*स्पर्धेसाठी*
शब्दरजनी साहित्य समूह
अभंग लेखन
विषय - कर्म हाचि देव
*संत उपदेश*
करावे सदैव । जीवनी सत्कर्म ।
जाणा तेची मर्म । जीवनाचे ।। 1
जैसे कर्म करी । तसे मिळे फळ ।
जाणा सदाकाळ । जीवनात ।। 2
नको अहंकार । वृथा अभिमान ।
जपा स्वाभिमान । मनोमनी ।। 3
भुकेलेल्या द्यावे । सदा अन्न पाणी ।
हवी गोड वाणी । सदाचिया ।। 4
पहा चराचरी । वसे सदा देव ।
तोची एकमेव । सकळांचा 5
कर्म हाची देव । सांगे संत वाणी ।
ऐका त्यांची गाणी । सदाकाळ।। 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद
प्रज्ञा महिला मंच
आयोजित साप्ताहिक उपक्रम
15/2/22
विषय - छंद भक्तीचा
अभंग लेखन
*गोडी भजनाची*
भोळा भक्ती भाव । मनात दाटला ।
आवडू लागला । मनोमनी ।। 1
लागला जीवाला । छंद तो भक्तीचा ।
ध्यास तो नामाचा । सदाकाळ 2
घेता तव नाम । दुःख निवारण ।
आनंदी जीवन। होतअसे । 3
उठता बसता । स्मरते तुजला ।
आनंद मजला । मिळतसे।। 4
स्मरण करिता। रमावे भक्तीत ।
आगळ्या स्फूर्तीत । देवा तुझ्या ।। 5
करीते स्मरण । दाखवा चरण ।
आले मी शरण । भक्तीभावे ।। 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद