शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

#लेख.. महाचर्चा __ साहित्यिक _ कोण?

# महा चर्चा _ साहित्यिक  - कोण?
    मनुष्य   जन्मतो आणि  त्याच्या मातृभाषेत तो बोलायला शिकतो. भाषा ही त्याला विचारांचे   आदान प्रदान करायला  उपयोगी ठरते. मेंदू ने मनुष्याला   विचार
करण्याची शक्ती  मिळते.आणि भाषा  ही  एकमेकांना  विचार देण्या घेण्याचे  माध्यम बनते. मग ती भाषा  कुठली का असेना.
    भाषेमुळे आपण ज्ञान  मिळवितो.  आईच्या कडून तान्हे असतांना शिकविलेली भाषा ती मातृभाषा  समजली जाते.
   आपल्या मराठी  भाषेतील चोखा मेळा ,बहिणाबाई ,तुकाराम, नामदेव ,रामदास  हे  फार शिकलेले नव्हते पण   जीवन कसे जगावे , काय वाईट, काय चांगले बद्दल चे त्यांचे विचार  त्यांनी   सामान्य जनतेला समजतील अशा भाषेत   सांगून , लिहून  ते  व्यक्त झालेत. साहित्य  म्हणजे प्रत्येकाच्या मनातील उचळंबून आलेल्या विचारांची मालिका, जी  कथन करून  वा लेखाणातून  व्यक्त केलेली असते.    तेव्हा या सा-या संताना  त्या काळचे साहित्यिक म्हटले जातात .  जसे ज्ञानेश्वरांनी  ज्ञानेश्वरी लिहून जनतेला अमृततुल्य ज्ञान दिले. तसेच संतांनी संत वाणी जगासमोर मांडली . ह्या सा-या संतांनी मराठी भाषा समृध्द केली व ते त्या काळातील साहित्यिक  झाले ठरले. .
     पुढे जनतेने त्या साहित्याचे वाचन करुन स्वतःच्या ज्ञानात भर करुन , स्वतः नी साहित्याची  सेवा केली, भर केली. जसे अभ्यास शिकणारा विद्यार्थी , कुठलाही खेळ शिकणारा खेळाडू   ,  गायन शिकणारा गायक , वादन शिकणारा  वादक .तसे साहित्य  लिहीणारा -वाचणारा , विचार  लिहून /बोलून व्यक्त  होणारा साहित्यिक .मग भले त्याच्या वैचारिक  वा त्याच्या  बुद्धी  प्रमाणे तो साहित्य  लिहीण्याचा प्रयत्न  करतो-लिहीतो. पण  तो साहित्यिक तर खराच ना .!
     कुठल्याही  कलाक्षेत्रात निपुणता मिळवणारा अथवा निपुणते साठी प्रयत्न  करणारा त्या त्या क्षेत्राचा विद्यार्थी  वा कलेच्छु असतोच ना.
    मी तर म्हणेन आपल्या  साहित्यिक  ग्रुपचे सारे सदस्य  मग ते वाचक असो  वा लेखन करणारे  ते पण साहित्यिक  .भले रोज लिखाण करणारे असोत वा नसोत. पण दुस-यांचे लिखाण वाचून त्यांच्या ज्ञानात भर   होते वा आनंद मिळवतात.व वाचल्यावर त्यांचे  स्वतः चे विचार  व्यक्त करतात अथवा न आवडल्यास त्या लिखाणाचे टीकात्मक टिपण करतात. चिकित्सा करण्यास मुद्दे सुद  प्रत्युत्तर मांडतात . तर काही जण लिखाणाचे मनन, चिंतन ,  विवचन  करतात ते सारे साहित्यिक  मधे गणले जातात. जेव्हा वाचनात गोडी असते रुची असते तेव्हाच त्या लेखनाचे वाचन घडते. म्हणजे साहित्याचा अंश असतोच ना.
      असे नव्हे की प्रत्येकाने कविता ,लेख ,कथा , लघुकथा वर्णने लिहीली तरच तो  साहित्याची आवड असणारा , साहित्याची  कुठल्याही प्रकारे जतन व वृध्दी करणारा हा साहित्यिक च होय.

वैशाली वर्तक

      

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

आनंदी क्षण

स्पर्धेसाठी

 सदा लाभो सुख आनंद
सदा बहरो तव लेखणी
हेच शुभ आशीष तुज
 या आजच्या आनंदी क्षणी
  .......वैशाली वर्तक  11/1/2020

बंधुप्रेम

उपक्रम  बंधुप्रेम (अष्टाक्षरी)

बंधुप्रेम ते निखळ
राम लक्ष्मणाची जोडी
आहे ती जग जाहीर
बंधुत्वाची दावी गोडी

रक्षा बांधता भावास
जरी असता लहान
उभा राही सदा पाठी
जगी बंधुप्रेम महान

कृष्ण भाऊ द्रौपदीचा
धाव घेई तिच्या साठी
येता प्रसंग  कठीण
उभा होता सदा पाठी

बालपणी दंगामस्ती
विसरुन भाऊराया
सदा दावी प्रेमभाव
बहिणीची वेडी माया

येता भाऊबीज सण
धाव घेते भावापाशी
त्याच्या प्रेमळ मायेची
नाही तुलना कोणाशी

वैशाली वर्तक

🙏🏻
प्रजित साहित्यिक  समूह
आयोजित अष्टाक्षरी काव्य लेखनस्पर्धा.
विषय - भाऊबीज

बंधुप्रेम ते निखळ
भावा  बहिणीची जोडी
आहे ती जग जाहीर
दावी  निरंतर गोडी

रक्षा बांधता भावास
जरी असता लहान
उभा राही सदा पाठी
जगी बंधुप्रेम महान

कृष्ण भाऊ द्रौपदीचा
धाव घेई तिच्या साठी
येता प्रसंग  कठीण
उभा रहा सदा पाठी

बालपणी दंगामस्ती
विसरुन भाऊराया
सदा दावी प्रेमभाव
बहिणीची वेडी माया

येता भाऊबीज सण
धाव घेते भावापाशी
त्याच्या प्रेमळ मायेची
नाही तुलना कोणाशी

नको काही उपहार
रहा सदा आनंदात
आठवण राहो मनी
बहिणीची  हृदयात


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 


वैशाली वर्तक

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

मतदान हक्क माझा


स्पर्धेसाठी -----
    मतदान  हक्क  माझा               19/10/2019

मतदान  असे हक्क आपुला
कधीही  हे नका विसरु
सारी कामे बाजूस सारुनी
आवर्जुन आधी मतदान करु
     अनेक प्रकारचे  असे दान
     रक्त दान, नेत्र दान, देहदान
     अधिकार दिलाय संविधानाने
     बजाविण्या  "हक्क माझा मतदान "
मतदानात नको उदासीनता
एका  मताधिकाराचे तुम्ही भागीदार
एक एक मत मिळूनच होतो मत-सागर
निवडला जाईल देशाचा शिलेदार
       कधी न पडता बळी प्रलोभननांना
       नका विकू आपुल्या पवित्र मताला
        नैतिक तेने मतदान करुनी
        सदा स्मरुया आपुल्या संविधानाला
मतदान आहे पवित्र कार्य
करावे सर्वांनी समजून उमजून
अन्यथा  येईल अयोग्य  नेता
मतदानाची वेळ , जाता टळून.

वैशाली वर्तक*स्पर्धेसाठी*
मतदान माझा अधिकार स्पर्धा 
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश, ठाणे जिल्हा 
आयोजित भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा.
विषय...*मतदान माझा  अधिकार*    
शीर्षक... मतदान हक्क आपुला

मतदान  असे हक्क आपुला
कधीही  हे नका विसरु
सारी कामे बाजूस सारुनी
आवर्जुन आधी मतदान करु.
     अनेक प्रकारचे  असे दान
     रक्त दान, नेत्र दान, देहदान
     अधिकार दिलाय संविधानाने
     बजाविण्या  "हक्क माझा मतदान "
मतदानात नको उदासीनता,
एका  मताधिकाराचा मी भागीदार
एक एक मत मिळूनच होतो मत-सागर
निवडला जातो देशाचा शिलेदार
       कधी न, पडता बळी प्रलोभननांना
       नाही विकणार  माझ्या पवित्र मताला
        नैतिकतेने मतदान करुनी
        सदा स्मरीन आपुल्या संविधानाला
मतदान आहे पवित्र कार्य
करावे सर्वांनी समजून उमजून
अन्यथा  येईल अयोग्य  नेता
मतदानाची वेळ , जाता टळून.

वैशाली वर्तक.
अहमदाबाद.

तुज पाहता साजणी

मेघ   दुरोळी
    विषय --तुज पाहता साजणी ...
वर्ण  -- 11
तुज पाहता सहज साजणी
वेड लागले तुझे या लोचनी

वाटे  रुप  ते साठवावे ध्यानी
हाच छंद जडला माझ्या मनी.

काय म्हणू मी माझ्या या वेडाला
कसे  समजावू  मम  मनाला

येता क्षणिक दृष्टी  समोरूनी
मन सुखावते तुला पाहूनी

समजेना अजूनी माझे मला
कसे सांगू  मनीचे भाव तुला

.....वैशाली वर्तक..15/10/2019

.

देवा सरु दे माझे मी पण

-देवा सरु दे माझे मी पण
ओळ काव्य

देव जर मला भेटला
सांग तव ईच्छा म्हणाला
आधी मागीन मी  तयाला
संपव माझ्यातील मी पणाला

  षडरीपूंनी जग हे भरलेले
  दूर तया  सारण्या दे शक्ती     
  तूच भर भाव मम हृदयी
 मी पण  सारण्या घडो भक्ती

विसर न व्हावा कधी तुझा
घडू दे निरंतर तव सेवा
सरू दे माझे मी पण
 द्यावा हाची कृपेचा ठेवा

 वृक्षलता करती उपकार
तशीच घडो सेवा हातूनी
न दाविता अहम भाव
सरु दे  मी पण मनातूनी

हेची दान दे देवा आता
आले मी तुला शरण नाथा
सरु दे देवा माझे मी पण
टेकवीते  तव चरणी माथा

    वैशाली वर्तक 

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...