बुधवार, ८ जानेवारी, २०२०

तृतीयपंथी

उपक्रम नं55
तृतीयपंथी

असतील जरी तृतीय पंथी
माणूस आहेत ते याची  सदा
ठेवू आपुल्या मनी जाण
 हिणवू नये  तयांना कदा

तयांचा काय दोष त्यात
त्यांना आहे मन भावना
करा त्याच्या  मनाचा विचार
नको सदा ची अव्हेलना

सारा हा नशीबाचा दोष
 दाखविणे स्त्री त्व पुरुषत्व
यात नसतो मोठेपणा
  समाजात मान देणे यातच श्रेष्ठत्व

कुटुंबाने जरी झिडकारले
करा त्यांच्यातील  गुणांची कदर
सर्व  गुण संपन्न  नसतो कोणी
पसरवा तयांना मदतीचा पदर

आहेत आता ब-याच संस्था
देतात तयांना सम वागणूक
नको तयांना  दयेची भीक
करुया  माणुसकीची जपणूक

वैशाली वर्तक......8/1/2020

चाहुल मृत्यू ची/. मृत्यू

चाहुल मृत्यू ची

मृत्यू  शब्दच उच्चारता
जीवाला लागते हुरहुर
माहीत असूनी नक्कीच
विचारांचे दाटे काहूर

जाणार त्याच मार्गावर
जरी जाणतो आपण
दुस-याच्या मृत्यू वर
करीती शोक सारे जन


जीवन जगावे आनंदे
आनंदाने उचलावे पाऊल
 जन्माला  मरण नक्कीच                  
जरी लागता मृत्यू ची चाहुल

निसर्ग  हेची शिकवे
पहा कलिका  उमलणार
न करीता खंत  उद्याची
 जाणून उद्या कोमेजणार

मानव जन्म मिळाला आपणा
करुया तयाचे सोने सर्वस्वाने
जगुया जीवन सदा   आनंदाने
दिधले सुंदर  आयुष्य देवाने.

वैशाली वर्तक


मोहरली लेखणी साहित्य समूह 
विषय    मृत्यू 


जगी काहीच नाही निरंतर 
 नसे कसली शाश्वती 
जीवन पण ,असे क्षणभंगुर 
करिता विज्ञानाने कितीही प्रगती 

किती ही करा प्रयत्न 
टिकविण्याची जरी आस
प्रत्येक वस्तूला , व्यक्तीला
नाश हा असतोच खास 


उत्पत्ती वाढ  आणि  अंत 
या तीन्ही क्रिया होणार 
पण   हेच नित्य निरंतर 
 अमर्त्यची शाश्वती  नसणार


जलचरसृष्टी  पण नाही निरंतर 
ते पण नाही  शाश्वत 
जो पर्यंत श्वास चाले
जीवन असे अविरत


करा विचार जीवनाचा
क्षण क्षण चालला निसटून
काळ चालला सदैव पुढे 
जशी निसटते वाळू हातातुन

आजची सकाळ येत
नाही पुन्हा परतून
आला तो क्षण आनंदाचा
म्हणत उत्साहाने घ्यावे जगून

वैशाली वर्तक
अहमदाबाद

चाराक्षरी (कबीरच्या दोह्या वरुन)

चाराक्षरी
(कबीरच्या  दोह्या वरुन)

बोला सदा        
असे गोड
 वाणीनेच
मित्र जोड

गोड वाणी
बोला सदा
वर्मी शब्द
नको कदा

बोलताच
गोड वाणी
आनंदाची
ऐका गाणी

मी पणा हा
त्यजा खास
मोद मिळे
हमखास

ज्या बोलीत
असे गोडी
तीच वाणी
जग जोडी

 साखर  ही
ज्याच्या मुखी
जगता ते
तोच सुखी

 वाणीचाच
असे मान
स्वभावाची
दिसे शान

वैशाली वर्तक




     







गोडवा तुझ्या सोबतीचा लेख

गोडवा तुझ्या  सोबतीचा  ...

   सोबत ही माणसास  नेहमीच हवीहवीशी  वाटणारी बाब. .माणूस हा जात्याच सामाजिक प्राणी ..त्याला समाजात रहाणे ...समाजात वावरणे ...हे प्रिय असते. त्याला एकाकी जीवन आवडतच नाही. आदी काळात पण मानव हा  जमातीतच रहायचा. ..टोळक्यातच रहायचा. तर सांगयचे असे की प्रत्येकाला सहवास ...सोबत ही हवीच असते.
     तसेच माझा सोबती जसा माझ्या  आयुष्यात  आला त्याने माझ्या  जीवनात
त्याचे स्थान प्रस्थापित केले. ते इतके झाले..की  मला प्रत्येक  गोष्टीत त्याची मदत लागे.
त्याच्या शब्दांनी  मला मोहवून टाकले. त्याच्या सहवासाची मला ओढ लागली.
व जीवन माझे आनंदी  ..केले. त्याचा सहवास ...सोबत माझा श्वास बनला. जळी स्थळी
मला तोच दिसलेला ...वसलेला वाटतो.
   काय त्याने अशी जादू केली की , मी माझे न राहिले. व त्याच्याच मनात मी  व माझ्या  मनात तो घर करून राहत आहोत. त्याने म्हणजे ...त्याच्या सहवासाने मी सुखी जीवन वाट चालत आहे. याचे कारण त्याच्या सहवासाचा  वा सोबतीचा गोडवा हेच .
     खरच कस असते ना . आधी आई वडील ..नंतर थोडे मोठे झाल्यावर ..मित्र  मैत्रीण   जीवनात येतात. सहवास मिळण्यात तसेच सहवास वा सोबती मिळविण्यात आपण  श्रीमंत  होत जातो  म्हणजे आपले सोबतीचे विश्व वाढत जाते. .हे सारे सोबती आपले इतके अविभाज्य  घटक बनतात. की आपण त्यांच्या शिवाय राहू शकत नाही. तसेच पुढे जीवन साथी आपला सोबती जीवनात गोडवा आणतो. त्याच्या संगतीने
आपण जीवन नौका आनंदात वल्हवतो .  ...तेच माझ्या  सोबतीने मी वर  म्हटले तसे केले. व त्यामुळेच माझे सहजीवन सुखी वाटचाल करत आहे.
     अशा वेळी सहजच गाण्याच्या  ओळी गुणगुणल्या जातात
              देवा दया तुझी ही
              की शुध्द दैव लीला
               लागो न दृष्ट माझी
                माझ्या च वैभवाला (सोबतीला)
    त्यामुळे त्या देवाची परमेश्वराची ....अखंंड साथ त्याचा वरील विश्वास हा पण एक गोडवा असलेला विशेष सोबती आहे नाही का?

वैशाली वर्तक 

निरोप सरत्या वर्षाला/ (लेख) कविता


निरोप सरत्या वर्षाला

                   कोणाचे कोणा वाचून अडे,
                  सारखा काळ चालला पुढे
  अगदी खर कथित आहे .वर्षा मागून वर्ष सरतात ,आणि सरत्या  वर्षा दिवशी , म्हणजे

निरोप सरत्या वर्षाला
   चालू वर्षाला निरोप देण्याच्या दिवसाचा क्षण येऊन ठेपतो. क्षण भर मन मागे डोकावून पहाते. आठवणी वर्षभराच्या डोळ्यासमोर  दोरीचे रीळ उलगडावे तशा उलगडल्या जातात.
      आज पण आपल्या सा-यांचे तसेच झाले असणार .वर्ष भराच्या वाईट गोष्टींना विसरुन चांगल्या गोष्टी मनी स्मरुन मन सकारात्मक विचारांनी भरुन घ्यावे जेणे करुन मन प्रफुल्लित होईल व नव उत्साहाने  आनंदित होईल .
     तसेच माझ्या आठवणी प्रमाणे अथवा मी तरी "मोहरलेली लेखणी" हा समुहा याच वर्षात सहभागी झाले. .समुहाने बरेच नवीन उपक्रम  व स्पर्धा  घेतल्या गेल्या की जेणे कारणाने लेखणीस घार देण्यात खूप  मदत झाली .त्यामुळे आयोजक, संयोजकांचे, आभार व ग्राफिक्स यांनी प्रमाणपत्र  (सुंदर ) देउन प्रोत्साहित केले  सर्वांचे आभार  
    हे झाले लिखाण  संबंधित ,आता आपल्या देशाने चंद्रावर  जाण्याचा (विक्रम )यानने प्रयत्न  करुन जगात नाव मिळविले .कौतुकाची बाब .
     निसर्गाने म्हणजे वरुण राजाने मात्र  हताशा केली .सर्चव  सण गणपती,   नवरात्री, दिवाळी  आणि आता वर्षा अखेर म्हणजे  नाताळ ला पण हजरी लावत आहे. त्यामुळे
बळीराजाच्या महेनतीची परीक्षा  घेत आहे
     असो अशा चांगल्या  वाईट घडामोडी चालत 2019 आता सरत आहे. नवीन
वर्षात चांगल्या  गोष्टी होतील अशी आशा करुया. तसेच सर्वाना शुभेच्छा. आणि
 मी म्हणीन

        देऊया हर्षाने ऊत्साहाने
       निरोप सरत्या वर्षाला
      क्षण आनंदाचे आठवूया
      उधाण येईल जगाण्याला

     
      लावूनिया उत्साहाचे अत्तर
        नव वर्षाच्या आगमनाला
       येउ द्या  संकल्पनाना उधाण
        दूर सारूनिया नैराश्याला

म्हणत पुन्हा  एकदा  सर्वांना नूतन वर्षाभिनंदन

वैशाली वर्तक 








शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

निरोप सरत्या वर्षाला

काव्य आराधना स्पर्धा समूह  आयोजित  राज्य स्तरीय  स्पर्धा 
विषय - निरोप सरत्या वर्षाला
      *दृढ निश्चयाची पावले*

उत्साहाचे लाऊनी अत्तर
केले होते स्वागत हास्यमुखाने
पण काय झाले कोण न जाणे
सारे वर्ष ग्रासले महामारीने

किती जन पडले मृत्यू मुखी
भेट नाही आप्त व स्वजनांची
सारे सणवार गेले असेच
विठुची वारी पण चुकली यंदाची

किती दिवस काढले बंदिस्तात
रोज कमवणारे काय खाणार
काम नाही  तर पैसा नाही
कशी भाकरी बालकास देणार

खूप शिकविले सरत्या वर्षाने
राहिले जन माणुसकीला धरुनी
आता राहिले थोडेची दिन
जातील  तेही बंधने पाळूनी

स्वदेशीचा नारा लावूनिया
देश होईलच  आत्म निर्भर
पुन्हा  नव्याने वाहूद्या झरे
देशभराते भरभर निर्झर

नव्या वर्षाच्या स्वागता
टाकूया दृढविश्वाचे पाऊल
पळून जातील सारी संकटे
सर्वत्र  दिसेल यशाची चाहुल

वैशाली वर्तक 5/12/20
अहमदाबाद 




*सर्व धर्म समभाव साहित्य मंच
आयोजित
उपक्रम काव्यलेखन
विषय . सरत्या वर्षाला
३०/१२/२२
सरत्या वर्षाला निरोप

होते आठवण सरता काळ
  वर्षाचा आढावा घेती मनी 
काही गोड तर कटु प्रसंग
सहजची येती नजरेला क्षणी

असेच चाले  सदा जीवनी
झाल्या चुकांना सुधारूनी
नव्या क्षणाला देत उजळा
अनुभवांची शाळा घेऊ स्मरणी

जरी लक्षण दिसती विषाणूंची
 अनुभवाचे  सांगू मनोगत
स्वच्छतेने सुंदर राखू पर्यावरण
करू नव्या वर्षाचे सहर्ष स्वागत 

देऊया हर्षाने ऊत्साहाने
निरोप सरत्या वर्षाला
क्षण आनंदाचे आठवूया
 उधाण येईल जगाण्याला

  लावूनिया उत्साहाचे अत्तर
 नव वर्षाच्या आगमनाला
 येउ द्या  संकल्पनाना उधाण
दूर सारूनिया नैराश्याला

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सांजवात व ती


सोमवार, ६ जानेवारी, २०२०

घरातील पोषक वातावरण लिखाणास

घरातील पोषक वातावरण लिखाणास
लेखकासाठी घरात पोषक वातावरण
खरच आजचा विषय छान निवडला. आपण सा-या लिहीतो. जमेल तसे रोजचे लिहीण्याचा..... सहभागी  होण्याचा प्रयत्न  करतो म्हणजे घरात पोषक वातावरण असते असे नव्हे .काही वेळा शक्य होत. त्यावेळच्या परिस्थिती नुसार लिहावयास नाही जमत...तरी आपण वेळ काढून प्रयत्न करतो. 
        आता लिखाणाची आपणास आवड   हे मुळभुत सर्व  प्रथम  कारण..जी आईतून उतरली .ती शिक्षीका .मला लेखनाची आवड म्हणजे मी  साधे सासुबाईंना मुले लहान असतांना (inland)पाठवायची
     तर त्या किती खुश व्हायच्या.कारण त्यांच्या  मुलांची नातवंडांची सविस्तर  खुशाली कळायची. त्या माझे खूप  कौतुक  करायच्या. हो त्यावेळी फोन नव्हते ना ! सामान्य जनतेपर्यंत प्रचलित.
       असो. लिखाण या बाब ला घरात उत्तेजन मिळतच होते. पण खरे लिखाण आता सुरु झाले आहे. ते पण आपल्या या विविध साहित्य  समुहाने तर लिखाणातस उधाण आणले आहे .वेळ कमी पडतो. या....  त्या सामुहावर जाण्यात दिवसाचा बराच वेळ जातो. व मी काही इतकी शीध्र कवयित्री नव्हे की लिहून 15/20 मिनीटात मोकळी झाले .त्यामुळे वेळ संबंधा दिवस थोडाफार आराम करत,,, लिखाणात व्यतित होत असतो. पण आता मी तर सर्व  जवाबदा-या पार करुन असल्याने तसा  घरच्यांना त्रास होत नाही व मी पण ठरलेल्या वेळे पेक्षा जास्त वेळ देत नाही .आपली नैतीक घरची कामे संभाळत लिहीत असते. 
      तशी मुले बोलत असतात आई काय सबंध दिवस भर टॕब घेउन असते. पण त्यांना त्यांचे  काय हवे नको  ते मिळत असते .त्यामुळे रोश नसतो ..आणि मी देतेच तेवढा वेळ तर बोलणारच... त्यात पण वावग नाही. आणि आता रोजच लिहीते त्यामुळे रोजचे शक्य होत नाही ..पण पहिले वाचक हेच असतात. कित्येकदा यमक जुळवाण्यात पण मदत करतात. 
       यांना  माझ्या  एका अभंगास  माझ्या  सुनेने स्वरबध्द केले व utub वर
टाकले. तेव्हा तो अभंग त्यांनी  ऐकल्यावर माझ्या हून जास्त आनंद त्यांना झाला. आता तर अजून एक अभंगास मुलाने चाल लावली आहे व लवकरच तो पण स्वरबध्द होईल 
इतकेच नव्हे तर माझ्या मुलांनी, सुनांनी व मुलीने मिळून "चारोळ्या व कवितेचा संग्रह"
पुण्यास माझ्या  अपरोक्ष छापला व मला 70 व्या वाढदिनासा मला हातात दिला नामकरण पण त्यांनी च केले ..मला व यांना याची जरा पण मागमुस न लागु देता 
       तेव्हा इतके पोषक वातावरण  आहे .आणि या सर्वास माझ्या  लेखणीस धार देण्यास सर्वच  समुहाच्या admin,  मेघ मोकाशी सर व समुहावर आणणारी समिधा भाष्टे यांची मी सदा ऋणी आहे. अजून ब-याच सख्याची ऋणी आहे सर्वाची येथे नांवे लिहू शकत विषयाधरुन होणार नाही. 

  • वैशाली वर्तक.

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...