गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

मन माझे सांगे मला (संधीचा फायदा घे)ऐक मनाचा कौल

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच जळगाव
आयोजित उपक्रम
9/2/23
विषय..मन माझे सांगे मला

      ऐक कौल मनाचा

नको करत बसू विचार
आली वेळ न टाळणे
आल्या संधीचा घे फायदा
हेच अंतर मनाचे सांगणे

 संधी येत नाही पुन्हा
मन  देतय उभारी
लाव सार्थकी जीवन
घ्यावी गगन भरारी 

 असताच लोह गरम
घालावा त्यावर धाव
हाच मंत्र जीवनाचा
सर्व जनांना असे ठाव

 मार्ग असो खडतर
 शंका कुशंका नको मनी
 टाक पाऊल दृढ निश्चयाने
यश मिळेलच जीवनी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...