bhel
1 अग , चल ना ग अर्चना,हा पहा . भगिनी समाजाचा आनंद मेळा लागला आहे . चल जाऊ या आत खादाडीला .
2 हो चालेल , जाऊया की .
1 अग बाई ! किती ही गर्दी .आणि तो कोणता स्टॉल आहे ग ? अतीच गर्दी आहे ना?
2 अग तो ना ?' मुंबई भेळ" अग भेळ म्हटले की गर्दी असणारच
1 हो sss हो . ना भेळ पदार्थच असा कीं पोटभर जेवण झाले असेल तरी भेळ ची एखादी डिश खायला काहीच हरकत नसते .
2 अग रामकृष्ण परमहंसांचे आहे ना उदाहरण .त्यांचे जेवण झाले होते .मला आता काही नको म्हटले .पण त्यांच्या शिष्यांनीं जिलबीची डिश समोर
धरली ,तर त्यांनी चक्क जिलबी घेतली की व त्यांना विचारले तर म्हणाले
1 हो माहित आहे मला ते . मी पण वाचले आहे . ते म्हणाले कि कलकत्यात रस्त्यात तुफान गर्दी पण गव्हर्नरची गाडी आली तर गर्दी आजूबाजूला होऊन
त्यांची गाडी पुढे निघून जाते ,तसेच जिलबीचे आहे . आवडती वस्तू म्हटली कि पोटात जागा होतेच
2 हं म्हणजे !त्या भेळला पण भर पेट असता जागा होते तर .
1 हो ना अर्चना भेळ पदार्थच मुळात रुचकर , नुसता तोंडाला चव नाही तर भूक चालविणारा पदार्थ आहे
2 खरच ग . चुरमुरे कुरमुरे त्यात वाफविलेल्या बटाट्याचे तुकडे ,बारीक चिरलेला टॉमेटो, ,मैद्याच्या पूरीचे तुकडे , फरसाण व त्यात आंबट गोड
चिंचेची चटणी आणि चवीला ,पुदिना हिरव्या मिरचीची तिखट चटणी ,व या तयार मिश्रणावर बारीक चिरलेला कांदा व वरून बारीक भरभुरलेली
बारीक शेव
1 अग थांब आणि वर लालबुंद डाळिंबाचे दाणे
2 काय शोभिवंत दिसते ना भेळ? नुसते वर्णन एकूण तोंडास पाणी सुटले ना ?
1 खर च "भेळ " म्हणजे मिश्रण .
2 हो ना . निवडक पदार्थांचे योग्य प्रमाणात मिश्रण म्हणजे भेळ .
1 तसे पाहिले तर स्वयंपाक कृतीत पण अनेक पदार्थांचे मिश्रणच असते ना .
2 हो व त्या विविघ खाद्य पदार्थांच्या मिश्रणाने खाद्य पदार्थ तयार होतो .
1 आणि हो पदार्थास चव आणण्यात अनेक मसाल्यांच्या पदार्थाची म्हणजे लवंग ,तमाल पत्र दालचिनी वगैरे मसाल्यांचे एकत्रीकरण करून अथवा
गरम पदार्थांचीभेळ करून मग ते तयार मसाले खाद्य पदार्थाची रसना वाढवण्यास मदत रूप होतात ,
2 एवढेच काय भौतिक शास्त्रात पहा ना . धातूंच्या मिश्रणात दोन व अधिक धातूंचे एकत्रीकरणाने व भेळ करून धातू बनते .
1 आणि त्या धातूचे वाहतुकीच्या साधनात , औद्योगिक क्षेत्रात अनेक ठिकाणी वापरण्यात येतात .
2 आणि अग रसायन शास्त्रात तर निव्वळ अनेक घटकांची भेळच असते . अनेक घटकांचे मिश्रण करून रसायनिक पदार्थ तयार होतात.
1 हो ना साबण औषधे , कॉस्मेटिक ,पेस्ट ,मंजन पावडर वगैरे काय . तसेच रंगात नाही का तेल व इतर प्रवाही घटकांच्या मिश्रणाने रंग बनतात
2 अग हो ना प्रवाही पदार्था वरून आठविले की नैसर्गिक प्रवाही पदार्थ पाणी पहा ना . ते पण हैड्रोजन व ऑक्सिजन वायूंचे मिश्रण आहे ना
1 हो त्याच प्रमाणे इतर वायूंचे विघटन केले तर कळते त्यात पण दोन व अधिक घटकांची भेळ / मिश्रण च आहे .
2 म्हणजे नैसर्गिक पदार्थ पण योग्य प्रमाणात भेळ व मिश्रण स्वरूपात आहेत
1 अग कापड उद्योगात पण भेळ असतेच की .सुती व सिंथेटिक धाग्यांचे मिश्रण असतेच ना व जेव्हा असे मिश्रण नसते तेव्हा संपूर्ण वा प्युअर सिल्क
2 अथवा पूर कॉटन असे लेबल लावतात ,
1 सूर्य प्रकाशाचे किरण पावसाच्या थेंबातुन पसार होते तेव्हा त्या प्रकाशाचे पृथकरण होऊन सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. म्हणजे सूर्याचा च प्रकाश . सूर्य
किरण पण सात रंगाचे मिश्रण व भेळ च आहे ना
2 एवढेच काय वैशाली आपले शरीर नाही का पंच महाभूतांचे योग्य प्रमाणात मिश्रण होऊन बनले आहे ना . जरा समतोलता कमी जास्त झाली
तर आरोग्याचे तंत्र बिघडते .
1 हो तर खर् च आहे . आपण बोलतो, लिहितो ,भाष्य करतो. त्यात शब्दांचा योग्य समूह असतो , त्यात पण योग्य शब्दांचे एकत्रीकरण करून जोड
शब्द तयार होतो. हे जोड शब्द वा शब्दांचे मिश्रण , भाषेचा दर्जा वाढवितात त्या त्या भाषेच्या व्याकरणात भर करतात. भाषेला समृद्ध करतात
नाही का ?
2 हो ना पंच पाळे , त्रिमूर्ती , नवरात्री ,वगैरेजोड शब्द भाषेच्या व्याकरणात , समास तयार करतात , तसेच अनेक शब्दास एक शब्द देऊन जसे
गजानन - ज्याचे मुख गजासारखे आहे , मिनाक्षि -जिचे डोळे माशा प्रमाणे आहेत असे समास जोडशब्द व शब्दांचे मिश्रण /भेळ असते
जिच्याने भाषे दर्जा उंचवितो , वाढतो
1 हो म्हणजे भेळ सर्वत्र असते तर . म्हणजे भे आणि ळ यात मात्र स अक्षर नसावे , नाहीतर भेसळ शब्द तयार होतो . व ती मात्र योग्य नाही
2 हो ना जसे बांधकामात रेती सिमेंट चे योग्य प्रमाणात भेळ केली पाहिजे नाहीतर बांध काम कच्चे होते ,
1 सोनाराने सोन्याचे दागिने बनविताना त्यात तांबे चांदी चे प्रमाण योग्य नाही ठेविले तर सोन्याचा कस कमी होतो. कारण दागिने बनवितांना तांबे टाका
वेच लागते . पण सोन्याच्या कास कडे पण पाहिले पाहिजे .
2 अग येतेच काय खाद्य पदार्थात टीप कागद ,ब्लॉटींग पेपरचा क्रीम म्हणून वापर करणे . तो छोटुमल मोटुमल नाही का लस्सीत वापर करावयाचा
मग पकडला गेला . तसे नसावे
1 हो ना लाकडाचा भुसा मसाल्याच्या पदार्थात वापरणे , खाण्याच्या रंगात भेसळ करणे , ती भेळ नव्हे ती तर भेसळ आहे जी योग्य नाही
2 हो ना म्हणजे सर्व क्षेत्रात भेळ आहे पण भेसळ नसावी
1 तेव्हा ज्या ज्या क्षेत्रात भेळ करतांना मिश्रण करतांना मानवाने थोडी नितीमत्तेची , पदार्थाच्या वा उत्पादनाच्या गुणवत्तेची चाड ठेवली पाहिजे
2 हो म्हणजे प्रत्येक क्षेत्रात सुखद , सात्विक , चवदार, सकस कसदार , पोषक पदार्थांची . उत्पादनाची उत्तम भेळ अनुभवता येईल नाही का .