रविवार, ८ एप्रिल, २०१८

फजिती


फजिती
              मला फार फुशारकी होती, म्हणजे आहेच की माझ्या इडल्या खूपच हलक्या , स्पाँजी बनतात वा नेहमी  बनतात असे म्हणा. म्हणजे सर्वांच्याच होत असतील पण मला माझ्या इडल्यांची ,छानच होतात अशी गोड समजूत आहेच.
             मी माझ्या च तंद्रीत होते. व स्वतः  ठरविले उद्या  इडलीच नासत्याला करुया.आणि हो , हल्ली कसे तयार इडली ढोस्याचे तयार वाटून पीठ , सर्वत्रच मिळू लागले आहे. तसे पूर्वी  मिळत नव्हते त्यामुळे अचानक आता सारखे इडली ढोसे तयार करता येत नव्हते.
           मी माझ्या अंदाजाने ,माझ्या कृतीने तांदळाचा रवा व उडीद डाळ तीनास /एक च्या प्रमाणात घेउन, भिजवून,व  रात्रीच   वाटून मस्त इडली पीठ तयार करून ठेवले व रात्र भरात छान फरनटेशन (फसफसेल) होइल व इडल्या नक्कीच नेहमी सारख्याच मस्त होतील. या विचाराने सर्वांना उद्या सकाळी अनायसे रविवार ,तर मस्त इडली चटणीचा ब्रेक फास्टआहे  बर का!  असे घोषित पण केले .
         रात्री ,आम्ही उद्या रजेचा दिवस म्हणून गप्पा करत बसलो. गप्पा छान रंगल्या. रात्री झोपण्या अगोदर अगदी मंद आचेवर दूध तापविण्यास ठेवले होते. ते तापले नंतर ते उतरवून थंड झाल्यावर फ्रीज मधे ठेवले . मग झोपायला जाताना अगदी 
बारीक  गॅसवर ,ज्यावर दूध तापविले होते. त्या बर्नलवर इडलीच्या पीठाचे पातेले ठेवले की गॅस  गरम होता तर उष्णतेने अजून छान फर्मनटेशन होईल. फसफसण्यासा मदत होईल हा मनात विचार .
         सकाळी उठून कीचन मधे आले. चहाची तयारी करण्यासाठी गँसवरून पातेले खाली उतरविण्यास हात लाविला..,तर इडली पीठाचे पातेले गरम . ते कसे काय ? म्हणून झाकण सारून पाहिले ....तर काय ...? सर्व पीठाची एकच इडली . ती पण न फुगलेली .म्हणजे गॅस  तसाच चालू राहिला,होता.अगदी लहान गॅस व   पातेले भले मोठे जाड बुडाचे  त्यामुळे जळले नाही . पण माझ्या छान इडलीचा एकच इडलेश्वर झाला होता. सकाळच्या ब्रेक फास्टची मी फुशारकीने वाच्यता केली होती की माझी नेहमी च इडली   मस्त  असते .त्या इडली ची पूर्ण  वाट लागली. व ईडली चटणी नास्त्याची  पण पूर्ण वाट लागली होती.व चेष्टेचा विषय झाला  ते वेगळेच .आणि  माझी  मात्र खुशखूशीत फजिती झाली.

वैशाली वर्तक.



वरचे च सुधारणा करून 


शब्द रजनी साहित्य समूह आयोजित 
स्वैर लेखन उपक्रम 
फजिती 

आनंदाचे, सुखाचे , गंमत मस्तीचे, कधी रागाच्या रागाने वाद विवाद विकोपाला 
जाऊन भांडणाचे असे अनेक प्रसंग घडत असतात व आठवणीत पण रहातात.
काही काळानंतर विसर पण पडतो. पण कधीतरी एकदम आठवतात.तशीच
माझी एक ... खुसखुशीत झालेली माझीच फजिती सांगते हं.हो स्वतः ची
फजिती वर्णन करून सांगायला धैर्य वा तेवढे स्पोर्टस मन स्पिरिट वा खेळाडू वृत्ती पाहिजे. तर सांगायचे.....
              मला फार फुशारकी होती, म्हणजे आहेच की माझ्या इडल्या खूपच हलक्या , स्पाँजी बनतात वा नेहमी  बनतात असे म्हणा. म्हणजे सर्वांच्याच होत असतील पण मला माझ्या इडल्यांची ,छानच होतात अशी गोड समजूत आहेच.
             मी माझ्या च तंद्रीत होते. व स्वतः  ठरविले उद्या  इडलीच नास्त्याला करुया.आणि हो , हल्ली कसे तयार इडली ढोस्याचे तयार वाटून पीठ , सर्वत्रच मिळू लागले आहे. तसे पूर्वी  मिळत नव्हते त्यामुळे अचानक आता सारखे इडली ढोसे तयार करता येत नव्हते.
           मी माझ्या अंदाजाने ,माझ्या कृतीने तांदळाचा रवा व उडीद डाळ तीनास /एक च्या प्रमाणात घेउन, भिजवून,व  रात्रीच   वाटून मस्त इडली पीठ तयार करून ठेवले व रात्र भरात छान फरनटेशन (फसफसेल) होइल व इडल्या नक्कीच नेहमी सारख्याच मस्त होतील. या विचाराने सर्वांना उद्या सकाळी अनायसे रविवार ,तर मस्त इडली चटणीचा ब्रेक फास्टआहे  बर का!  असे घोषित पण केले .
         रात्री ,आम्ही उद्या रजेचा दिवस म्हणून गप्पा करत बसलो. गप्पा छान रंगल्या. रात्री झोपण्या अगोदर अगदी मंद आचेवर दूध तापविण्यास ठेवले होते. ते तापले नंतर ते उतरवून थंड झाल्यावर फ्रीज मधे ठेवले .मग गॅस बंद केला समजून झोपायला गेले. जाताना अगदी बारीक  गॅसवर ,ज्यावर दूध तापविले होते. त्या बर्नलवर इडलीच्या पीठाचे पातेले ठेवले की गॅस  गरम होता तर उष्णतेने अजून छान फर्मनटेशन होईल. फसफसण्यासा मदत होईल हा मनात विचार .
         सकाळी उठून कीचन मधे आले. चहाची तयारी करण्यासाठी गँसवरून पातेले खाली उतरविण्यास हात लाविला..,तर इडली पीठाचे पातेले गरम . ते कसे काय ? म्हणून झाकण सारून पाहिले ....तर काय ...? सर्व पीठाची एकच इडली . ती पण न फुगलेली .म्हणजे गॅस  तसाच चालू राहिला,होता तर ! अगदी लहान गॅस व   पातेले भले मोठे जाड बुडाचे  त्यामुळे जळले नाही . पण माझ्या छान इडलीचा एकच इडलेश्वर झाला होता. सकाळच्या ब्रेक फास्टची , मी फुशारकीने वाच्यता केली होती की माझी नेहमी च इडली   मस्त  असते .त्या इडली ची पूर्ण  वाट लागली. व ईडली चटणी नास्त्याची  पण पूर्ण वाट लागली होती.व चेष्टेचा विषय झाला  ते वेगळेच .आणि  माझी  मात्र खुशखूशीत फजिती झाली.
असा तो गंमतीशीर प्रसंग..

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




तितिक्षा हास्य कथा स्पर्धा 
तितिक्षा इंटरनॅशनल आयोजित भव्य राज्यस्तरीय 
हास्य कथा लेखन स्पर्धा 

फजिती 


आनंदाचे, सुखाचे , गंमत मस्तीचे, कधी रागाच्या रागाने वाद विवाद विकोपाला 

जाऊन भांडणाचे असे अनेक प्रसंग घडत असतात व आठवणीत पण रहातात.

काही काळानंतर विसर पण पडतो. पण कधीतरी एकदम आठवतात.तशीच

माझी एक ... खुसखुशीत झालेली माझीच फजिती सांगते हं.हो हो स्वतः ची

फजिती वर्णन करून सांगायला धैर्य वा तेवढे स्पोर्टस मन स्पिरिट वा खेळाडू वृत्ती पाहिजे. तर सांगायचे.....

              मला फार फुशारकी होती, म्हणजे आहेच की माझ्या इडल्या खूपच हलक्या , स्पाँजी बनतात वा नेहमी खरोखरीच  बनतात असे म्हणा. म्हणजे सर्वांच्याच होत असतील पण मला  मात्र माझ्या इडल्यांची ,छानच होतात अशी गोड समजूत आहेच.
  शनिवार होता.   शनिवार रविवार म्हणजे बाहेर जाणं वा कोणाला घरी बोलावणे  ...चालतेच ना. त्यालाच विक end साजरा करणे असे म्हणतो. सबंध  आठवड्याचा शिळोपा काढणे . आम्ही पण बाहेर जाऊन आलो होतो.
             मी माझ्या च तंद्रीत होते. व स्वतः  ठरविले चला बरेच  दिवसात घडली बनविली नाही. तसे १५ दिवसांनी south indian पदार्थाचा नंबर असतोच. तर उद्या  इडलीच नास्त्याला करुया.आणि हो , हल्ली कसे तयार इडली ढोस्याचे तयार वाटून पीठ , सर्वत्रच मिळू लागले आहे. तसे पूर्वी  मिळत नव्हते त्यामुळे अचानक आता सारखे इडली ढोसे तयार करता येत नव्हते.
    पण मी माझ्या अंदाजाने , मद्रासी मैत्रीणी ला विचारून तसेच माझ्या कृतीने तांदळाचा रवा व उडीद डाळ तीनास /एक च्या प्रमाणात घेउन, भिजवून,व  रात्रीच   वाटून मस्त इडली पीठ तयार करून ठेवले व रात्र भरात छान फरनटेशन (फसफसेल) होइल व इडल्या नक्कीच नेहमी सारख्याच मस्त होतील. या विचाराने सर्वांना उद्या सकाळी अनायसे रविवार ,तर मस्त इडली चटणीचा ब्रेक फास्टआहे  बर का!  असे घोषित पण केले . मनात विचार केला आईचं पण  घर आपल्याच  जवळ आहे तर यांना सारेजण 
 सकाळ चां morning walk घेत येथेच सारे मिळून breakfast करु. त्याप्रमाणे खीरु जास्तच तयार ठेवले. म्हणून आमंत्रित पण केले
     त्यावर लहान भाऊ बोलला पण ईडली म्हणजे ,"ताईची खासच. मी तर ताईच्या ईडली चे कौतुक खूप ऐकले आहे."
त्यावर मी ठणकावत बोलले पण ..," का रे नुसते ऐकलेच आहे ? अरे कितीदा खाल्या आहेत की!"
आज प्रथमच नाही बनवित आहे.
  हो ग ताई पण ,तुझ्या कडून तुझ्या ईडल्या चे कौतुक पुराण ऐकायला मजा येते. असे म्हणत त्याने मजाक केलीच.
व वरती म्हणाला पण , उद्या आपण ते काय ब्रंच  का,काय म्हणतात ना! तसे breakfast cum lunch करु
हो हो करत रात्री सारे घरी गेले.

        शनिवारी रात्री ,आम्ही पण उद्या रजेचा दिवस म्हणून गप्पा करत बसलो. गप्पा छान रंगल्या. रात्री झोपण्या अगोदर अगदी मंद आचेवर दूध तापविण्यास ठेवले होते. ते तापले नंतर ते उतरवून थंड झाल्यावर फ्रीज मधे ठेवले .मग गॅस बंद केला समजून झोपायला गेले. जाताना अगदी बारीक  गॅसवर ,ज्यावर दूध तापविले होते. त्या बर्नलवर इडलीच्या पीठाचे पातेले ठेवले की गॅस  गरम होता तर उष्णतेने अजून छान फर्मनटेशन होईल. फसफसण्यास मदत होईल हा मनात विचार .

         सकाळी उठून कीचन मधे आले. चहाची तयारी करण्यासाठी गँसवरून पातेले खाली उतरविण्यास हात लाविला..,तर इडली पीठाचे पातेले गर sम . ते कसे काय ? म्हणून झाकण सारून पाहिले ....तर s तर काय ...? सर्व पीठाची एकच इडली . ती पण न फुगलेली .म्हणजे गॅस  तसाच चालू राहिला,होता तर ! अगदी लहान गॅस व   पातेले भले मोठे जाड बुडाचे  त्यामुळे जळले नाही . पण माझ्या छान इडलीचा एकच इडलेश्वर झाला होता. सकाळच्या ब्रेक फास्टची , मी फुशारकीने वाच्यता केली होती की माझी नेहमी च इडली   मस्त  असते .त्या इडली ची पूर्ण  वाट लागली. व ईडली चटणी नास्त्याची  पण पूर्ण वाट लागली होती.व चेष्टेचा विषय झाला  ते वेगळेच .आणि  माझी  मात्र खुशखूशीत फजिती झाली.  आणि
आता भाऊ आई बाबा सारे येतील या काळजीने मी अगदी गडबडले.  भावाची व यांची आता काय प्रतिक्रिया याने माझी तारांबळ उडाली. भावाला तर चेष्टा करायला विषय मिळाला. राहून राहून 
ताई तुझा ईडलेश्वर दाखव ना करून माझी थट्टा मस्करी करत होता. असा घडलेला  मस्करी चा विषय 
असा तो गंमतीशीर प्रसंग.. आता गंमतीशीर वाटतो पण त्यावेळी तर मला माझ्या चूकीवर रडू का हसू कळत नव्हते.
स्वतः ची फजिती पण रंगवून सांगण्यास धैर्य लागते.

    वैशाली वर्तक 
अहमदाबाद



कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...