...........
कर्तृत्ववान महिला माता जिजाऊ
आठविता शिवरायांचे प्रताप
उभे रहाते माता जिजाऊंचे मूर्तीमंत रुप
तुजला कर्तृत्वान मातेचा सदा किताब
दिधलात तुम्ही पूत्र शिवबा ,अवध्या महाराष्ट्रास.
शिवारायांनी स्थापिले हिंदवी स्वराज्य
तव कृपेच्याच शिकवणी प्रसादानं
शिवराय झाले "शिव छत्रपती "महान
तुझेच कर्तृत्व झाले बिंबीत तयात.
महाभारत-रामायणातील ,कथा सांगूनी
जिजाऊंनी रुजविलेत, संस्कार तयांचे मनीं
धर्म , दया , समभावाच्या देऊनी शिकवणी
बाळकडू पाजियले शिवबांना बालपणी.
धडे घेऊन शूर वीर लढवैय्यांचे
तयार केलेत, सवंगड्यांचे शिवबांनी शूर मावळे
जे होते तयांना , प्राणाहून प्रिय असे
लढण्यास सदा तत्पर असती, बलीदानाते.
परस्त्रीला देऊन मातेचा मान
परत दिधली , सन्मानाने कल्याण सुभेदारांची सून
स्त्रियांचा सदा राखिला मान सन्मान
हीच शिकवण तुमची "जिजाऊ माते," महान.
तव स्फूर्ती ने केलेत गड सर
अद्दल घडविली शाहिस्तेखानास
एक- एक करूनी ,जिंकला सिंहगड पण
अन् मराठे शाहीचा फडकविला ध्वज.
जिच्या हाती पाळण्याची दोरी
ती जगताते उध्दारी
हीच म्हण खरी ठरविली
"जिजाऊ राजमाते" तुम्ही तुमच्या कर्तृत्वानी.
...............वैशाली वर्तक
अभा ठाणे जिल्हा समूह 1
राज्य स्तरीय अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा
12/1/22
विषय - राजमाता जिजाबाई
*कर्तृत्ववान माता*
नाव घेता शिवबांचे
जिचा पूत्र यशोवंत
राजमाता जिजाबाई
रूप दिसे मूर्तीमंत 1
धर्म दया समभाव
दिल्या सदा शिकवणी
बाळकडू पाजियले
शिवबांना बालपणी 2
गिरविले बालपणी
तव कृपा प्रसादान
कथा शौर्याच्या ऐकून
राजे घडले महान 3
सारे केले गड सर
ध्वज हिंदवी राज्याचा
तव स्फूर्तीने चढला
छत्रपती शिवबांचा 4
राजमाता जिजाबाई
दाखविली म्हण खरी
हाती पाळण्याची दोरी
तिच जगता उध्दारी 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच महाराष्ट्र राज्य आयोजित काव्य लेखन स्पर्धा
विषय .. कणखर स्री
शीर्षक. कर्तृत्ववान स्त्री
नाव घेता शिवबांचे
जिचा पूत्र यशोवंत
राजमाता जिजाबाई
रूप दिसे मूर्तीमंत 1
धर्म दया समभाव
दिल्या सदा शिकवणी
बाळकडू पाजियले
शिवबांना बालपणी 2
गिरविले बालपणी
तव कृपा प्रसादान
कथा शौर्याच्या ऐकून
राजे घडले महान 3
सारे केले गड सर
ध्वज हिंदवी राज्याचा
तव स्फूर्तीने चढला
छत्रपती शिवबांचा 4
राजमाता जिजाबाई
दाखविली म्हण खरी
हाती पाळण्याची दोरी
तिच जगता उध्दारी 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद