शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

प्रणु शब्दावली.....4. .प्रवास \सावली कवित्व \लतादिदी/दादासाहेब फाळके.

स्वप्न गंध साहित्य समूह
आयोजित उपक्रम क्रमांक 165
प्रकार.. प्रणु शब्दावली 
 1 विषय...प्रवास 

  जीवनाचा प्रवास 
आनंदाचा हमखास 
असता समाधानाची आस
 विलसते हास्य मुखावर

प्रवास हिवाळ्यात
आतुरता मनात 
मजा येते करण्यात 
भटकंती आवडे  आयुष्यभर जगभर 

 येतात दूरवरून 
पक्षी परदेशातून
 थव्याने पक्षी निहाळून 
  आनंद  मावेना  क्षणभर

करावे देशाटन
 आनंदाचे क्षण
प्रफुल्लित रहाते मन
प्रवासी आनंदी जीवनभर

केल्याने अविरत
सांगते मनोगत          
ज्ञान वाढे हकीकत
प्रवास करा आयुष्यभर

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




स्वप्नगंध साहित्य समूह
प्रणू शब्दावली उपक्रम
2. विषय.. सावली 

राहते बरोबर 
साथ निरंतर 
न देता अंतर
आपली सावली छाया
           
छत्रछाया  मायबापाची
गोडी सहजीवनाची 
कृपादृष्टी होता देवाची
जीवन प्रेमळ माया


असे सदा संगती 
जीवनाची सोबती
सावलीत खेळ रंगती
सावली करी माया 
        
 वृक्षांची  सावली
  जनमने आनंदली 
  गाई गुरे विसावली 
 पथिकांना दिधली छाया


वैशाली वर्तक
अहमदाबाद


प्रकार ...प्रणु शब्दावली
   3 विषय. कवित्व

 करिता सराव 
 विचारांचा ठराव 
कल्पनांचा नसे अभाव 
साकारते रचना सहज

लेखणीचा संग
विचारात दंग
कवितेस चढे रंग
कवित्व जागणे गरज

कल्पना अवगत
विचार अविरत 
मनात वाहती खळाळत 
कवित्वाची दिसे उमज.


धार साहित्याला
  मनीच्छा कवित्वाला
स्वस्थ न बसण्याला 
लक्ष  जणु सावज

साकारण्या कविता
भावनांची सरिता
लेखणीची पहा अधीरता
नव काव्य प्रकारात सहज

वैशाली वर्तक
अहमदाबाद


स्वप्न गंध साहित्य समूह
जागतिक मराठी दिन विशेष उपक्रम
मराठी कलाकार वर्णन
गान कोकिळा लतादीदी 
******************************
4. शीर्षक...दुजी न होणे  लता    

 रहाणी सोज्वळ 
 जीवन निर्मळ
  यश प्राप्तीत प्रांजल
 लतादीदीचे ऐकू गायन       

  ऐकावी भुपाळी
  रोजच सकाळी 
  भावपूर्ण गाणी सदाकाळी
  आनंदमयी करी वातावरण   

  लतादीदी खरोखर 
  भासे क्षणभर
  साधना तितकीच बरोबर
  कर्तृत्वाला तियेच्या नमन

  गोडवा स्वरातला
  भाव  मनातला
 परिपूर्ण दिसे गीतातला
 होई भावनांचे दर्शन 

सुखाच्या स्वरांनी
तृप्त मनानी
ओंजळ नव रसांनी
भरूनी करूया सैवन 

ओठावरची  गाणी
अमृताची वाणी
ऐकता येई डोळापाणी
स्वरसम्राज्ञी वदती जन


वैशाली वर्तक 
अहमदाबाद







स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित जागतिक मराठी दिनानिमित्त विशेष उपक्रम
प्रणु शब्दावली काव्यलेखन
मराठी कलाकार वर्णन
5.  कलाकार.. दादासाहेब फाळके


चित्रपटाचे जनक
उत्तम दिग्दर्शक
तैलचित्र कलेचे उपासक
दादा साहेब होते खास 

कला अवगत
शिकण्याची शिकस्त
जेजे स्कूलचे पारंगत
चित्रपट व्यवसायाचा ध्यास 

नौकरी त्यजून
व्यवसाय धरून 
मुक चित्रपट बनवून
झाली पूर्ततेची  आस

वाढ रोपट्याची
पहिल्या लघुपटाची
राजा हरिश्चंद्र चलचित्राची
झाला शुभारंभ अभ्यास 


दाखविली जीवनाची 
 ओढ  अंतरीची
 चित्रपटात फॅक्टरी हरिश्चंद्राची 
सन्मानित कलावंत हमखास

वैशाली वर्तक
अहमदाबाद..











गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

लेख...ध्यास नवा आस नवी

सिद्ध साहित्यिक समूह
विषय .. ध्यास नवा आस नवी

सूर नवा ध्यास नवा कार्यक्रम ऐकत होते. सारे गायक नव्या नव्या( त्यांच्यासाठी )नव्या नव्या सूरांचा अभ्यास करुन संगीत  कला आत्मसात  करण्याचा व कला प्रदर्शित  करण्याचा जीवापाड प्रयत्न करत  होते. व जीवनात पुढे पुढे जाण्याचा... प्रगतीचा ध्यास मनी धरून पावले टाकीत होते.
   सहज मला विचार आला खरच जीवन पण गाणे आहे. त्यात सप्त सूर..इंद्रधनुचे सप्त रंग भरण्याचा ध्यास  मनी पाहिजे तर  जीवन सुखमय, तालमय, आनंदी ,सुखी , प्रगतीशील होईल.
       प्रत्येकाला जीवनी काही ना काही   विशेष करुन दाखवू. .. चार लोकांत उठून कसे दिसू याचा ध्यास असतोच.आणि असावाच. जो जरुरीच आहे.
         आता सरत्या वर्षाला   या वर्षात काय कमविले.. काय गमविले  यांचा आढावा घेत.नव्या वर्षात जुन्या चुका वा गडबडीने झाले ला गोंधळ होणार नाही याची दक्षता बाळगत नव्या वर्षाच्या स्वागताला सारे तयार होतील. गेल्या वर्षा पेक्षा काही नाविन्य घडवू अशा विचारात मनी बरेच संकल्प करत असतील.
तर देश धर्म  संस्कृती ह्याचा विचार माझ्या मनी सहज आला. आपल्याला देश आपला देव मानला पाहिजे.   आपण  सा-या नागरिकांनी आपला धर्म , संस्कृती ,कशी टिकेल.  त्यासाठी आपल्या येण्या-या पिढीला उत्तम संस्कार देत देशभक्ती ची भावना जागृत करूया.   परदेशाकडील हिरवळ सर्व
जनांना फार आकर्षक भासत असते.. तेथील भौतिक सुख मनाला भुरळ पाडते . खरं आहे ,परदेशातील 
 आधुनिक तंत्रज्ञानाने जीवन सुखकर होते.कमी महेनतीत कामे होतात. त्यामुळे परदेशात जाण्याचा ओध
वाढत आहे ,पण  आता आपला देश पण प्रगती पथावर आहे. सर्व भौतिक सुख येथे पण उपलब्ध होत आहेत. तिथल्या सुखसोयी आपल्या देशात सहज मिळत आहे. देशातील सर्व सामान्य माणसाचे रहाणीमान पण सुधारत आहे. वैज्ञानिक पण महेनत करून देशाला उच्च स्थान देण्यात झटत आहेत.
तर आपण पण सर्व नागरिकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यात एकजूटीने कार्यरत होऊया. आपला देश प्रगतीपथावर वर आहेच... तो असाच प्रगती पथावर चालत राहिल व विश्वात कसा शोभेल याचा ध्यास  मनी बाळगून....तीच आस पूर्णत्वास नेण्याची मनोकामना धरु. 
      पर्यावरण जतन करणे.... मुलगी वाचवा मुलगी शिकवा .या सर्व मोहिमीना जोमाने उत्साहाने उचलून त्या बाबतीत प्रत्येक नागरिकात जागृती निर्माण करू. पुन्हा नव्याने देश स्वावलंबी बनविण्याचा ध्यास असावा.
स्वदेशीचा लावुया नारा, देश होण्या आत्म निर्भर
 पुन्हा  नव्याने वाहुद्या झरे, स्वावलंबनाचे देशभर.

          तसेच दिपक अंधार दूर सारतो नवी आशा दाखवतो .तसे शिक्षणाच्या दिव्याची ज्योत लावून
मुलींना शिक्षित केल्याने .आज आपण पहात आहोत की सर्व क्षेत्रांत नारी आघाडीवर आहेत.तर
शिक्षणावर भर देऊन ज्ञानाची गंगा वाहती ठेवू. अंधश्रद्धेचे निर्मूलन करू.महत़्वाचे सकारात्मक भावना
अंगिकारू.

  दिवा  दूर करीतो तिमीर  ,दावितो नवी आशा  जीवाला 
 प्रतिक असे  सकारात्मकतेचा , सदैव तेजाळू दिपकाला.          

 अशा भावना मनी बाळगून सकारात्मक  विचार  ठेवू. भारत देशाला महान करण्याची आस धरू
तसेच
       विश्व शांतीची  मशाल, तेजाळू  द्या संस्कृती ची
      नांदावी सुखशांती  जगात, अशाच  उदात्त  भावनेची
 अशी उदात्त भावना मनी रहावी . त्यासाठी संतांची शिकवण आठवणी त घेऊ. जाती भेद दूर सारून
विश्व बंधुत्वाची.. हे विश्व माझे कुटुंब भावना मनी आणू.

दिवा लावू विश्व शांतीचा 
तेजाळूया समई संस्कृतीची
नांदेल सुखशांती  जगात
विशाल उदात्त  भावनेची.   

 विसरूनी  जाता जातीभेद ,
समजून घेऊ नव्याने समतेला,
ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा, 
दिलेला मंत्र  देऊ  जगताला.      
        असे काही विचार मनात आले . व त्या विचारात   नवा ध्यास नवी आस मनी दृढ झाली.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...