या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या,वाहे आनंद वारे
अलिशान महालासम वातावरण सारे
मनाची श्रीमंती येथे दिसे क्षणोक्षणी
समाधानी वृती भरली मनोमनी
अतिथी देवो भव मंत्र गुंजतो कानी
माणुसकी हा धर्म राही सदा ध्यानी
वागणुक खेळीमेळीची असे सदा सर्वदा
अहंकार मी पणा दिसत नाही कदा
थंड वा-याची झुळूक मनी देई आनंद
बहरलेल्या फुलांचा वाहे सुगंध मंद
जरी नाही भपका श्रीमंती पैशाचा
समाधानात आनंद मिळे सुखाचा