शनिवार, २१ जून, २०२५

अपयश. (मुक्त छंद) सिंगापूर शब्द हार

शब्द सेतू 


अंतिम पाचवी फेरी
दि २२\६\२५
मुक्त छंद रचना 





अपयश

यश  मिळाले की,
यशाला  तर आनंदाने, कौतुकाने 
जातेच स्वीकारले.
आणि लगेचच पेढे वा मिठाई देखील वाटून 
आनंद सोहळा साजरा होतो हटके .

पण ,.....अपयश आले तर ,
तेही स्विकारताआले पाहिजे.
जीवनात संघर्ष सतत  चालणारच,
अनेक कठीण प्रसंग येणारच. 

काही सहज सुलभतेने उलगडणार ,
तर काही गंभीरतेने हाताळता पण,
नाहीच दिसत यशाची चिन्हे ,
आणि मग ,...अपयश  पदरी पडणार 
याची खात्री पण पटते.

पण अशावेळी ,जराही न डगमगता ,
हीच उद्याच्या यशाची पायरी समजून ,
आत्मविश्वासाने  उचलावे पाऊल .
कळत नकळत झालेल्या चुका घेत ध्यानी ,
दृढ विश्वासाने , मेहनत घेत पुढे चालता,
सामोरी लागते यशाची चाहुल.

जशी रोज ...नसे निशा, 
निशे नंतर... येतच ऊषा.
अपयशाने  न होता खच्ची,
आठवावी मनी .... ती,
तेनसिंगची एव्हरेस्ट सर करण्याची जीद्य,
अथवा,.. पहा,साधा मामुली किटक कोळीला,
अनेकदा पडूनही, जाळे विणतोच ना नेटाने ?

तशीच मेहनत ,जिद्द, सकारात्मक भाव ,
आणि महत्वाचा दृढ विश्वासाने,
अपयशाला , यशात सहजतेने करावे रूपांतरित .
अपयश शब्दातील , पुसून टाकुया "अप" शब्द.

बालपणी सापशिडीच्या डावातून
हीच शिकवण देण्यास,
 मायबाप ,बालकास   लहान असताना,
खेळायला देऊन बाळकडू पाजतात,
सापशीडी तील शीडी..
जीवनातील चढ.. हेच यशाचे चिन्ह.
साप गिळंकृत म्हणजे ..
धडा अपयशाचा,
आपोआप नकळत मिळतो ,आणि
अपयश पचवित शंभर आकडावर पोहचतात.
 अन् *अपयश* आनंदे स्विकारतात.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
साहित्य तेज पेपरात 28/6/25






सिंगापूर शब्दगंध 26/7/25
विषय...हार
 
शब्द ...हार आणि विजय 
चालतात घेऊन हाती हात 
यशाला मात्र आनंदाने कौतुकाने 
मिळते सर्वांकडून साथ.

उडती कारंजे आनंदाची
लगेच वाटून पेढे यशात
आनंद सोहळा करिती
जन  साजरा करी झोकात 

  पण झाली हार तर.        अपयश आले तर
जीवन एक संघर्ष असता
कठीण प्रसंगही येणारच
आले पाहिजे तेही स्विकारता.

असता जरी कठीण प्रसंग 
दिसे सहज यशाचे पाऊल 
पण हाताळता गंभीरतेने 
कधी न लागे विजयाची चाहुल.

अशावेळी न डगमगता
मानावी  आजची हार
 तीच उद्याची यशाची पायरी 
हवा दृढ विश्वास अपार 

उचला पाऊल आत्मविश्वासे
चुकांना घेत ध्यानात 
ऐकाल विजयाचा डंका
यशाचा पुष्प हार पडे गळ्यात 

कारण नसे , रोजच निशा
निशे नंतर येतेच ऊषा
न होता मनाने खच्ची
विजयाची मिळवा नवी दिशा 

बालपणीची सापशिडी 
खेळातून मिळे शिकवण
म्हणूनच पाजण्या बाळकडू
खेळावया  देती मोठे जन.

सापशिडीतील शिडी
दाखवी चिन्ह यशाचे 
सापे करिता गिळंकृत 
सहज दिसे अपयशाचे

असेच चाले जीवनात 
सदैव हार जीत चा खेळ
खेळ खेळता अंक शंभराचा
पोहोचण्यास जमवावा मेळ

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद26/7/25

जगुया संगीतमय जीवन

तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत 
तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित 
त्रिनेत्र प्रकाशधारी 
भव्य दिव्य राज्यस्तरीय काव्य लेखन करंडक स्पर्धा  
साहिल तेज मघे. १८\९\२५


दि 21/6/25
विषय ...संगीत 
शीर्षक... संगीतमय जीवन


रंग सात इंद्रधनुष्यी
स्वर सात  संगीतात
सप्त वसती आरोही
अन् तेच अवरोहात .

जीवन जगा सप्तसुरांत
 घेत साथ संगीताची
म्हणजे उजळे जीवन
येई मजा जगण्याची.

येता रवी राजे नभी
ऐका सुरेल भुपाळी
होते मनही प्रसन्न 
सूर ऐकता सकाळी .

भजनात,  संगीतात
हवी साथ तबल्याची
साज चढवे बासरी
मजा वाढे गायनाची.

लय हवी संगीतात
खुलते गाणे खरोखर ,
पण , लय संगे ताल ही
धरावा लागतो बरोबर .

गाणे देई मना आनंद
भरु सप्त स्वर मनात
होता संगीतमय जीवन
व्यथा जाती दूर क्षणात.

दिवसाच्या अष्टप्रहरात                        
विविध रागांचे आहे महत्व,
ललत, तोडी ,मालकंस ,दरबारी 
शेवटीला भैरवी दावे प्रभुत्व ,

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद
                               







                                             

रंग सात इंद्रधनुष्यी
स्वर सात  संगीतात
सप्त वसती आरोही
अन् तेच अवरोहात

जीवन जगा सप्तसुरांत
 घेत साथ संगीताची
म्हणजे उजळे जीवन
येई मजा जगण्याची

येता रवी राजे नभी
ऐका सुरेल भुपाळी
होते मनही प्रसन्न 
सूर ऐकता सकाळी 

भजनात,  संगीतात
हवी साथ तबल्याची
साज चढवे बासरी
मजा वाढे गायनाची


लय हवी संगीतात

खुलते गाणे खरोखर 
पण लय संगे ताल 
धरावा लागतो बरोबर 


गाणे देई मना आनंद
भरु सप्त स्वर मनात
होता संगीतमय जीवन
व्यथा जाती दूर क्षणात


दिवसाच्या अष्टप्रहरात                        
विविध रागांचे आहे महत्व
ललत, तोडी ,मालकंस ,दरबारी 
शेवटीला भैरवी दावे प्रभुत्व 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद


गुरुवार, १९ जून, २०२५

ऋण. ऋण जन्माचे न फिटण्याचे मायबाप

 

ऋण जन्माचे न फिटण्याचे



घेता जन्म मानवाने

नाते जडते कुटुंबाशी

माता पिता कुटुंब जन

मातृभूमी मातृभाषेशी


 ऋणी मी पण  सा-यांचा

 देणे लागतो गुरु जनांचे

माता पितांनी केले मोठे

सारे श्रेय कुटुंबियांचे


समाजाचे पण असती ऋण

ज्या लोकांत वावरलो

समाजाच्या गरजा पुरविण्या

त्यांचा मी ऋणी लागतो


मातृभूमी कुशीत जियेच्या

वाढलो घडलो कर्तृत्ववान

राहणार सदैव ऋणी तीयेचे

पूर्ण करू  स्वच्छतेचे अभियान 



फेडणे असेची अशक्य 

ऋण  माता पिताचे मजवर

 ईश्वराने दिधला मानव जन्म

ऋण तयाचे.  जन्मभर


वैशाली वर्तक

अहमदाबाद 



विषय  मायबाप 
काव्यप्रकार अष्टाक्षरी 
*जीवनाचे शिल्पकार* 


देवा सम मायबाप
जीवनाचे शिल्पकार 
घेती अतोनात कष्ट 
देण्या जीवना आकार 

मायबाप दोघे गुरू 
दोघांचेही योगदान 
त्यांचे कर्तृत्व महान
द्यावा नित्य नेमे मान.

ऋण आईवडिलांचे
फिटणार कधी नाही
कसे घडवू पाल्यांना 
हीच चिंता मनी राही.

मनी तयांच्या एकच
असे उत्कर्षाचा ध्यास 
पाल्य व्हावेत शिकून
कली-युगातील व्यास.

घाम गाळूनी श्रमाने
कष्ट साही अहोरात्र 
मुखावरी न दाखवी
मायबाप एकमात्र.

दु:ख झेली घरासाठी 
राहो कुटुंब सुखात 
हाच मंत्र ध्यानी मनी
विठु गजर मुखात.

कलाकार संबोधती 
प्रेक्षकांना  मायबाप
कला गुण प्रसंशिता
देती कौतुकाची थाप

तुकोबांचे विठुराया 
वसे सदैव अंतरी
तेची माझे मायबाप 
अन् माहेर पंढरी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

जीवनाचे शिल्पकार 

बुधवार, १८ जून, २०२५

चित्र काव्य उजळवू ज्ञान ज्योती


चित्र काव्य 
उजळवू ज्ञान ज्योती


झटुनिया करू यत्न
टाकुया प्रगतीचे पाऊल
उजळवू ज्ञान ज्योती 
लागेल यशाची चाहुल

साथ देत एकमेकांस
चला जाऊया शिखरी 
ज्ञान दीप उजळविण्याची
आस हवीच अंतरी.

खचू नका ,भिऊ नका
असेच सदाची जायचे
शेताची कितीही संकटे
क्षणभर न डगमगायचे.

मनी करिता निश्चय 
यश मेरू येईल समीप
जुळता वात ज्ञानाची 
देईल प्रकाश ज्ञान दीप 


वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...