फुलोरा कलेचे माहेरघर
उपक्रम
एक पाऊल परिपूर्णते कडे
पहिल्या ओळीत १० दुसऱ्या ओळीत ८शब्द
विषय....अशी मी ...असा मी
शीर्षक.. स्व -भावाचे गुणगान
कोण म्हणे *मी अशी मी तशी*
बोला , बोला तुम्ही काही
माझ्यात फरक तसुभर
कधी, पडणार नाही १
नेहमीच वाटते जनांना
आहेची मी थोडी शिष्ट
पण ,खरच सांगते तुम्हा
नाहीचय, मी गर्विष्ठ २
लागलाय छंद लेखनाचा
सेवा निवृत्त जीवनी
तोची असे माझा विरंगुळा
मोद मिळे मनोमनी. ३
रहाते रममाण माझी मी
सदा माझ्याची छंदात
अन् मिळतो परमानंद
मला दिवस भरात ४
आहेच हं , मात्र मी मनाने.
अतिशय स्वाभिमानी
माझ्या जीवनातील काळात
खरोखरी समाधानी ५
वैशाली वर्तक
अहमदाबाद
गुजरात
सिद्ध साहित्यिक समूह
काव्य लेखन उपक्रम
विषय - अशी मी तशी मी
====================
अशी मी तशी मी
म्हणा तुम्ही काही
फरक माझ्यात
कधी होत नाही
वाटते जनांना
आहे थोडी शिष्ट
खरच सांगते
नाही मी गर्विष्ठ
छंद लिखाणाचा
निवृत्त जीवनी
देतो विरंगुळा
मोद मनोमनी
रमते माझी मी
माझ्याच छंदात
मिळतो स्वानंद
दिवस भरात
आहेच मनाने
सदा स्वाभिमानी
मम जीवनात
सुखी समाधानी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कल्याण डोंबिवली महानगर २
आयोजित उपक्रम
काव्यलेखन
विषय ... तेंव्हा तू तशी
पाहिलीत माझीच रुपे
किती बदलेली सहज
होते अवखळ बालपणी
सांगण्याची नसे गरज
संपताच बाल्यकाळ
झाले समजूतदार
शिस्त लागता मनाला
पहाता जाहले ऐटदार
साधी पण ऐटबाज
अंगिकारली रहाणी
चार लोकांत उठून दिसावी
अशी कर्तृत्वाने देखणी
म्हणती जन मजला
होती तू सदा अभिमानी
खरं सांगते तुम्हाला
आहे मी सदैव स्वाभिमानी
म्हणा तुम्ही *तू तेंव्हा तशी*
घेतले मी अनुभव जीवनी
जाहले अनुभवाने शहाणी
हेच मात्र खरे ,सांगते या क्षणी
वैशाली वर्तक
अहमदाबाद