***आठवांचे वावटळ**
मन गेले मागे मागे
गत काळाशी रमले
आठवले सारे सारे
मनी हसत बसले
आठवली सहजच
भेट आपुली पहिली
किती मी बावरलेली
कशी पहात राहिली
आठवांचे वावटळ
कधी जमते मनात
होते विचारांची गर्दी
जशी मेघांची नभात
कधी येतात विचार
तूची केलीस जीवनी
अमावस्येची पूनम
सदा दिली संजीवनी
असे उठे निवांतात
आठवांचे वावटळ
काही गोड काही कटू
काही उठवी वादळ
वैशाली वर्तक