शब्द रजनी कथा \ललित लेख लेखन साहित्य समूह पुणे
प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय स्पर्धा ललित लेख लेखन
दि 16/4/26
विषय .... शब्दांची बरसात भावनांचा सागर
साहित्यात एकंदर
खेळ असे तो शब्दांचा
पूर येतो कल्पनेला
पसाराचा विचारांचा
तर शब्द आहेत म्हणून आपले विचार ..मनातले गुज..आपल्या भावना..आपण
एक दुसऱ्यास सांगू शकतो. आपण दुसऱ्या समोर आपल्या विचारांची मांडणी करून
आपलं मंतव्य सांगू शकतो. तर ही आहे शब्दांची किंमत. वा जादू .
जुळवूनी शब्द शब्द
होते तयार लिखाण
असो मग गद्य पद्य
शब्दांचीच असे खाण
मुल्य सर्वदा शब्दांचे
जाणे शब्द शिल्पकार
शब्द ओवितो उचित
करी तो शब्दाविष्कार
आपल्याला जे विचार .भावना अंतरी येतात , त्यांना शब्दच वाट करून देतात . शब्दांची बरसात होते व साहित्य घडते. मनातील भावनांचा सागर उचंबळतो.व शब्दांतून भाषा समृद्ध होते. साहित्याची भरभराट होते.
त्यासाठी शब्दांचा भंडार वाढविला पाहिजे. जेवढे वाचन जास्त तेवढा शब्द समूह वाढतो . एका शब्दास समान अर्थी शब्द मिळतात व भाषावर प्रभुत्व वाढते. तसेच
अलंकारिक शब्दाने पण लेखन प्रभावी होते.
या साऱ्या साठी शब्दांची बरसात व्हायला पाहिजे. म्हणजेच काय शब्द आहेत तर
भाषा आहे ,संवाद आहे. तरच साहित्य आहे.जसे मुर्तीकार शिल्प करतो तसे
शब्द शिल्पकार शब्द रचून रचनेतून शब्द शिल्पकार घडतो.
शब्द शिल्पकार सदा
देतो मनास उभारी
जपणूक संस्कृतीची
काम त्याचे सदा भारी
शब्द शिल्पकारांपैकी
वाल्मिकींचे रामायण
जन ज्याचे करितात
सदासाठी पारायण.
आपला शब्द रजनी समूह पण विषय देताच सारस्वत नियमित लेखन करतात,
आपल्या लेखणीस धार देत लेखणी लेखणी करतात.
कधी असे होते की लेखणी रुसून बसते काही केल्या शब्दच अधरी येत नाही, सतत
लेखन गरजेचे असते. जेव्हा भाषा नव्हती तेव्हा चित्र काढून भावना वा विचार दाखविले जाई,वा अशिक्षित असता चित्राची मदत घेतली जाते.
तर असे महत्व आहे शब्दांचे,
वैशाली वर्तक
अहमदाबाद