते
नाद तिचा येता कानी
सखयाला खुणावते.


वैशाली वर्तक




अष्टाक्षरी वसुंधरा. /किती सोसाव्या कळ्या

अक्षर मंच
काव्य लेखन स्पर्धा 
राज्यस्तरिय  स्पर्धा  क्रमांक - ४
अष्टपैलू  संस्कृती  कला अकादमी , मुंबई  आयोजित


     विषय -- वसुंधरा
        वसुंधरा
पृथ्वी असे  वसुंधरा 
आम्हा सर्वांची दाता
अन्न  वस्त्र  न् निवारा
तूची असे दुजी  माता

देऊनिया धनधान्ये
तुची भरविशी घास
मिळे कुशीत निवांत
तुझा म्हणवितो दास


साहुनिया तूची घाव
देई खनीजे अनेक
अंतरात भरलेली
हास्य मुखे एक-एक


पंच तत्वातील एक
असे पृथ्वी एक तत्व
जलचर जीव वसे
सर्वां तुझेच महत्त्व

तव कृपा प्रसादाचे
नित्य करितो  स्मरण
उठताच स्पर्शुनिया
तुझे वंदतो चरण

केल्या चुका आजवरी
आता नाही करणार 
प्रगतीच्या नावाखाली
नाही तुज छळणार

...वैशाली वर्तक
अहमदाबाद 


सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्रमांक 511
विषय..किती सोसाव्या कळा
शीर्षक....वसुंधरा 

संपताच पानगळ 
सुरू झाल्या तप्त झळा    
नको वाटे हा ऊन्हाळा  
वसुधेला अवकळा 

आला संपत ओलावा
भेगाळली मम काया
कण कण तापलेला
वृक्षांचीही नाही छाया.

झळा साहून उन्हाच्या
कोमेजली सृष्टी सारी
कसे अंकुरेल बीज
याची चिंता मनी भारी

प्रगतीच्या नावाखाली
थांबवावा आता क्षोभ.
किती सोसाव्या मी कळा
मानवाचा अती लोभ

  पंचतत्वे  मी निर्मित 
 तरी जाणा त्यांचे मोल
 जल   जिरवा  मातीत
 राखा    निसर्गाचा   तोल


 वैशाली वर्तक.
अहमदाबाद



भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापूर 
आयोजित काव्यलेखन उपक्रम क्रमांक 356
भूमीपूजन निमित्ताने विशेष उपक्रम 
विषय...काळी माय
   शीर्षक...वसुंधरा

जन्म दाती आई  माय
 पण जग विसावले  सारे ,
 ती पृथ्वी असे काळी माय
तिचे रुप असे न्यारे

पृथ्वी असे  वसुंधरा 
आम्हा सर्वांची दाता
अन्न  वस्त्र  न् निवारा
तूची असे दुजी  माता

देऊनिया धनधान्ये
तुची भरविशी घास
मिळे कुशीत निवांत
तुझा म्हणवितो दास


साहुनिया तूची घाव
देई खनीजे अनेक
अंतरात भरलेली
हास्य मुखे एक-एक


पंच तत्वातील एक
असे पृथ्वी एक तत्व
जलचर जीव वसे
सर्वां तुझेच महत्त्व

तव कृपा प्रसादाचे
नित्य करितो  स्मरण
उठताच स्पर्शुनिया
तुझे वंदतो चरण

केल्या चुका आजवरी
आता नाही करणार 
प्रगतीच्या नावाखाली
नाही तुज छळणार

...वैशाली वर्तक
अहमदाबाद 
8141427430


चित्र काव्य लोभस बालिका

यारिया  साहित्य  समूह
उपक्रमासाठी
चित्र  काव्य

    **लोभस बालिका**

किती लोभस रुप पहा
मुखावरी भाव सोज्वळ
पूजेसाठी करी तयारी     
कयास तुमचा   प्रांजळ

भाळी लावियली उदी
कानी झुंबरे सुंदर  डुले
गळ्यात मोहक हार कसा
बालिकेचे रुप खुले


शोभून दिसे परकर पोलके
पारंपारिक वस्त्र परिधान
पहा कशी अवखळ बाळी
 वाटे  पाहून आगळे समाधान

भरली परडी  सुगंधित फुलांनी
लाल  रंगीत फुले डोकवली
पूजेला उणीव जयांची भासे 
 ती   तुळस पाने  पण खुडली


वैशाली वर्तक

गीत...सुखाचे सोबती

सुखाचे सोबती

जगी या सारे सोबती जाणा सुखाचे कोण ती
येतो संबध सर्वांचा     गोड  सारेची   बोलती

       होता जन्म नाते जुळे पिता माता करी माया
       सारे प्रेमाचे   सोयरे     करती प्रेमळ छाया
       कधी  पाण्यात राहूनिया  वैर  नको सांगती
       येतो संबध सर्वांचा गोड सारेची बोलती


          जग बाजार स्वार्थाचा टाक जपून पाऊल 
           स्वार्थ भावे भरलेला घेत तयाची चाहुल
           दावी खोटीच माया गुणी जन सारे नसती  
           येतो संबध सर्वांचा गोड सारेची बोलती

            
                

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...