शनिवार, ११ जून, २०२२

नेत्र दान

सावली प्रकाशन समूह
उपक्रमासाठी
विषय - नेत्रदान
       सामाजिक ऊतराई
        
 पाहीली सारी रम्य दुनिया
मानीतो आभार विश्वंभराचे
ज्याने दिधली आपणा दृष्टी 
 भाग्य दिले  सृष्टी  पहाण्याचे

करावे सत्कर्म जीवनी
मरणोत्तर करावे *नेत्रदान*
तिमीरास दिसेल प्रकाश
दृष्टी मिळता भाग्यवान


 ऋण जाणा   समाजाचे 
दृष्टी   मिळता अंधजना
पाहिल तोही सारी सृष्टी 
हर्ष होईल आपुल्या मना

 
संपता यात्रा  जीवनाची
देह आहेची   हा  नश्वर
करीता अंधजना *नेत्रदान*
वरदान  देईल   तो ईश्वर

अन्नदान रक्तदान देहदान
नेत्रदानाचा विचार  वेगळा
मिळेल मोद जग पहाण्याचा
सर्व दानात  असे तो  आगळा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद





मंगळवार, ७ जून, २०२२

अष्टाक्षरी विद्याधन

अक्षरमंच राज्य स्तरीय काव्य  लेखन  स्पर्धा  क्रमांक 25
अष्टपैलू संस्कृती  कला अकादमी काव्यलेखन
स्पर्धा   क्र  25
विषय  -  विद्याधन
अष्टाक्षरी रचना

विद्या आहे जया पाशी
तोची ठरतो महान
करा विद्या संपादन 
मिळे तयाशी सन्मान

विद्याहीन माणसास
पशु सम देती मान
जाणा महत्त्व  विद्येचे
जगी होण्यास महान


सर्व  धनात ते श्रेष्ठ 
भय चोरीचे न असे 
देता धन दुस-यास
वृध्दी तयात होतसे

होते   पूजन राजाचे
त्याच्या  फक्त दरबारी
मान तो विद्याधनास
मिळे जगात तो भारी


हेच धन मित्रा सम
गेलो परदेशी जरी
विद्याधन मदतीस
येते हेच खरोखरी

विद्याधन सर्वोकृष्ट
जगतात   गाजावाजा
थोर ज्ञानी ज्ञानेश्वर
मान  ज्ञानियाचा राजा

सौ वैशाली अविनाश वर्तक

सोमवार, ६ जून, २०२२

जळत राहते संवेदना ( वेदना भाव काळजात)

 मनस्पर्शी साहित्य  परिवार आयोजित 

राज्य स्तरिय  मासिक काव्यलेखन स्पर्धा

*स्पर्धेसाठी*

विषय - जळत रहाते संवेदना


      *वेदना भाव काळजात*


कष्ट   होता ते जीवास

 होई भावनिक वेदना

दुःख  होते काळजात

*जळत रहाते संवेदना*



  शब्द , कटू  ते ऐकता

मन होतसे उदास

मन असे संवेदनाशील 

भाव कष्टी करी  मनास



होते  वेदना प्राणी मात्रास ही

  दिसते ती निसर्गात 

उगा का लक्ष घारीचे

 संवेदनेने लक्ष  उडता पिल्लात


 

करी  संवेदना घर मनात

ठसठसते सदा जीवाला

थोडीशी  पीडा होताची

कळ येई शरीराला



परी काही वेदना अशा

 देता माता जन्म बालकास

विसरते ती त्या संवेदनांना

 आनंदते पाहताच तान्हुल्यास 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

रविवार, ५ जून, २०२२

मर्यादा/. कुंपण


मर्यादा 

हवी मर्यादा जीवनी

वागण्यात बोलण्यात

आणावी ती अंमलात

सुखी होतो जीवनात



रोजच्या जीवनाला

लावा वळण मर्यादेचे

म्हणजे जगण होते 

सदोदित नियोजनाचे 



नदीला असतो काठ

सागरास  तो किनारा

त्यामुळे वसतात नगर

 मिळे मानवास निवारा



दिसे मर्यादा निसर्गात 

म्हणूनच चाले ऋतुचक्र

जरा होता तो असमतोल

निसर्गाची होते दृष्टी वक्र



अशी महती मर्यादेची

जीवनात ठेवा ध्यानात

ओलांडता रेष सीतेने

घडले रामायण क्षणात



वैशाली वर्तक





कुंपण असते रक्षक
धुसणखोरीस घालते आळा
जणु अबोलतेने  सांगते
आपापली मर्यादा पाळा.

 वाचण्यास गुरांपासून
कुंपण हवे शेताला
 सीमा पण आपोआप 
जाण देते मनाला


रोजच्या जीवनाला
लावा वळण मर्यादेचे
म्हणजे जगण होते 
सदोदित नियोजनाचे
 
संस्कार व संस्कृतीचे
पाळावे जीवनी बंधन
उज्वल भवितव्य घडण्या
कामास येई कुंपण




सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...