शनिवार, २३ जानेवारी, २०२१

लेक. सासरी जाताना\ शुभ विवाह लेक बापाची लाडाची

लेक सासरी जातांना

पार पडला लग्नाचा
समारंभ सुरळीत
खूश झाले माता पिता
मनातूनी  आनंदित

  क्षण पाठवणीचा तो
  *लेक सासरी जाताना*
   भरुनिया आले मन
  होती मनास  यातना

 जमलेले स्नेही मित्र 
 सारे होती भावनिक
 देणे लेक दुजा हाती
 रीत ती पारंपारिक.

 पाणावल्या नेत्रकडा
 उभे राही बालपण
 बोल बोबडीचे कानी
 आठवले मनी क्षण

जावयाला जड मने 
हात लेकीचा देताना
जड अंतःकरण ते
लेक सासरी जाताना

वैशाली वर्तक       23/1/2021


सोमवार, १९ जून, २०२३

शुभ विवाह

माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे
आयोजित काव्य लेखन
विषय .. शुभ विवाह

शुभ विवाह शब्दची
सांगे दोन मनांचे मिलन
करिती संसारास प्रारंभ
बांधूनी पवित्र बंधन

कन्या दानाचे पदरी  पुण्य
मिळविती मायबाप जीवनी
कन्या दोन कुळ उध्दारण्या
तयार आनंदे मनोमनी

शुभ विवाह मांगलिक विधी
होती आप्तेष्ट सारे गोळा
अग्नी देवतेच्या साक्षीने
रंगतो शुभ मंगल सोहळा

येता वेळ पाठवणीची
पाणी डोळ्यांच्या पापण्यांना
आई बाबांचे होई जड मन
लेक लाडकी जातांना 

हासू अन् अश्रूंचा सोहळा 
असे असा शुभ विवाह प्रसंग  
अनुभवताती  सारे जन
मग चढे संसारास रंग

वैशाली वर्तक
अहमदाबाद

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन ...शोध अस्तित्वाचा

स्फुट लेख 
लेखन शोध आस्तित्वाचा


 माणसाचे अस्तित्व हे , जो पर्यत शरीरात प्राण आहे .श्वास आहे तो पर्यत असते. म्हणजे हे झाले भौतिक अस्तित्व . पण अस्तित्व टिकवण्यास सत्कर्माची जाण ठेवली तर नाव लौकिक होऊन अस्तित्व किर्ती रुपाने जीवंत रहाते... टिकते. चांगले कर्म करता अस्तित्वाचा सुगंध दरवळून रहातो. श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण ही त्यांच्या सत्कर्माची उदाहरणे.. म्हणजेच काय जसे कर्म तसे अस्तित्व रहाते. निर्जीवांना पण आस्तित्व असतेच. म्हणूनच तर उत्खलनात जुन्या संस्कृतीचे अवशेष मिळतात व अवलोकन होते. नैसर्गिक तत्वे पण आपले अस्तित्व टिकवून असतात. पंचमहाभुते ही नैसर्गिक अस्तित्वाची उदाहरणे आहेत. आपले अस्तित्व टिकवण्यास संतांनी तेच सांगितलं आहे .कबीर दोह्यात म्हणतात जब हम पैदा हुए, जग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोए म्हणजे आपल्या अस्तित्वाचा सुंगध दरवळत रहातो. . वैशाली वर्तक अहमदाबाद

अलक कवडसा

शब्दरजनी कवडसा समूह 
 शब्दरजनी समुहाच्या प्रथम वर्धापनी  
राज्य स्तरीय  अलक कथा स्पर्धा लेखन
स्पर्धा लेखन अलक कथे साठी
विषय -- कवडसा  


       घर आहे  आमचे साधे चंद्र मोळी. पण दारी नारळाची झाडे अनेक. दुपारी  सूर्य  माथ्यावर  आला की , त्या ऊन्हात सुर्याच्या प्रकाशात,  जमिनीवर झाडातून  अनेक कवडसे पडतात . ते 
जणु सोन्याची नाणीच विखरली  आहेत अशी भासतात.  व 
चंद्र मोळी झोपडीत  छपरातून सुर्य किरणांचा  शिरकाव होतो .
तेव्हा  कवडसा पडतो . तो जणु सदा आशेचे, उद्या च्या   सुखाचे किरण   दाखवितो.कवडसा देतो मनाची समृद्धी...  व सुखद आशा किरण. *कवडसा* जीवनी हवाच. 

वैशाली वर्तक
अहमदाबाद




मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

टेक्नाॕलाॕजी शाप की वरदान

अ भा म सा प स्वप्नगंध समूह
उपक्रम- लेख लेखन
विषय -- टेक्नालाॕजी शाप की वरदान

  कुठल्याही  गोष्टी च्या दोन बाजू असतात. चांगली व  वाईट
बाजू. चांगल्या बाजुंचा उपभोग घेत  असता ...वाईट वा दुरुपयोग नजरेत येत नाही. तेव्हा सर्व चांगल्याचेच  गुणगान करतात.
     तसेच या टेक्नाॕलाॕजी चे आहे. सध्याच्या टेक्नाॕलाॕजीने
इतके जीवन सुखकर झाले आहे.व ते अंगवळी पण सहजच पडत आहे. 
     आताच पहा ना या लाॕकडाऊनच्या काळात मुलांच्या शाळा 
त्यांच्या  शिक्षणाचे काय ? ...पण या टेक्नाॕलाॕजीने मुलांचे शैक्षणिक तंत्र ... थोडे. उशीरा... पण चालू झाले ...मुले पण हुशारीने  नव्या टेक्नाॕलाॕजीत जणु वर्गात शिकत आहे तसे शालेय वर्ग  भरुन अभ्यासक्रम पूर्ण  करत आहे. 
      हजोरो मैल दूर वसलेल्या आपल्या  मुलांशी ...अगदी त्यांच्या कीचन मधे जाऊन ...आज काय बनविले जेवणास अशा    गप्पाकरुन ....क्षणार्धात  भेटत आहोत . व दूर रहाण्याचे वा दुराव्याचे दुःख  कमी होत आहे. जगातील घडामोडी तर पापणी लवण्याच्या आत समजत आहे. आपले चंद्र यान कुठे पडले हे पण अवनीवरून अवशेषासह पहाता येत आहे. 
     आपण पहातो जाहिराती त शेतकरी पण उन्हात  न जाता घर बसल्या पिकाची विक्री करत आहे .या सा-या गोष्टी टेक्नाॕलाॕजी
मुळेच घडत आहेत .कमी श्रमात काम होत आहे. 
       तर ह्या सा-या सुखा बरोबर वाईट बाजू असणारच. सतत डोळ्या समोर धरुन... ..मोबाईल काय..... वा   काॕम्प्युटर याचे शरीरास थोड्या -फार वा कमी जास्त  प्रमाणात अपाय होणारच.  तसेच  मुलांचे  पण सतत मोबाईल वर खेळत रहाण्याने मैदानी खेळापासून ते दुरावले आहेत. 
   तसेच सर्व  सामान्य  माणुस हा बघावा तेव्हा नत मस्तक  होउन सतत मोबाईल मधे गर्क असतो ....घरातल्यांशी संवाद  कमी झाले आहेत ...मोबाईल मधे रमत रहाण्याचे वेड म्हणा वा सवय झाली आहे. आजुबाजुला  कोणाशी बोलणे राहिले नाही. जो तो आपल्यातच रमलेला असतो. माणुस घाणा मानव झाला आहे. 
      बायका पण मोबाईल मधे व्यस्त राहून कधी कधी मुलांच्या गरजाकडे दुर्लक्ष  सहजतेने करत आहे. 
  पण हे सारे मानवाने स्वतः ठरवायचे आहे. स्वतः ला बंधन घालून घेतले पाहिजे ...त्यासाठी टेक्नाॕलाॕजीला दोष देणे ... शाप ठरविणे उचित नाही . पक्वानाचे ताट जरी समोर असले तरी   पोट आपले असते ...तसे आपण आपल्यास बंधन घालून टेक्नाॕलाॕजीच्या उपभोग घेतला पाहिजे की वरदान  वाटेल 


वैशाली वर्तक

सोमवार, १८ जानेवारी, २०२१

टिपूर चांदणे \. चांदण्यांची शाळा

शुभ्र टिपूर चांदणे
..............................
आभाळाच्या गाभा-यात
शाळा असे चांदण्यांची
वाट पहाती सांजवेळी
अस्त होण्या आदित्याची      1


आल्या नभात लाजूनी
 एक एक करुनी हळुवार 
लुकलुक करीत जणू
दिवे लावियले अलवार               2


वाटे घ्याव्या  उचलूनी
भरुनिया ओंजळीत
हळुवार गुंफण्यास
फुले  म्हणूनी  वेणीत             3


जणु भरलीय शाळा
काळ्या काजळ आकाशी
चमचम करी तारे
खेळ खेळण्या चंद्राशी               4

किती दिसती लोभस
तारिकांचे   ते रुप रंग
आकर्षित करी जीवा
 मन होई   पहाण्यात दंग                5


शुभ्र टिपूर चांदणे
मोहाविते जन मना
एक एक तारिका त्या
आकर्षित  क्षणा क्षणा                6
    

चंद्र चांदण्यांचा चाले
खेळ नभी लोभनीय
रुप खुले चंद्रासवे
चांदणीचे रमणीय                      7


चांदण्यांची शाळा
...........................

आभाळाच्या गाभा-यात
भरे शाळा चांदण्यांची
वाट पहाती सांजवेळी
अस्त होण्या आदित्याची

  येती नेभात लाजून
  एक एक हळुवार 
   लुकलुक करी जणू
  दिवे लावी अलवार

   कधी नाही गडबड
    जागा त्यांची ठरलेली
  कोणी कुठे बसायचे
   शिस्त  सदा पाळलेली
   
    शशी येता नभांगणी
    येई शाळेला भरती
    फेर धरूनी शशीला
    लुकलुक चाले भोवती

   येता शरद पूनम
   जणू सोहळा सुंदर 
   दिसे चांदणे टिपूर
   शाळा दिसे मनोहर

  
  चांदण्यांच्या या शाळेचे 
  कळे  तेव्हाची  महत्त्व 
    बंद  शाळाअवसेला
   दावी चांदण्या श्रेठत्व

वैशाली वर्तक

जग उजळले सारे

जग उजळले सारे

नव आशांचा उदय
उजळले जग सारे
सदा प्रसन्नता  वाटे
वाहे चैतन्याचे वारे

येता रवी राज नभी
उधळले नव रंग
भरु जीवनी उल्हास
नित्य कामी होऊ दंग

पहा पक्षीगण उडे
घेत  गगनी भरारी
भरुनिया बळ पंखे
देउ मनास उभारी

दिन रोजचाच नवा
करा उत्कषे साजरा
पहा सांजवेळी मग
  दिसे  चेहरा हासरा


राहो सारेची सुखात 
होता  जीवनी उन्नती 
उजळले जग सारे
पहा जगाची प्रगती

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...