स्वप्न गंध साहित्य समूह आयोजित उपक्रम माझा शब्द आधारित
सर्व शब्द एका दृष्टिक्षेपात
विरहिणी , विहंगम, ओमकार, सांजवेळ, अनामिका , अवचित, रातराणी, सहकार,अनुभूती, रंगमंच,वरदान ,संवादिनी , निशिगंध ,विरंगुळा, रानोमाळ, आशीर्वाद,सहजता ,मानवता, नभांगण ,वासुदेव ,रंगगंध , दरवळ, तरुतळी , अलवार, मृगजळ,सौदामिनी, अनुराग, सहचर ,आठवण ,आईबाप, सहकारी, सुप्रभात ,कवडसे, अवखळ, करपाश,तरुणाई,अनाहुत=३७ शब्द
स्वप्न गंध साहित्य समूह आयोजित उपक्रम माझा शब्द आधारित
वरील शब्द घेऊन
अष्टाक्षरी काव्य रचना
*दिन गेला सुखात*
होता झुंजुमंजु आज
*वासुदेव* आला दारी
गाता सुरेख भुपाळी
*सुप्रभात* झाली भारी. 1
पाहताची *सहचर*
भेट घडे *अवचित*
वाटे मोद क्षणभर
मनी आवडे खचित. 2
छान *विरंगुळा* मना
भटकले *रानोमाळ*.
मजा केली *तरुतळी*
मस्त रंगली सकाळ. 3
गोड मनी *आठवण*
परतले मी सदनी.
वाजविली *संवादिनी*.
दाटे मोद मनोमनी 4
*सांजवेळ* ती समीप.
ओठी नाम *ओमकार*
लावूनिया देवा दीप.
मागितला *सहकार*. 5
सांजवात लावुनीया
उजळवू *सांजवेळ*
दरवळे *रातराणी*
जमलाची छान मेळ. 6
*आठवण* सदा ठेवू
आईबाप ते महान
शिरी त्यांचा *आशीर्वाद*
तेची मज *वरदान* 7
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शब्द 17