सिद्ध साहित्यिक समूह आयोजित उपक्रम क्रमांक ५५७
साहित्य प्रकार . कुठलाही काव्य लेखन
विषय.. गुपित एक सांगते
शीर्षक... गर्विता
जपलीय मनात मी
माझी पहिली कविता
अगणिक जरी रचल्या
तीच ठरली *गर्विता*
केले होते वर्णन तयात
माझ्या बागेतील फुलांचे
एका एका फुलांनी वर्णिले
महत्त्व आपापले स्वतःचे
लिहीली होती कन्येसाठी
भावली तिला अतिशय
सहज केली तिने तोंडपाठ
समजून घेऊन आशय
साध्या सोप्या शब्दात
केली शब्दांची मांडणी
बालभारती पुस्तकासाठी
आली की हो! तिज मागणी
खुष होवूनी वाट पहातेय
फोन येईलच हो... खचित
धाडा स्वपरिचया सह फोटो,
पण मनीच ठेवा हं गुपित
सा-या मम सख्या तुम्ही
म्हणून कथिले एक गुपित
पण अजून हे गुपितच ठेवा
हेही सांगणे तितकेच उचित .
वैशाली वर्तक
अहमदाबाद