शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

माझ्या मनाची मी राणी

उपक्रम
विषय- माझ्या  मनाची मी राणी

माझ्या  मनाची  मी राणी
गाते मी सदा सुखाची गाणी
माझी स्वतंत्र  विचार सरणी
प्याले सदा गुजरात चे पाणी

गुणी सुना मुली माझ्या
त्यांच्या मुळे शोभा घराला
लाभल्या तुम्ही प्रेमळ सख्या
प्रोत्साहन  देती मम लिखाणाला

लाभला मला गुणी साथीदार
आहे मी सदाची भाग्यवान
मनी बाळगते सदा समाधान
माझ्या  कामात मी कर्तृत्वान

अशी मी  आहे साधी गृहिणी
संसारी माझ्या   वैभवशाली
मात्र  लेखणीसाठी आतुरलेली
विनोदीनीची आता वैशाली.

....सौ वैशाली वर्तक

सावळ्याची बासरी (अभंग)

उपक्रम
सावळ्याची बासरी    16/11/2019
वाजवी मुरली !
श्रीकृष्ण मुरारी !
राधिका बावरी!
सदाकाळ !

सूर येता कानी !
विसरते ध्यान !
हरपते भान !
राधिकेचे!

राधिका  हरीची!
करिते मंथन !
बोलती  कंकण !
कृष्ण कृष्ण !

राधेचा मोहन !
वाजवीता पावा !
करी जन धावा !
श्रीहरिचा!

सोडिता गोकुळ !
विनवी राधिका!
कोसती गोपिका !
अक्रुराशी!

असा गोड पावा !
वाजविता  कान्हा !
फुटे गाई पान्हा !
  बासरीने!

वैशाली वर्तक  16/11/2019

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

पृथ्वी

पृथ्वी   (अष्टाक्षरी)

पृथ्वी असशी जननी
आम्हा सर्वांची दाता
अन्न  वस्त्र  न् निवारा
तूची असे दुजी  माता

देऊनिया धनधान्ये
तुची भरविशी घास
मिळे कुशीत निवांत
तुझे म्हणवितो दास

साहुनिया तूची घाव
देई खनीजे अनेक
अंतरात भरलेली
हास्य मुखे एक-एक

पंच तत्वातील एक
असे पृथ्वी एक तत्व
जलचर जीव वसे
सर्वां तुझेच महत्त्व

तव कृपा प्रसादाचे
नित्य करितो  स्मरण
उठताच स्पर्शुनिया
तुझे वंदतो चरण

...वैशाली वर्तक

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

चादोबा रे चांदोबा

स्पर्धेसाठी
फेरी क्रमांक 4
बालगीत  
विषय ---  चांदोबा रे चांदोबा

चांदोबा  रे चांदोबा
करीत आहे मी विचार
छानसे तुझे सदरे
शिवायचे दोन चार

सदा असतो उघडा
तू असा रे कसा ?
नाही वाजत का थंडी
बघ इकडे असा

जरा स्थिर रहा  ना
कसे घेणार मी माप
ढगा आड जाऊ नको
किती रे तू देतो ताप !

कधी दिसतो रोडावलेला
कधी करी जाडेपणाला मात
नियमित नाहीस का खात ?
तू रोज  रोज वरण भात.

अमावस्येला जातो कुठे
नभात रहातो लपून
दडी मारून बसतोस
अंधारात  आम्हा ठेवून

येणार आहेत लवकरच
शास्त्रज्ञ  यान मधून
त्याच्या करवी देईन
सदरे तुझे  मी पाठवून.

वैशाली वर्तक    12/11/2019

तुळसी विवाह


स्पर्धे साठी
तुलसी विवाह
कार्तिक  शुध्द द्वादशीला
रंगविले   छान वृंदावन
साधण्या तुळसी विवाह मुहुर्त
सजविले  म्हणून अंगण

लावियल्या दीप माळा
काढून सुबक रांगोळी 
उजळले  प्रकाशानेअंगण
सुंदर दिसती दीप ओळी

ऊस बांधिले मंडपी अन्
माळा चिंचा -आवळे  फुलांच्या
नैवद्य ठेवियला सामोरी
अक्षता वाटल्या  लग्नाच्या

चौरंगावर   झाले विराजमान
बाळकृष्ण  अमुचे ताम्हनात
स्वस्तिकाचा मधे अंतरपाट
अक्षता मंगलाष्टके जोरात

तुळशीला  नटविली छान
लाल हिरव्या वस्त्र न् आभुषणांनी
रीत सर बोलता  ब्राह्यणांनी
दुमदुमला सोहळा मंत्रोच्चारांनी.

पडता अक्षता कृष्णा शिरी
अवघे आनंदिले जन
"शुभ  मंगल "च्या गजरात
रमले आमुचे पण मन

संपन्न  होता लग्न सोहळा
आनंद मनीं दाटला
वंदन करुनी  कृष्ण तुळसीला
  सर्व  जनांना प्रसाद वाटला

वैशाली वर्तक

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

चाराक्षरीची चाराक्षरी



चाराक्षरी ची चाराक्षरी

 दिली आहे
 सुट तर
करा गप्पा
 पोटभर

मुभा करा
 साजरी ती
उद्या पुन्हा
 चाराक्षरी 2

 शब्द अल्प
असे तरी
भावनांना
 व्यक्त करी 3

 रचण्यात
सारे धुंद
 जीवा लागे
तिचा छंद 4

 मिळे जरी
 सवलत
झाली सर्वा
 (होत आहे) अवगत 5

 झाले सारे
 मग्न त्यात
साधे बोल
 न कशात 6

 करी सारे
यत्न सुज्ञ
बसलीय
प्रणु तज्ञ 7

 वैशाली वर्तक

चाराक्षरी नो उपक्रम

चित्र चाराक्षरी वाढदिन नो उपक्रम देवदेवता चाराक्षरी जगी आम्हा न्हाऊघालू दिली आहे आद्य पूजा कोणी नाही शुभेच्छांनी सुट तर करी जन नाही दया प्रणालीला गप्पा करु तोचि असे कोणालाही वर्षावानी पोटभर गजानन आईबाप घडो नवा मुभा करा रामदूत न रहाता अविष्कार ती साजरी हनुमंत झालो मीच मिळो तया उद्या पुन्हा सदा उभा हिची माता पुरस्कार चाराक्षरी बलवंत लागे भुक चाराक्षरी रचण्यात गिरीधर रोज हिला ही मानाची सारे धुंद योगेश्वर न समजे आवड ती जीवा लागे जगताचा काही तिला लेखनाची तिचा छंद तू ईश्वर दया भाव शब्द अल्प मिळे जरी सरस्वती कोणी करी असे जरी सवलत तू शारदा मिळे तेव्हा भावना त्या झाली सर्वा कर कृपा अन्न तरी व्यक्त करी अवगत तू ज्ञानदा देतो मीच घडो सेवा झाले सारे रधुवंशी तान्हुल्यास मराठीची मग्न त्यात तू श्रीराम आई सम हीच ईच्छा साधे बोल तोचि सारी दोन घास प्रणालीची न कशात क्रोध काम असे दुःख चाराक्षरी करी सारे दत्त गुरु नको देवा प्रसवली यत्न सुज्ञ दिंगंबर काय करु सर्वांनी ती बसलीय नाम घ्यावे सांग सेवा प्रशंसली प्रणु तज्ञ निरंतर संभाळतो छंद तुझे देव वसे दिनभर असे खास अंतरात नसे शांती जोपासणे नका शोधु क्षणभर हिच आस दगडात करु नको रुची असे कोणा दीन साहित्याची हे मागणे जोड तिला प्रति दिन संगीताची पूर्ण होवो सा-या ईच्छा वैशालीच्या ह्याच शुभेच्छा

श्रावण

विषय- श्रावण
उत्साहाचा
असे मास
श्रावण हा
हमखास

आली लेक
माहेराला
बांधा झुले
अंगणाला

प्रेम धागा
बांधी ताई
हर्षभरे
पाही आई

सण येती
वारंवार
आनंदाला
पारावार

मरगळ
सारी गेली
सर्व प्रजा
आनंदली

शंकराला
वाहू बेल
उजळेल
भाग्य वेल

देवी पूजू
शुक्र वारी
देई सौख्य
दुःख हारी

वैशाली वर्तक

गोष्ट एका लग्नाची (फक्त प्रसंग )

गोष्ट एका लग्नाची
     आमचा वाङनिश्चय लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळीच छान व्यवस्थित पार पडला . वाङनिश्चया नंतर व्याही भेटी चा कार्यक्रम झाला .दोन दिवस हाॕल घेतला होता. आदल्या दिवसा पासून लग्न गाजत होते. . ..पाहुणे मंडळी गावातली होती ती घरी झोपायला गेली ,पण ...बाहेर गावाहून आलेले नातेवाईक हाॕलवरच थांबले होते. त्यांचे मस्त गप्पा टप्पा ..हास्य विनोद चालले होते. आम्ही मात्र घरी झोपायला गेलो. घरी गेल्या गेल्याच बहिणी ने ," चला लवकरच झोपा ....उद्या सकाळी उठून जायचय. सर्वांच्या अंधोळी वेळेत झाल्या पाहिजेत . " असे उवाच्य केले. सकाळी लवकर उठून तयार होऊन देवास नमस्कार करुन निघालो. त्यावेळी माझी (आमची ) स्वतःची गाडी नव्हती. तेव्हा कुठे इतकी आर्थिक परिस्थिती .... गाडी स्वतःची असण्याची.... पण बहीणीला तिचे ओळखीचे स्नेही ...जोशी यांनी लग्नासाठी... गाडी ड्रायव्हर सह दिली होती. सकाळी निघालो.. आमच्या जवळ मुलीला देण्याचे दागिने तशीच आईच्या व ताईच्या दागिन्या ची जोखमी बॕग होती. ... ..अर्धे अंतर आलो असू , तर गाडी ....तिचे रुप दाखवू लागली .तशी गाडी नुकतीच गॕरेज मधून सर्वीस करुन आणलेली होती. पण मग त्या गाडीत काय प्रोबलेम होत आहे कळेना. ...काय माहित...मधेच आचके देत थांबायची. थोडा वेळ असेच चालले. जवळ सोने नाणे त्याचे टेंशन..आणि वेळेवर लग्नास पोहचण्याचे टेंशन सर्वांच्या मनात सुरु झाले. घरी जरी गाडी नव्हती तरी मी गाड्या हाताळल्या होत्या.. स्वतःला mechanical मधे रस होता व आहे . स्वतः mechanical engeer तसेच आटोमोबाईल चे पण ज्ञान होतेच. व शिक्षण पण घेतले होते. आई बहिण.... गाडी चालू होईना म्हणून चिंतेत पडल्या ..कसे लवकर पोहचणार .. ड्रायव्हर प्रयत्न करत होता. मधे कुठेच गॕरेज पण दिसत नव्हते. की ,...जिथे गाडी दाखवावी. शेवटी मीच ..बाह्या वर चढवून ... गाडीत काय प्रोबलेम तो पहावयास घेतला. ज्याचे 2/3 तासावर लग्न ....अन् तो 'मुलगा काय करतोय ?.....तर गाडी दुरुस्त करतोय ....क्षणभर वाटले उगाच रात्री घरी झोपण्यास आलो. त्यापेक्षा तिकडे हाॕलवर झोपलो असतो तर बरे झाले असते. मस्त हाॕलवर झोपलो असतो ..मित्रां बरोबर शेवटीची बॕचलर लाईफ ... हसी मजाक मधे घालविली असती ..पण आमच्या ताई बाई यांनी नको ...चला घरी चा हट्ट धरला ...असो. शेवटी गाडीचा प्रोबलेम कळला .इंजीन गरम होत होते ...गाडी मधे एखादी मोठी रिकामी बाटली पण नव्हती .... की कुठून पाणी भरुन आणावे. तेवढ्यात कुठेतरी construction चाललेले दिसले . ...तेथे ड्रायव्हर ला पाठवून पाणी मिळविले व कशी तरी गाडी सुरु झाली . व हाॕलवर पोहचलो .तेव्हा कुठे हाश झाले. लगेच fresh होऊन दुसरे कपडे चेंज करुन आलो. पण हाॕलवर पोहचलो तर सारे नातेवाईक माझे रुप पाहून विचारात पडले.. हात काळे ..घामाघुम .कपड्यास पण गाडीच्या बोनेटचे डाग... हा लग्न मुलगा ? प्रश्न पडला. मुलाची आई व बहीण पण घामाघुम ... त्यांच्या सर्व मेकअप ची वाट लागलेली व भरपूर टेंशन मधे दिसत होत्या. सासुरवाडीच्या लोकांनी माझ्या पायावर दुध पाणी टाकून ....औक्षण वगैरे आटपले. आई व ताई पण फ्रेश होण्यास पळाल्या.. कारण लग्न मुहुर्त साधला पाहिजेना ..आपल्यात मुहुर्ताला महत्व असते. उष्टी हळद मुलीच्या रुम वर पाठवली .ती मंडळी तेथेच रात्री राहिली होती. तिने पण पटपट आटपते घेतले. गुरुजी म्हणाले हरकत नाही आपण वैदिक पध्दतीने करु. प्रत्यक्ष लग्न विधीचा मुहुर्त आधी साधूया....मग नंतरचे विधी..... असे म्हणत एकदाच्या लग्न मुहुर्तावर मी बोह-यावर चढलो. आणि मुहुर्तावर माझ्या डोक्यावर अक्षता पडल्या.. व लग्न संपन्न झाले.

चाराक्षरी माय बाप

मायबाप

संता साठी
दुजे नसे
माय बाप
देव असे
माय बाप
करी माया
तया सम
नसे छाया
कष्ट करी
अहोरात्र
मायबाप
तेच मात्र
सन्मानाने
मानू जेष्ठ
मायबाप
जगी श्रेष्ठ
सर्वां साठी
साहे दुःख
तयातच
मानी सुख
माय बाप
सर्व जाणे
ते असता
तया संगे
काय उणे
मी रहाणे
रहा सदा
तयां पाशी
तिची असै
तीर्थ काशी

चाराक्षारी

मायबाप


 संता साठी
 दुजे नसे
 माय बाप
देव असे

 माय बाप
करी माया
तया सम
नसे छाया

 कष्ट करी
अहोरात्र
मायबाप
 तेच मात्र

 सन्मानाने
मानू जेष्ठ
 मायबाप
जगी श्रेष्ठ

 सर्वां साठी
 साहे दुःख
 तयातच
मानी सुख

 माय बाप
सर्व जाणे
 ते असता
 मी रहाणे

 रहा सदा
तयां पाशी
तिची असे
 तीर्थ काशी

चाराक्षरीबळीराजा

स्पर्धे साठी चाराक्षरी
बळीराजा 


सदा काळ
कष्ट करी
तया म्हणे
शेतकरी 


जलधारा
बरसल्या
बळीराजा
सुखावला


हे वरुणा
इंद्रराजा
ठेव सुखी
बळीराजा 


म्हणवितो
बळीराजा
पण सदा
भोगी सजा


न मिळता
काही हाती
महेनत होते
माती कष्ट 


करी नसे
अर्थ विना
पाणी सारे
े व्यर्थ

वैशाली वर्तक

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१९

चाराक्षरी पांडुरंग

उपक्रम
पांडुरंग

जिथे तिथे
पांडुरंग
भजनात
सारे दंग         1

पांडुरंग
तुची देवा
सदा घडो
तुझी सेवा       2
      

नित्य  घ्यावे
विठू नाम
होती सारी
पूर्ण  काम       3

विठू माझा
नयनात
देई सुख
जीवनात     4

पांडुरंग
विटेवरी
हात सदा
कटी वरी        5

काढा दृष्ट
माऊलीची
घाई झाली
दर्शनाची        6

लागे मज
एक आस
दर्शनास
आले खास          7

आस मनी
दर्शनाची
पांडुरंग
पहाण्याची    8

वैशाली वर्तक

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

गोष्ट एका लग्नाची (विस्तृत लेख)

गोष्ट एका लग्नाची
नोकरी निमित्त मुंबई सोडून दुसऱ्या गावात जावे लागले . नवे शहर.पण ओळखीच्याकडून माहिती काढली....मराठी विस्तारात एक गेस्ट हाऊस आहे ....मराठी वस्ती व मालक पण मराठी .....मी तेथे रहावयास गेलो. गेस्ट हाउस चा मालक गप्पीष्ट..रोज आजुबाजुच्या रहाणा-या लोकांची माहिती देई . " ही बाजुला रहाते ना ! ती नर्स आहे . दिसायला सुरेख आहे बर का! "आणि ,"ती... अगदी समोर रहाणारी ...उभी आहे बाहेर कामात..हुशार आहे ..सर्वीस पण छान आहे ..चार चौघीत उठून दिसणारी आहे..... पण जरा गर्विष्ट आहे.. ..आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे , " तिचे वडिल शिस्तीचे .अहो rss विचाराचे. जरा मुली कडे नजर केली तर दणकाच पडेल . तसे प्रेमळ आहेत. महाराष्ट्र समाजात पण कार्यकारी मंडळात आहेत. दरारा पण आहे त्यांचा." गेस्ट हाउस मघे आम्ही बाहेर गाव ची आलेली मंडळी एकत्र व्हायचो . रोज मालकाच्या गप्पा ऐकायचो.. तो रंगून सांगायचा व आम्ही ऐकायचो. सहज आमच्याच शर्यत लागली ... कोण आहे ही एवढी अक्कड. गर्वीष्ट ....चला ...तिच्याशी जो बोलून दाखवेल त्यास 500रु.मिळणार.. हो त्या वेळी 500 फार मोठी रकम होती. मी पण तयार झालो. ...लागली शर्यत. आमच्या घरा कडे म्हणजे गेस्ट हाउस कडे येतांना तिचे घर आधी यायचे.. त्यामुळे तिच्या घरावरून च पुढे यावे लागे...सहज येता जाता नजरानजर होई ..पण मालकाने सांगितले शब्द कानीं येत . ओसरीत तिचे वडिल व ती , बाजेवर संध्याकाळी बसलेले असत... .कधी भाऊ बहिण, तर कधी आई वडिल ..नेहमी दिसायचे ,जणु तिचे गार्डच असायचे .त्यामुळे तिच्याशी बोलायचे कसे होणार .. व काय बोलणार ..हा सदा प्रश्न च होता. तशी मुलगी खरच छानच होती. आकर्षक ..व खरच स्वतः च्या तो-यातच असायची. मी सहजच आमच्यातील दोन जणांना घेउन.. वडिल व ती ओसरीत बसली असता गेलो.... ,पण.. लगेच ति-हाईक व्यक्ती आल्याने ती उठून आत गेली . मी बोलणे काढले ....सुरु केले की, "आमच्या मालकाने सांगितलं की आपण समाजात कार्यकारी मंडळात आहात ...आम्ही बाहेर गावचे... आम्हाला सभासद होता येईल का ?" वडिलांशी निमित्त काढून बोलणे झाले. मग त्या गावात बाजार कुठे ? पहाण्याची ठिकाणे कोणती? अशी विचार पूस करुन ..सहजता बोलण्यात दाखविली व परत रुम वर आलो. पण बाकीची मंडळी म्हणाली यात मुलीशी तर बोललाच नाहीत.. .....शर्यत तिच्याशी बोलण्याची आहे. झाsssले. परत दोन दिवसांनी वडील व ती बसली असता मी एकटाच गेलो. ती नेहमी प्रमाणे उठून आत गेली.... मग मी स्वतःच , मी कुठला ..नोकरी कुठे... वगैरे सांगून . बोलणे वाढविले व सहज विचारले .की, ,"तुमची मुलगी बँकेत आहेना सर्वीस ला.? कारण माझा एक मित्र येथे बदलून आला आहे .तो त्यांच्याच बँकेत आहे का ? " तिच्या बाबांनी तिला बाहेर बोलविले तर ती उत्त्तरली ,"माहीत नाही... स्टाफ मोठा आहे .पूर्ण नाव माहीत पाहिजे. म्हणत आत निघून गेली .आज तर मी शर्यत दोन वाक्य का होईना बोललो. व . जिंकलो होतो तिच्याशी बोलून ..सरळ रुम वर येउन बाकी मंडळींना सांगितले की मी पैज जिंकलो आहे. पण या पैज जिंकण्यात मला पण ती आवडू लागली होतीच. व तिच्या बाबांशी म्हणजे वडिलांशी वारंवार बोलून माझी पण माहीती देउन मी लग्नाच्या बाजारात उभा आहे ची कल्पना दिली .व त्यांना पण माझ्यात ..त्यांना जावई जसा हवा होता तो मिळतोय याची मला अंधुकशी . कल्पना आली...मुलगी आई वडिलांच्या कह्यात होती. ते जे दाखवतील ते तिला पटणारे होते. व माझे व्यक्तीमत्व पण तितकेच होतेच की पसंत पडण्या सारखे.. असे होत शेवटी .पुढे पुढे....ती पण मी कधी आलो की एकत्र बसू लागली कारण आता गोष्ट .....बोलणी साखर पुड्या पर्यंत आली होती. सहज मी विचारले ,जायचे का शनिवारी सिनेमाला. दोन तिकिट आणली आहेत ..तर वडिलच आधीच म्हणाले नको .साखर पूडा होउ दे. आज तिकीट आहेत तर माझा मुलगा ....तिचा भाऊ वाटले तर येईल.....जरा तुमच्या सम वयस्करांच्या गप्पा पण होतील व ओळख वाढेल. . .मी नाईलाजाने ..होsss हो ssचालेल की करत निघालो. पुढे सर्व बोलणी साखरपुडा पार पडला व यथा सुमुहुर्तावर लग्न पण पार पडले व आज सुखाचा संसार चालू आहे .तर अशी गंमतीदार ... मेरे सामने वाली खिडकी ची.... गोष्ट एका लग्नाची

गोष्ट एका लग्नाची ( प्रसंग )

बरsss झाले वाङनिश्चय आदल्यादिवशी झालेला होता...... हो पुण्यास साधारण पणे आदल्या रात्री करतात. एक दिवस अगोदर हाॕल घेतलेला असतो.... मुंबईत काय !.. एका दिवसात लग्न आटपते.... सकाळीच वाङनिश्चय ...मग लग्न ... .... आणि एका बाजूस आॕफीस मंडळी ची जेवणे .... दुस-या बाजुला लग्न लागल्या नंतर चे विधी. .....की झाले , ...संपले लग्न... पण आमचा वाङनिश्चय लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळीच छान व्यवस्थित पार पडला . वाङनिश्चया नंतर व्याही भेटी चा कार्यक्रम झाला .दोन दिवस हाॕल घेतला होता. आदल्या दिवसा पासून लग्न गाजत होते. . ..पाहुणे मंडळी गावातली होती ती घरी झोपायला गेली ,पण ...बाहेर गावाहून आलेले नातेवाईक हाॕलवरच थांबले होते. त्यांचे मस्त गप्पा टप्पा ..हास्य विनोद चालले होते. आम्ही मात्र घरी झोपायला गेलो. घरी गेल्या गेल्याच बहिणी ने ," चला लवकरच झोपा ....उद्या सकाळी उठून जायचय. सर्वांच्या अंधोळी वेळेत झाल्या पाहिजेत . " असे उवाच्य केले. उद्या ची बॕग प्रत्येकाने नीट तपासून घेतली . हवे ते कपडे प्रसंगानुसार बदलण्याचे घेतले आहे ना..? पुन्हा एकदा चेक केले. व.... झोपण्यास गेलो. सकाळी लवकर उठून तयार होऊन देवास नमस्कार करुन निघालो. त्यावेळी माझी (आमची ) स्वतःची गाडी नव्हती. तेव्हा कुठे इतकी आर्थिक परिस्थिती .... गाडी स्वतःची असण्याची.... पण बहीणीला तिचे ओळखीचे स्नेही ...जोशी यांनी लग्नासाठी... गाडी ड्रायव्हर सह दिली होती. सकाळी निघालो.. आमच्या जवळ मुलीला देण्याचे दागिने तशीच आईच्या व ताईच्या दागिन्या ची जोखमी बॕग होती. ... ..अर्धे अंतर आलो असू , तर गाडी तिचे रुप दाखवू लागली .तशी गाडी नुकतीच गॕरेज मधून सर्वीस करुन आणलेली होती. पण मग त्या गाडीत काय प्रोबलेम होत आहे कळेना. ...काय माहित...मधेच आचके देत थांबायची. थोडा वेळ असेच चालले. जवळ सोने नाणे त्याचे टेंशन..आणि वेळेवर लग्नास पोहचण्याचे टेंशन मनात सुरु झाले. घरी जरी गाडी नव्हती तरी मी गाड्या हाताळल्या होत्या.. स्वतःला mechanical मधे रस होता.व आहे . स्वतः mechanical engeer तसेच आटोमोबाईल चे पण ज्ञान होतेच. व शिक्षण पण घेतले होते. आई बहिण.... गाडी चालू होईना म्हणून चिंतेत पडल्या ..कसे लवकर पोहचणार ...बर त्यावेळी फोन... मोबाईलस् तर नव्हतेच ... तो ड्रायव्हर प्रयत्न करत होता. मधे कुठेच गॕरेज पण दिसत नव्हते. की ,...जिथे गाडी दाखवावी. शेवटी मीच ..बाह्या वर चढवून ... गाडीत काय प्रोबलेम तो पहावयास घेतला. ज्याचे 2/3 तासावर लग्न ....अन् तो 'मुलगा काय करतोय ?..तर गाडी दुरुस्त करतोय ....क्षणभर वाटले उगाच रात्री घरी झोपण्यास आलो. त्यापेक्षा तिकडे हाॕलवर झोपलो असतो तर बरे झाले असते. मस्त हाॕलवर झोपलो असतो ..मित्रां बरोबर शेवटीची बॕचलर लाईफ ... हसी मजाक मधे घालविली असती ..पण आमच्या ताई बाई यांनी नको ...चला घरी चा हट्ट धरला ...असो. शेवटी गाडीचा प्रोबलेम कळला .इंजीन गरम होत होते ...गाडी मधे एखादी मोठी रिकामी बाटली पण नव्हती .... की कुठून पाणी आणावे. तेवढ्यात कुठेतरी construction चाललेले दिसले . ...तेथे ड्रायव्हर ला पाठवून पाणी मिळविले व कशी तरी गाडी सुरु झाली . व हाॕलवर पोहचलो .तेव्हा कुठे हाश झाले. लगेच fresh होऊन दुसरे कपडे चेंज करुन आलो. पण हाॕलवर पोहचलो तर सारे नातेवाईक माझे रुप पाहून विचारात पडले.. हात काळे ..घामाघुम .कपड्यास पण गाडीच्या बोनेटचे डाग... हा लग्न मुलगा ? प्रश्न पडला. मुलाची आई व बहीण पण घामाघुम ... त्यांच्या सर्व मेकअप ची वाट लागलेली. माझ्या पायावर सासुरवाडीच्या लोकांनी दुध पाणी टाकून ....औक्षण वगैरे आटपले. आई व ताई पण फ्रेश होण्यास पळाल्या.. कारण लग्न मुहुर्त साधला पाहिजेना ..आपल्यात मुहुर्ताला महत्व असते. उष्टी हळद मुलीच्या रुम वर पाठवली .ती मंडळी तेथेच रात्री राहिली होती. तिचे पण पटपट आटपते केले. गुरुजी म्हणाले हरकत नाही आपण वैदिक पध्दतीने करु. प्रत्यक्ष लग्न विधीचा मुहुर्त आधी साधूया....मग नंतरचे विधी..... असे म्हणत एकदाच्या लग्न मुहुर्तावर मी बोह-यावर चढलो. आणि मुहुर्तावर माझ्या डोक्यावर अक्षता पडल्या.. व लग्न संपन्न झाले.

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...