गुरुवार, १६ मार्च, २०२३

पंचाक्षरी. किर्ती महान

 अ भा म सा परिषद समूह 2

आयोजित

उपक्रम क्रमांक 597

विषय ...किर्ती  महान

(पंचाक्षरी रचना)



असली जरी 

व्यक्ती लहान

असू शकते

*किर्ती महान*


कुठले काम

नसते कमी

याची सदाची 

बाळगा हमी


निष्ठा ठेवावी

सदा कामात

नाव मिळते

सदा विश्वात


शास्त्रींची होती

लहान मुर्ती

नावाजली ना?

जगात किर्ती



अढळ पदी

धृवाचे स्थान

भक्ती ने त्याला

मिळाला मान



वैशाली वर्तक

अहमदाबाद

बुधवार, १५ मार्च, २०२३

गझल. अभ्यास

 गालगा गालगा गालगा गालगा


बैसता बोलता वंदितो श्रीहरी     

आवडीने तुला  स्मरतो   श्रीहरी 

सर्वदा  राहते  आस ती अंतरी

भक्तीने पूजता  भेटतो  श्रीहरी   

 कांडिले दळण ते भक्ताचे  जाणिता 

दृढ विश्वास पाहतो  श्रीहरी 


भान विसरून जाई जनाई तिचे

सत्कर्मे देव तो पावतो श्रीहरी

भक्तिच्या भावना जागता  अंतरी

 देव मदतीस धावतो श्रीहरी

====================================

मंगळवार, १४ मार्च, २०२३

गीत तुझे गाताना

सर्वधर्मसमभाव साहित्य व सांस्कृतिक मंच
आयोजित उपक्रम 110
विषय .. गीत तुझे गातांना

  शब्द येताची अधरी
गीत रचले सहज
 तुज पाहताच आले
वदण्याची नसे गरज 

गीत तुझे गाताना
भाव  होते अंतरात. 
सांगितले गीतातून
उमजले तुज  क्षणात 

गीत तुझे गाताना
वाटे नको आता बहाणे
हरवून बसलो भान
बोल ना आता तू शहाणे

मुक मुग्ध कळ्यांना
 सकाळी जाग आली 
गीत तुझे गाताना वाटे
भेटण्याची वेळ झाली .

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सोमवार, १३ मार्च, २०२३

लेख. रंगूनी रंगात माझा

खरच किती कठीण असते ना?  विविध लोकांत ...  नुसती लोकच नव्हे तर वेगवेगळ्या वयाची. नाना रिती रिवाज  ..जातीची ..विविध भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला वावरत असताना . त्यासर्वांशी जुळवून घेत .. कधी ना राग दाखवित...का  कोणाबद्दल  दाखविला व्देषभाव  मनात..ना कधी आवाज चढवून बोलणे. सगळ्यांना सांभाळून घेत .. ...कधी त्यांच्या तील एक होत ..तर कधी गोडी गुलामीने  समजावत  ...आज वर   मी आयुष्य काढले. असे मी नाही सर्व लोकांचे
जे कानी शब्द येतात..जन  तोंडावर बोलतात ते सांगतेय.
    बालपणी म्हणजे लहान वयात लग्न झाले. घरची परिस्थिती म्हणजे माहेरची बेताचीच त्यामुळे शिक्षण आवड असून पदवीधर पण होता आले नाही.  पण सासरच्या मंडळींना शिक्षणाची आवड  त्यांनी शिक्षणास  प्रोत्साहन दिले.  मी पण घरची जवाबदारी पार पाडत .  सर्वांची मर्जी संभाळत..... ज्या घरी आलो आहोत त्या घरची होण्याची सदा प्रवृत्ती मनी बळावलेली असल्याने सर्व मंडळींना  मी हवी हवीशी झाली. म्हणतात ना पानी तेरा रंग कैसा. .. 
तर उत्तर असते जिसमे मिलाए जात वैसा. तसेच  माझेजीवन  होते.पाण्याला रंग
नसतो निळा रंग मिसळता आकाशाचा नीळा रंग घेतो तसेच माझे होते. आईची-आजीची बालपणाची शिकवणच होती ...आहे त्यात सामावून जायचे. शक्यतो कुरकुर करायची नाही.
मुलांना मोठे करताना पण तीच शिकवण मी दिली. पोर- मुली पण  त्याच संस्कारात मोठी झाली. गुणी होऊन स्व पायावर  , स्वबळावर जीवनी भरारी घेण्यास तयार झाली.त्यांच्या कर्तृत्वाची समाजात स्तुती होताना मन कसे आनंदाने भरून यायचे
व अजूनही येते.
        नव-याच्या कामात व्यवसायात पण पदवीधर झाल्या ने स्वखुषीने हातभार लावण्यात मागे नव्हती. शिक्षणाचा फायदा घरच्या कामात देत होती. सारी सारी मंडळी बोलायचे नाही पण बेमालूम खुष होती.  मला पण त्यात आनंदच. आगळे वेगळे
समाधान मिळायचे.
     लहान मुलांच्यात लहान होऊन खेळात सामिल व्हायची. मोठ्या वयाच्या मंडळीत
पण हसतमुखे वाद संवाद साधताना कधी मागे नसायची. वरिष्ठ मंडळींना तर दिवस भरात माझा चेहरा त्यांना व मला त्यांचा  दिसला नाही तर चैनच नाही पडायचे व आजही या घडीला  चैन पडत नाही. सम वयस्क मैत्रिणीत नातेवाईकांच्यात तर  पुढाकाराने भाग घ्यायची. सारे जनांच्या  मुखी माझे नाव असायचे असते.. आणि आहे.
 पण एवढे सारे असून  मात्र लोकांच्यात फार बुडून नाही राहिले.   स्वतः चे वेगळे अस्तित्व जपले आहे.  
  काळा बरोबर चालता ..येणारे कटु गोड अनुभव. ....   हो! सर्वांशी जुळवून घ्यायची
पण मनाला तर कटु ते कटु... व गोड ते गोड जाणवत होतेच ना.  प्रतिक्रिया देत नव्हते.
पण पुढे कसे वागायचे..कशी पावले उचलावीत हे मन आपोआपच ठरवत होते. 
आणि नकळत माझी मी स्वतः ला घडवित गेले. म्हणतात ना अनुभव व चुका हेच जीवनी आपले गुरू ठरतात.
सहजच चारोळी अधरी येते...

जीवनाच्या वाटेवर
कटु गोड प्रसंगाचे
बांधियले ते गाठोडे
कधी भासे ते कामाचे

गाठोड्यात अनुभव
अतिशय महत्त्वाचे
पुन्हा चुका न होण्यास
मनी ते रुजवायचे
     तशातले च  होत गेले.   आज सर्व दृष्टींनी परिपूर्ण आनंदात सर्वा बरोबर नाना
विधी सुख दुःखाच्या रंगात मी रंगत आहे. रंग जे हाती लागतात त्या रंगात खुलून
जातेय. त्या क्षणांना उधळले ला रंग स्वीकारत आहे . त्या रंगांनी एकरुप या साधत आहे. तरीही  होता सकाळ रवीराज नित्य नियमाने आनंदाची सकाळ उजळतो.तसेच
मी पण माझ्या आवडी निवडी जपता शुभ सकाळ प्रफुल्लित करतेय.
      सकाळ दुपार संध्याकाळ दिवसाचे रवी *राज विविध रंग दाखवतो तसे निसर्ग पण विविध रंगात नटतो. वर्षभरात सहा ऋतुचा सोहळा पहावयास मिळतो तसेही पण आयुष्यात नावंवडां बरोबर मुलं नातेवाईक समाजात रहातो तर सामाजिक व्यक्तींशी 
 समाजाचे ऋण देणे लागतो तर त्या समाजाशी एकरूप होत .या सर्वा बरोबर माझा
जीवन साथी ज्या जोडीने सुखाचे दु:खाचा. सहनशीलतेचा धैर्याचा कठीण परिश्रमाचा
तसेच  संतवाणी च्या उपदेशाने  प्राप्त झालेला. व आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेल्या   समाधानाचा रंग आहे.  जीवन सार्थकी लावण्यासाठी  तो महत्वाचा. अशा सा-या सा-या  रंगात रंगून. मी जीवन इंद्रधनुष्याच्या सप्त रंगात उजळून ..  रंगात माखून  पण माझा *स्वत्वाचा* .. आपल्या अस्तित्वाच्या रंगात. खुलून. माझा वेगळा रंग. दाखवित आहे.

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...