शनिवार, २ जुलै, २०२२

चित्र काव्य

कल्पतरु जागतिक साहित्य  मंच 
आयोजित  उपक्रम  
अष्टाक्षरी काव्यलेखन
विषय - चित्र  काव्य

    हसली ग नारी

वाट तरी किती पाहू 
मंदावले बघ तारे  
शशी बिंब अंधुकले
 रूप निशेचे पहा रे


घाई खगांना जाहली
घेण्या भरारी गगनी
वाट पाहूनी थकली
सांगू कोणा न सजणी

येता  झुळुक वा- याची
उठे जलात तरंग 
दावी शशी तो स्वरुप
नारी पहाण्यात दंग

जलाशयी शशी बिंब
घेई हसूनी निरोप   
रहा अशीच हसत
नको दाखवूस  कोप

दिला सांगावा वा-याने
झणी नारीस कानात
विलसले हास्य मुखी
आनंदली ती मनात

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, ३० जून, २०२२

होऊया आता डोळस

दृष्टी  असून का वागे
 अंध मानवा प्रमाणे
कर मोठा दृष्टी कोन
वाग विशाल मनाने
 
पहा जगाकडे जरा
झाला आहेची प्रगत
आता होऊया डोळस
नको जगणे कुढत

दान देण्याच्या कल्पना
नाही राहिल्या सिमीत
पहा किती बदलल्या
 त्याही  झाल्या  विकासीत

:विसरूनी जातीभेद
देऊ मान समतेला
पसायदानानी दिला
मंत्र सा-या जगताला



नसे कोप  निसर्गाचा ,      
करु वृक्षाचे रोपण
वाढवुया वनश्रीला
जपू ते पर्यावरण

मंगळवार, २८ जून, २०२२

वारकरी

अ भा ठाणे जिल्हा  समूह १
आयोजित 
उपक्रमासाठी
विषय - वारकरी

     *वैष्णवांचा मेळा*

घेता नाम विठ्ठलाचे
 दिसे डोळा वारकरी
विठ्ठलाच्या गजरात
धरुनीया ध्वजा करी


  दर्शनाची  मनी आस
वारकरी टाके पाऊल
कधी जाईन वारीस 
 आषाढात लागे चाहुल

नित्य  नेमाने करी वारी
 चिपळ्या घेऊन हाती
सारे वैष्णव जमती
एकमेकाचे होती साथी


इतका भक्ती भाव वसे
दिसे  विठु एकमेकात
मधेच रिंगण करिता
माऊलीच्या गजरात

न आडवी वारा पाणी
डोळ्या सदा विठु मूर्ती 
उल्हासात येई गती
विठुरायाच देई स्फूर्ती 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सोमवार, २७ जून, २०२२

हर्ष मनी रहावा

लालित्य नक्षत्र वेलसमूह
अंत्य ओळ लेखन
विषय - हर्ष मनी रहावा


सदा मना सारखे... मनाजोगे  मिळणे ..वा होणे. असे जीवनात होत असता.मग काय हर्ष  ,आनंद होत असतोच .नेहमीच देवा कडे मागावे व त्याने उदार हस्ते  आपणास द्यावे. मग  काय आनंदी जग आयुष्य असते. सुखाच्या पायघड्या देवाने घालून ठेवल्या सारखे वाटते. तसेच माझे काहीसे झालेय.
   खरच देवावरील दृढ विश्वास ...नशीब  ..भाग्य   अथवा 
माझ्या  सारखी मीच ..आहेच जीवनात हर्षाने भरलेली आहे. 
अर्थात  समाधानी वृत्ती  हे खरे कारण असेल . 

बालपणापासूनची आजीची...नंतर ,  आईबाबांची  शिकवण.
मनी हर्ष सदा भरलेला.   वृत्ती च आनंदी समाधानी  ...याचे  कारण आहे ...आपल्या जवळ आहे त्यात समाधान मानणे. 
ही सदैव शिकवण ...त्यामुळे  मोठे  धन होते मनात ...समाधान.
   अशा संस्कारात  मोठी झालेली त्यात 
            भाग्य उजळले ... यांच्या सारखे पती लाभले. सुंदर  दृष्ट लागेल असा संसार  झाला ..गोंडस मुले. व कन्या दानाचे पण पुण्य..... कन्या रत्न  प्राप्त झाल्याने ते ही पदरी  लाभले .
तिला मोठे करण्यात माझी हौस मौज पूर्ण  केली ..झाली.
       प्रत्येकाने  मुलांनी मुलीने कर्तृत्वाने  दृष्ट लागेल असे संसार थाटले. वेळेनुसार आजी आजोबाची पदवी पण मिळाली. 
        आता खरच 
"घरात हसरे तारे असता 
मी पाहू कशाला नभाकडे"
ह्या गाण्यांच्या ओळी गुणगुणत ...देवाला स्मरतेय.
असा  देवानी आभाळभर हर्ष दिला आहे . कारण देवाने काय दिलय याचाच हिशोब जीवनी ठेवलाय . म्हणून म्हणते, "  हर्ष
हा  मनी रहावा. 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

रविवार, २६ जून, २०२२

विरह अभंग

स्पर्धेसाठी
कल्पतरु जागतिक साहित्यमंच
आयोजित  
आभंग लेखन स्पर्धा
20/6/22
विषय - विरह

         व्यथा ऊर्मीलेची
न साहे विरह    । कसे कंठु दिन। 
 मन होई क्षीण    । विरहाने       ।। 

वाटे  तू समीप  ! तर कळे भास । 
 मनी तुझा ध्यास !  लागे जीवा   ।। 

कितीदा धाडिला ।  तुजला सांगावा  । 
सोड ना रुसवा !  आता तरी          ।। 

नको वाटे रात्र  ।  जग हे खुशीत । 
अश्रूंच्या कुशीत ! होते सदा         ।। 

 
रामाच्या सेवेत  ।  कृतार्थे जगला । 
भाव न  जाणिला  । उर्मीलेचा        ।। 


विरह सोशिला ।  मी राज मंदिरी  । 
दुःख ची अंतरी  ! नशिबाला       ।। 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

प्रयत्नांती परमेश्वर

सिध्द  साहित्यिक  समूह 
आयोजित  उपक्रम 
काव्य लेखन
विषय - प्रयत्नांती परमेश्वर


प्रयत्नांती परमेश्वर 


प्रयत्ना अंती परमेश्वर
म्हण आहेची उचित
करिता पराकाष्ठा श्रमाने
यश मिळतेच खचित

दिधले देवाने शरीर
करावे प्रयत्न खडतर
मिळाले यश तेनसिंगला
सर केले  एवरेस्ट शिखर 


साधा किटक कोळ्याच्या
  जवळी   असे प्रयत्नाची ठेव
पराकाष्ठे पूर्ण  करी जाळे
मानवास  दिसे प्रयत्ने रुपी देव


झटून अभ्यास करिता
 देतो ईश्वर सुयश उज्वल 
मनाजोगा येतो  परिणाम 
प्रयत्ने मिळे, हे मत प्रांजल

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...