गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

ललित लेख तुझ्या आठवात





तुझ्या आठवात 
.. दरवर्षी तुझे येण्याचे नक्की असते .पण तू ठरला ...फारच खट्याळ. तू तुझेच चालावितो. तू तुझ्या मर्जीचा मालक .,,असे वागतोस तुझे नेहमीचे येण्याचे वेळापत्रक तूच आखून दिले आहेस ना ?. मग... का .बरे उगाच वाट पहावयास लावतो. तू येणार या विचाराने मनात विचारांची दाटी भरते ... जशी आकाशी मेघांची... रवी राज त्याच्या कामात मशगुल असतो. व सा-या धरेला त्रस्त करण्यात मागे पुढे पहात नसतो. आधीच रवीराजांनी जन समुदायाला त्रस्थ केलेले असते ...व तू असा बे भरवशाचा. ...किती डोळ्यात तेल घालून वाट पहायची,.. अरे मी च नाही सारी प्रजा ...वाट पहात असते. तुझ्या वाटे कडे वसुंधरा तर डोळे लावून बसली असते .बळीराजा तर सदा नभाकडेच पहाता असतो. आणि खर सांगू ...गेल्या वर्षी अशीच वाट पहात असता..तू अचानक आला .ऋतु खात्याला ... काहीच कल्पना ... अंदाज न देता. त्यांची केवढी तारांबळ उडली. सर्वत्र गार वारा ..सोसायट्याचा वारा, वाळलेली पाने धरती वरची फेर धारुन नाचु लागली. काही इतकी हलकी की वा-यावर स्वार होऊन ..वर वर उडत गेली आणि मोहक गिरक्या घेत खाली आली.. पक्षी तर मोद भरे पंख पसरवून एकमेकास साद घालत... समुहाने इकडून तिकडे स्वैर करु लागले. आता पाणी पडेल या आनंदानं ती मस्त निळ्या अंबरी पंख विस्तारुन हवेत तरंगु लागली .मोर त्याच्या आवाजाची साद घालीत ..लांडोर समोर तिला आकर्षित करण्यास ... स्वतः चा डौलदार पिसारा फुलवून डौलाने नाचु लागला. मुले तर ...".आला रे आला "म्हणून भान विसरून घरा बाहेर उघडी बागडी आनंदाने तुझ्या स्वागतास आली . असे सर्व आनंदमय वातावरण असता ....माझा प्रियाकर पण मनकवडा तुझ्या स्वागतास आला . तुझे स्वागत आम्ही दोघांनी पण हर्षाने उल्हासाने .. तुला कवेत घेउन स्वागत करण्यास आतुर   . दोन्हीही हात पसरवून तुला आलिंगन देण्यास .... तीच आठव आता पण येत आहे तर त्या आठवणींना पुन्हा चिंब भिजविण्यास येना व आठवांची बरसात कर ना 
. वैशाली वर्तक

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

सरस्वती स्तवन अभंग शारदादेवी


रविवारीय  साहित्य स्पर्धा  क्रमांक 29
काव्य प्रकार   अभंग
विषय - शारदा देवी

ब्रह्मा विष्णू शिव । 
करिती नमन। 
तुझेच पूजन। 
देवी माते  ।।                   1

श्वेत वस्त्र धारी   । 
कांती ज्योत्स्नेपरी  । 
शोभे वीणा करी   । 
तुजनमो  ।।                      2

जडता मतीची ।
हरण्या स्तवन  । 
करी सारे जन ।   
देवी तुझे ।।                    3

कमळा आसनी । 
वीणा झंकारते  । 
मनास लोभते  । 
रुप तुझे  ।।                     4

ज्योर्तीमय मूर्ती  । 
गाते गुण गाथा । 
टेकविते माथा  ।  
तुझेपायी   ।।                     5


सोज्वळ ते रुप  । 
मना समाधान । 
विद्या वरदान । 
देतअसे  ।।                      6


देवी सरस्वती । 
आले मी शरण । 
करीते वंदन   । 
तुजलागी   ।। 
     

वैशाली वर्तक
अहमदाबाद










साहित्य कला यात्री महाराष्ट्र राज्य स्तरिय
ईशस्तवन स्पर्धा
सरस्वती स्तवन

माते देवी सरस्वती
तुज करिते नमन
तूच विद्येची दायिनी
तुला आले मी शरण

शुभ्र शोभिवंत माळा
श्वेत वस्त्र परिधान
शांत सोज्वळ ते रुप
देई मना समाधान

श्वेत कमळ आसन
हाती वीणा झंकारते
वसो चित्ती रुप तुझे
सदा मनास लोभते

ब्रह्मा विष्णू महेश ही
तुज करिती नमन
मंद मती हरण्यास
करु तुझेच पूजन

ज्योतिर्मय तव मूर्ती
किती गाऊ गुण गाथा
 ठेवीतसे   मी विनयाने
तव चरणी हा  माथा

वैशाली वर्तक 30/10/2019


काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित 
साहित्यिक नवरात्री उत्सव 
काव्य प्रकार नवाक्षरी
विषय. देवी सरस्वती 

 स्तवन शारदेचे

माते देवी श्री सरस्वती
तुजला करिते नमन
तूची विद्येची ती दायिनी
तुला आलेची मी शरण

शुभ्र कुंद शोभती माळा
श्वेत वस्त्रात परिधान
शांत सोज्वळची ते रुप
देई मनास समाधान

श्वेत कमळाचे आसन
हातात वीणा झंकारते
वसो चित्तात रुप तुझे
सदैव मनास लोभते

ब्रह्मा विष्णू व महेश ही
तुज करिताती नमन
मंद मतीला हरण्यास
करुया तुझेच पूजन

ज्योतिर्मय तुझीच मूर्ती
किती गाऊया गुण गाथा
 ठेवीतसे  आम्ही विनयाने
तव चरणी  सदा माथा

तव मूर्ती सदैव साजरी
पाहूनिया प्रसन्न  मन
शांत भाव ते मूखावरी
 पावती आनंद दर्शने

तुची असे ज्ञान दायिनी
वदती तुज भगवती
दूर करण्या जड मती
दे सदा जीवनी सुमती

तव गुण गाथा वदती
नित्य नेमे ज्ञान मंदीरी
मिळवती तव आशीष 
असती तत्पर अंतरी

तव कृपेचा हातशिरी
राहो  आम्हावर सर्वदा
नच भासे मग उणीव 
जीवनात कदापि कदा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

चला आनंदाने साजरी करुया प्रदुषण मुक्त दिवाळी

स्पर्धे साठी --चला आनंदाने साजरी करुया प्रदुषण मुक्त दिवाळी. खर आहे ..आता तोच क्षण आलाय ..जर आपले जीवन आपल्याला सुरक्षित करायचे असेल तर ... खरच ,चला आनंदाने साजरी करुया प्रदुषण मुक्त दिवाळी. हे फटाके फोडण्याने हवेत पसरणारे प्रदुषण बंद करुया. पूर्वी जन संख्या कमी होती. व फटाके उडवण्याचे प्रमाण कमी होते. आजकाल दसरा संपताच ..जशी दिवाळीची चाहूल लागताच फटाक्यांची दुकाने सजतात. काही नाही तर लहान मोठे फटाके उडविण्यास सुरुवात होते. आधीच हवा प्रदुषण युक्त आहेच ... फॕक्टरींचे प्रदुषण..वहाने इतकी चालतात की वहानांचे प्रदुषण असतेच त्यात फटाक्यांनी प्रदुषण वाढते. आजकाल किती पैसे फटाक्यात टाकायचे याला काही बंधनच नाही .बाजारात पण 500..1000 फटाक्यांची माळ मिळते .एकाने लावली की मी कसा कमी ....दुसरा लावतो. तसेच रात्रभर फटाके वाजविण्यात येतात. पण मग धुराच्या लोंढ्याने सर्व वातावरण धुराचे होते. जे हृदयास योग्य नाही, एवढेच काय आवाजाचा त्रास होतो. मोठे बाॕम लावून आवाजाचे प्रदुषण होते. कानठण्या बसतील असे आवाज .लहान बालकांना तर त्रास होतोच .तसेच वृध्दांना पण होतो. रस्त्यावर ट्राफीकला अडचण येते. पुढचा रस्ता दिसण्यात त्रास होतो. तसेच इतके धुराचे अच्छादन होते की खिडक्या पण उघडता येत नाही .हल्ली पूर्वी सारखी मोकळी घरे पण नाहीत ..सोसायटी त जागा नाही ..छोटे काॕमन plot त्यात दारु खाना उडवून सर्वत्र धुर होतो. त्यामुळे शोभेची दारु उडवावी .दिपोत्सव हा दीप लावून साजरा करायचा. आवाजाने आनंद मानण्यापेक्षा शोभेच्या फटाक्यांनी मजा लुटावी. स्वच्छ तेच्या अभियाना बरोबर प्रदुषण दूर करण्याचे पण अभियान केले पाहिजे, चला त्या प्रमाणे फटाक्या शिवाय दिवाळी साजरी करुया पर्यावरण जतन करु व त्याच बरोबर आरोग्य जताना साठी आनंददायी दिवाळी साजरी करु. वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...