शुक्रवार, ३० मे, २०२५

अष्टाक्षरी. मायबाप

पश्चिम महाराष्ट्र काव्य करंडक काव्य लेखन स्पर्धा २०२५
स्पर्धा फेरी क्रमांक २
शब्दसेतू  साहित्य मंच पुणे आणि मोरणा कवी कट्टा समूह, पश्चिम महाराष्ट्र 
यांच्या विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन महा स्पर्धा 
दि १\६\२०२५

विषय  मायबाप 
काव्यप्रकार अष्टाक्षरी 
*जीवनाचे शिल्पकार* 


देवा सम मायबाप
जीवनाचे शिल्पकार 
घेती अतोनात कष्ट 
देण्या जीवना आकार 

मायबाप दोघे गुरू 
दोघांचेही योगदान 
त्यांचे कर्तृत्व महान
द्यावा नित्य नेमे मान.

ऋण आईवडिलांचे
फिटणार कधी नाही
कसे घडवू पाल्यांना 
हीच चिंता मनी राही.

मनी तयांच्या एकच
असे उत्कर्षाचा ध्यास 
पाल्य व्हावेत शिकून
कली-युगातील व्यास.

घाम गाळूनी श्रमाने
कष्ट साही अहोरात्र 
मुखावरी न दाखवी
मायबाप एकमात्र.

दु:ख झेली घरासाठी 
राहो कुटुंब सुखात 
हाच मंत्र ध्यानी मनी
विठु गजर मुखात.

कलाकार संबोधती 
प्रेक्षकांना  मायबाप
कला गुण प्रसंशिता
देती कौतुकाची थाप

तुकोबांचे विठुराया 
वसे सदैव अंतरी
तेची माझे मायबाप 
अन् माहेर पंढरी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, २५ मे, २०२५

ठेव. शब्द गंध सिंगापूर

    सिंगापूर शब्दगंध चां शब्द 

          ठेव 
बालपणीच्या  जपणूकीची 
मोरपीस,जाळीदार पिंपळपान ,
 वा चॉकलेटच्या चांदयाची
असे आगळीच  ठेवेची शान

थेंबे थेंबे तळे साचे 
बचत करून ठेव पैका
भविष्यात येतो कामी 
बचतीचा महिमा ऐका

आई बाबांचे संस्कार
दुसरी अमुल्य ठेव
जीवनात येते कामी 
ज्याचे कौतुक एकमेव 

 बालपणीची संस्काराची  
  पूंजी मानितो मी ठेवी समान
   तिच्या बळावर सदा जीवनी
  मिळविला मान सन्मान 

संस्काराने सुसंस्कृत 
होतो आपण विद्यावान 
नसे चोरी भय विद्या ठेवीस
 खर्चताही  वृध्दी वेगवान 
 
ठेव वाढवावी नित्य
सत्कर्माची   जीवनात 
पुण्य  संचित कर्माने
 जाते आयुष्य आनंदात 


 आठवणींची पूंजी
अतिशय महत्त्वाची
पुन्हा चुका न होण्यास
मनी ते रुजवायची


पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...