माझी शाळा घराच्या अगदी जवळ होती. जसे बालमंदिर जवळ होते . त्यामुळे सोडायला व घ्यायला येणे भानगड नव्हती . शाळा प्रायमरी म्युनिसिपाल्टीची व हायस्कूल फक्त महाराष्ट्र शिक्षण मंडळ चे . सर्व मराठी लोकांसाठी एकमेव एकच होते .. प्रायमरी शाळा मावळंकरांच्या जुन्या वाड्यात भरायची . एक ते सातवी पर्यंतचे वर्ग चालायचे . मुनिसिपाल्टीच्या प्रायमरी शाळा बऱ्याच आहेत . बऱ्याच एरिया प्रमाणे , आमच्या शाळे च्या बाजूला छोटी दुकाने जेथे गोळ्या , पेपरमिंट , बोरे , विलायती चिंचा घेऊन बाई बसायची . मुली तिच्या कडून विकत घ्यायच्या . माझ्या बाल मनास पण विकत घेण्याचे मन झाले . आई बाबा आमच्या घरी पैसे कधीच कडी कुलूपात ठेवत नव्हते . स्वयंपाक खोलीत एक भिंतींतले कपाट होते .त्यात एका पातेल्यात पैसे ठेवले असायचे . एकतर आजी घरात असायची व घरात दुसरे कोणी येणारे जाणारे नसायचेच. . तेव्हा मी सहज त्या पातेलीतून आजीला न सांगता २ पैसे तर कधी ३ पैसे घेत गेले. व कधी गोळी तर कधी काही विकत घेतले . एक दोनदा तर आजीला पण आणून दिले . तिने विचारले ,"अग तुझ्या जवळ कुठून आली गोळी तर चक्क मैत्रिणींनी दिली असे खोटे सांगितले. असे ३/४ वेळा केले असावे .. तरी आजी म्हणायची अग शाळा सुरु होताच तुझ्या मैत्रिणी बरे विकत घेतात, तर मी चक्क म्हणाली , " हो ना . ,कारण त्या लांबून येतात ना .... ".. . पण एकदा वर्गात ,मराठी विषयात गुरुजी म्हणी शिकवत होते . त्यात एक म्हण शिकवण्यात आली ".झाकली मूठ सव्वालाखाची " गुरुजींनी त्यावेळी काय अर्थ शिकविला तितका लक्षात नाही . पण, माझ्या मनाने मला समजविला शिकविलेला ,अथवा मनाने घेतलेला अर्थ असा की जो पर्यंत चोरी उघडकीस येत नाही तोवर ठीक आहे . आपण पैसे न विचारता घेतले आता अशी चूक करता कामा नाही . आणि त्या दिवसा नंतर मी कधीच न सांगता पैसे घेतले नाहीत. खरच शिकवण , शिक्षण कसे माणसास घडवते हे त्या म्हणींचे ज्वलंत उदाहरण