शनिवार, २७ जून, २०२६
कधी येशील गगनी सूर्योदय
शुक्रवार, २६ जून, २०२६
अभंग. पैसा
सिद्ध साहित्यिक समूह
मोठा अभंग
विषय .. पैसा
असताना पैसा | तुकविती मान |
करीती सन्मान.| जनामधे ||
पैसा हवा तर | महेनत हवी. |
शोधा युक्ती नवी | मिळे पैसा ||
जीवनात आहे.| पैसा महत्त्वाचा |
दिसे प्रभुत्वाचा | जगभरी. ||
किंमत पैशाची. | असतेच भारी |
दिसतेच न्यारी |सर्व जगी. ||
जन्मभर धावे| पैशासाठी तरी |
येत नाही परी | शेवटाला. ||.
जाणावी किंमत |पैसा येतो कामी |
पूर्णत्वाची हमी | देतो मनी.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
गुरुवार, २५ जून, २०२६
किटी\ हळदीकुंकू
चित्र काव्य
भासे हिमगिरी अचल
स्वरूप पाही जलाते
पुन्हा पुन्हा निरखुनी
येता रवी राजे नभाते
नाना रंगी उधळण
केली रवीने नभात
भासे चित्ताला वेधक.
आशा देतसे मनात
तरू जणु उभे रांगेत
पुष्पें पहा उमलली
करी स्वागत रवीचे
भासे ऊषा हासली
केली तयाने तयार
कुठे अथांग सागर
घनदाट ती वनराई
तर उंच उत्तुंग शिखर
रूप पाहून सृष्टीचे
कर सहज जुळती
किती सुंदर निसर्ग
जाणा देवाची महती
वैशाली वर्तक
गाऊ गुणगान बॉरडरलेस पॅन्थर्सचे
बॉडरलेस पॅन्थर्स साहित्य परिवार आयोजित
स्पर्धा, उपक्रम क्रमांक १७
दि ९\५\२६
विषय ...बॉरडरलेस पॅन्थर्स सामाजिक साहित्य चळवळ
शीर्षक. *गाऊ गुणगान बॉरडरलेस पॅन्थर्सचे*
बॉरडरलेस पॅन्थर्स समूहच असा की
साहित्या संगे करे,सामाजिक कार्य हमखास.
त्यात माणुसकी रूजविणे वाढविणे
हेची असे ध्येय समूहाचे खास.
चौथ्यावर्षात केले पदार्पण
स्नेह संमेलनासाठी सहभागी झाले गोळा
शेतकीय, वैद्यकीय, शैक्षणिक मदत करत
समूहाने केला साजरा सोहळा.
समूहात आहेत दाते पण अनेक
करीती अन्न वैद्यकीयदान तसेच वृक्षाचेरोपण
असा बहुगुणी बॉर्डरलेस पॅन्थर्स समूह हो!
ज्ञान ,सणवार,व्यायाम सह, जपतो पर्यावरण .
समूही पूजा ताई रांगोळी कलावंत
सजविते वारीत पथ कलाकृतीने सुंदर
साहित्या संगे रोज द्या, बुध्दीस चालना
अन् खाद्य पदार्थांची चव घ्यावी पळभर
रात्रीस चारोळी समूह मजेचा
सारस्वतांना मिळे लेखणीचा मान
देत प्रतिक्रिया एकमेकांना
करी लेखन राखून वेळेचे भान
असा हा बॉर्डरलेस पॅन्थर्स समूह
किती करावे त्याचे गुणगान
झाला आहे जग विख्यात
आहे मी सदस्य याचा मज अभिमान
वैशाली वर्तक
अहमदाबाद
बुधवार, २४ जून, २०२६
म्हणी वरून ... प्रयत्नाती. परमेश्वर
अभा म सा प समूह महाड तालुका
26/5/21
विषय - प्रयत्ननांती परमेश्वर
काहीच प्रयत्न न करिता
नशीबात असेल तर मिळणार
म्हणून बसता आरामात
हाती काही नाही येणार
जसे प्रयत्न कराल कामात
यश देव देत असतो
प्रयत्नांची करा पराकाष्ठा
हसतमुखे देव दिसतो
न हलवता हातपाय पाण्यात
कसे तरुन जाणार किनारा
करिता प्रयत्न अखंड मग
, मिळेल देवाचा सहारा
शिक्षक सांगती करा यत्न
मिळवाल सारे सुंदर यश
राहू नका देवावर विसंबून
येईल मग खचितच अपयश
कितीदा पडतो खाली
साधा किटक कोळी
तरी प्रयत्न न सोडी
बांधतांना त्याची जाळी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सोमवार, २२ जून, २०२६
मौन
मृदगंध
विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अष्टाक्षरी काव्यलेखन विषय मृदगंध किती वसुने साहिल्या तप्त उन्हाच्या झळा काया तिची भेगाळली भासे ज...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...


