शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

परीक्षा

 सिद्ध साहित्यिक समूह

आयोजित उपक्रम क्रमांक 496

विषय...  परीक्षा


सुरू होतेची परीक्षा

येता  मानव जन्माला

बालपणी मायबाप

देतात उभारी मनाला


होतो मोठे जीवनी

देतो परीक्षा अनेक

उत्तीर्ण करून यशाने

येतो पुढे पाऊल , एकेक



सांभाळीत संयमाने

गृहस्थाश्रम सदाकाळ

देत परीक्षा करीतो

सदा आनंदी सकाळ


अहो सीतामाईला कुठे

परीक्षा  होती चुकली

अग्नी परीक्षा देऊन

पंच कन्येत  नाणे उजळली


परीक्षा करिते मोजमाप

 मिळविलेल्या अनुभवाचे 

 काय शिकलात जीवनी

 चुका सुधारून वागण्याचे



वैशाली वर्तक

अहमदाबाद

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

धीर देणारी कविता

 आली परीक्षा  तोंडावर

 म्हणतोस तू येत नाही

कसे होणार तुझे आता 

चिंता मनी खात राही


नको होऊस निराश  तू

नाही इतकाही मंद  मती

शांत चित्ते कर वाचन

येईल स्मरणात गती


अजून वेळ गेली नाही

उठ सकाळी लवकर 

कर महेनत हुशारीने

प्रातःकाळ असे सुंदर 



आण  ध्यानी काल वाचलेले

मग घेशील पठणाचा ध्यास

येत आहे मजला वाटेल मनी

वाढेल  तुझा आत्म विश्वास 


  नाही तुझा धांदरट स्वभाव

चित्त   ठेव  सदैव शांत 

केलीय शेवटी ...का होईन

नकोच  आणू मनी  भ्रांत


वैशाली वर्तक

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

कळी

मोहरली लेखणी साहित्य समूह
आयोजित उपक्रम
विषय.. कळी
      *कळीचे फूल*

होती काल सांजवेळी
ताठरलेली बंद कळी
येता रवीराज नभी
 खुले पाकळी पाकळी

रंग सुंदर गुलाबी सर
पर्णे बाजुला गोलाकार
आत गर्दी पराग कणांची
पाकळ्या खुलल्या रंगदार

उमललेली कमलदले
दिसती किती मोहक
भ्रमर आलीच समीप
रूप कमळाचे चित्त वेधक

मंद शीतल पवनाने 
कमळ अलवार डुले 
बागेतील तळ्याची शोभा
कळीचे फुल होता  खुले .

वैशाली वर्तक
 अहमदाबाद

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

धुंदी ( अष्टाक्षरी). विसर पडणे

नक्षत्र वेल  साहित्य  समुह आयोजित 
*धुंदी*

 धुंदी मधु सेवनाची
फुलासवे प्रणयात
राही सदा भ्रमरास
दंग राही गुंजनात

कुठलाही छंद जीवा
  तोची  लागता मनास 
रममाण रहाण्यात
मिळे आनंद तयास

कलाकारास  चढे धुंदी
  सदा अभिनयाची मना 
भुक तहान विसरे
वेड लागे तयाच्या तना

भक्तीरसात विसरली
  मीरा कृष्णाच्या प्रेमात 
झाली एकरुप मने
धुंद ती कृष्ण रुपात

वैशाली वर्तक

गझल....... तिरंगा/. सौदामिनी बळीराजा/

तिरंगा.  २१\२\२३


 फडकता स्वतेजे असावा तिरंगा

जगी सौख्यदाता ठरावा तिरंगा.        १


कधीही लहरता पहावा तिरंगा.   

सदा झळकताना दिसावा तिरंगा.      २


तिरंगा पहाता मनी   हर्ष वाटे 

 जगाने फडकता पहावा तिरंगा          ३


असे तो  महा सोहळा   भारताचा

मनातून सन्मानित हवा तिरंगा.           ४


 दिसे याच  दिवशी हर घरी तिरंगा

असाची फडकता रहावा तिरंगा.         ५


सलामी विनम्रे  तिरंग्यास द्यावी

  सर्वदा   मनी आठवावा तिरंगा.        ६



सौदामिनी बळीराजा 
लगागा लगागा लगागा लगा

जरी  धाम देवा तुझे पंढरी
पहातो तुला मी सदा अंतरी 

कधी ऐकतो मी तुझी बासरी
पहातो सदाची अदा हासरी

कशाला बसावे सदा मंदिरी
खरा देव पहावा शिवारी तरी

कितीही  झिजतो शिवारी तरी
जलाची अपेक्षा  सदा अंतरी          

शिवारे बहरली  बळीची जरी
तरी पोर पत्नी  उपाशी घरी

अशी ती कहाणी बळीची खरी
नशीबी सुखाची नसे भाकरी



वैशाली वर्तक
अहमदाबाद 


सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...