दुष्काळ ते सुगीचे दिन
चित्र अधारित कात्य कविता
झळा ऊन्हाच्या सहूनी
धरा पहा भेगाळली
वाट पहाते मृगाची
पाण्यासाठी आसुसली
वाट पाही बळीराजा
काळ्या ढगांना पाहूनी
दृष्टी तयाची आकाशी
वरुणास विनवूनी
कष्ट करुनी उन्हात
काळ्या मातीला कसून
नांगरली काळी माय
घाम तयात गाळून
पाणी पडले मृगाचे
बीजे पहा अंकुरली
आनंदला अन्नदाता
स्वप्ने मनी रंगवली
शेते दिसती हिरवी
किती सुरेख रेखीव
जणू रेखाटल्या कोणी
ओळी हिरव्या आखीव
शोभिवंत भासे शेत
मोती जणू कणसात
वरुणाच्या कृपेनेच
सुख आले शिवारात
पीक आले भरघोस
मोल मिळाले कष्टाचे
दिसे दारी धान्य रास
दिन दाविले सुगीचे
देवाजीने केली कृपा
स्वप्न सत्यात उतरले
राजा राणी पोरं बाळे
घर सारे आनंदले.
आनंदाने गृहलक्ष्मी
पाही तिच्या धन्याला
धनी माझा राहो सुखी
करी विनंती देवाला
......वैशाली वर्तक.
चित्र अधारित कात्य कविता
झळा ऊन्हाच्या सहूनी
धरा पहा भेगाळली
वाट पहाते मृगाची
पाण्यासाठी आसुसली
वाट पाही बळीराजा
काळ्या ढगांना पाहूनी
दृष्टी तयाची आकाशी
वरुणास विनवूनी
कष्ट करुनी उन्हात
काळ्या मातीला कसून
नांगरली काळी माय
घाम तयात गाळून
पाणी पडले मृगाचे
बीजे पहा अंकुरली
आनंदला अन्नदाता
स्वप्ने मनी रंगवली
शेते दिसती हिरवी
किती सुरेख रेखीव
जणू रेखाटल्या कोणी
ओळी हिरव्या आखीव
शोभिवंत भासे शेत
मोती जणू कणसात
वरुणाच्या कृपेनेच
सुख आले शिवारात
पीक आले भरघोस
मोल मिळाले कष्टाचे
दिसे दारी धान्य रास
दिन दाविले सुगीचे
देवाजीने केली कृपा
स्वप्न सत्यात उतरले
राजा राणी पोरं बाळे
घर सारे आनंदले.
आनंदाने गृहलक्ष्मी
पाही तिच्या धन्याला
धनी माझा राहो सुखी
करी विनंती देवाला
......वैशाली वर्तक.