बुधवार, १३ एप्रिल, २०२२
आधार
मंगळवार, १२ एप्रिल, २०२२
वृक्ष /झाडे..कविता...चारोळ्या ५)संवाद कथा सखासाथी बालकविता मित्र आपुला
शब्दसेतू साहित्य मंच
आयोजित साप्ताहिक उपक्रम4/22
1 विषय - झाड /वृक्ष / तरु
होते बसले उपवनी
विसावण्या आले पक्षी
बसले वृक्ष फांदीवरी
उडता दिसली नभात नक्षी
बहरलेले हरित पर्णांनी
वृक्ष होती बहरदार
पक्षी, किटकांना देत निवारा
झाडे दिसती डौलदार
साहूनी उष्ण झळा
पशुंना देतसे छाया
पथिकास देई गारवा
जणू करी प्रेमळ माया
वृक्ष असे सत् पुरुषा सम
देई फळ फुल छाया
जरी करिता तया आघात
करी सदैव प्रेमाची माया
थांबवी मातीची धूप
मदत रूप पावसास
फुला फळांनी बहरूनी
आनंददायी असते मनास
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शब्दसेतू साहित्य मंच
साप्ताहिक उपक्रम 4/22
2 विषय - वृक्ष /झाडे
चारोळी जोड शब्द व जोडाक्षर
1
प्रगतीच्या नावाखाली झाली
वृक्षाची फार तोड- मोड
मानवाचा वाढलाय लोभ
वृक्षासवे आता नाते जोड 1
होता नाशची वृक्षांचा
कोण कोणा देईल छाया
झाडे शोधी सावलीला
दिसे न कोठे प्रेमळ माया 2
वृक्ष वल्लरी तर हवीच
पंथस्थाला देण्या छाया
दमल्या-थकल्या जनास
थंड सावलीची देई माया 3
झाडाची मुळे शोषी जल
थांबवी मातीची धूप
बरसता जलधारा
वृक्ष वाढ होई खूप 4
वृक्ष असती सखे सोयरे
देती फळे फुले अन्न
वाढवा जतन करा वृक्ष
करती मनास प्रसन्न 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद
3शब्दसेतू साहित्य मंच पुणे आयोजित
उपक्रम क्र ४/२२
१३/४/२२
विषय- झाड
झाडास पत्र लेखन
श्री
प्रेषक
वैशाली वर्तक
सेटेलाईट
अहमदाबाद
प्रति
शमी झाड
कृष्ण मंदीर
भद्र
अहमदाबाद
माननीय शमी वृक्षास
सविनय नमस्कार
आश्चर्य वाटले ना तुला?. माझे पत्र पाहून ,साहजिकच आहे. अरे, आज मा .कविराजांनी विषय दिल्याने तुझी आठवण तरी झाली.
तुझ्या बरोबरीचे कोणीच साथी आता मंदीराच्या आवारात राहिले नाहीत. तुझ्या समोरच्या कडू-निंबच्या खोडातून कधी कधी गोंद काढायचो ...तो गेला. ..तसेच बाजूचे चारोळीचे झाड होते ते ही गेले पडून.. आणि आमच्याच घरावरचे चिंच चे वृक्ष केवढा घेरावा होता त्याचा. ते पण मालकांनी कापले. पिलोडीचे झाड तर आधीच पडले ...का कापले लक्षात नाही.
पण तू मात्र आजतागायत उभा आहे.
अजूनही आठवते दर दस-याला तुझी रीत सर ब्राह्यण- गुरुजीकरवी पुजा व्हायची. तुझी पुजा झाली की ..आम्ही मुले सोने लुटायला निघायचो. तुझ्या सावलीत किती खेळलोत. तसा तू बराच उंच त्यामुळे फांद्याशी काही खेळल्याचे स्मरणात नाही.
पण आता वाईट वाटते. कसली पूजा नी काय ! काही होत नाही. उलट तुझ्या खोडाला बारिक कुरतडून...
मालक काय पैसे कमवत आहे . काय तर म्हणे पांडवांनी शस्त्रे ठेवली ते हे झाड. खोडाला उकरुन तुझा घेरावा कमी करत आहे. ते तुकडे घरात ठेवता समृद्धी येते म्हणे.. ..बर पाणी तर घालणे नाहीच.
खरच मनुष्य पहा कसा अमानुष पैशा साठी होत आहे. खरच आज तुझ्या शी बोलून छान वाटले . तुझी काळजी आता नक्कीच घेऊ. खास भेटायला येईन.
तुझ्या सावलीत खेळलेली
वैशाली
झाड व मी
हितगुज
(घराच्या अंगणात बसले होते. बाजूला आंगणात 2/3 झाड आहेत
मी -- छे बाई ! काय ही गर्मी.सूर्य नुसता आग ओकतोय.
अजून एप्रिल चालू आहे .
झाड - हो ना अजून तर मे यायचा आहे.
मी -- अरे काय ही तुझी दशा . आता कुठे थोडी पालवी फुटत आहे.
कधी पाना पानांनी बहरशील व घनदाट छाया देशील
झाड- येतील ताई पाने. आज तुला उन्हाळा सहन झाला नाही
तर तुला माझी पानगळने कमी झालेली तुरळक
पाने ..दिसत आहेत. पण मग बघ कसा डौलदार दिसेन
मी -- हो घनदाट पाने येतील तर जरा गारवा मिळेल ना.
झाड -- मग माझा शेजारीच्या झाडाची पानगळ सुरु झाली की त्याचा तुला त्रास
सतत त्रास होतो. म्हणून कापून टाकण्याचा विचार येतो. कारण सफाईचे काम
फार त्रासाचे होते . पृण काय ग हे तर चालणारच ना
मी -- हो रे कंटाळजनक होते. पण नाही ...क्षणभर वाटते .तसे तर बहावा बाजुचा
बहावा आता अंगणात बहरतो की दर 15/20 मिनीटांनी फुले पडतात. केर
काढून न काढून सारखा च वाटते पण ते 2/3 महीनेच.
झाड - आणि संध्याकाळी आरामात आम्ही आनंदाने वारा घालतो ते कसे बरे वाटते.
तेव्हा कसे सुखावह होऊन बसता
मी -- - हो ते खरच आहे रे. तुझ्या मुळे सकाळ कशी अल्हाददायी जाते.
झाड- हो म्हणूनच तुम्ही आता सुज्ञ आहात तुम्हाला काय सांगणार .थंडीच्या आधी
पावसाळ्यात वाढलेल्या फांद्या कापाव्यात जळण म्हणून लाकडे मिळतात.
व सूर्याची किरणे पण खाल पर्यत येउन थंडीत जरा बरे वाटते
मी - हो ना ..यंदा आम्ही तुझ्या फांद्या चा छान उपयोग केला शेकोटी म्हणून
झाड - मग आहोतच आम्ही परोपकारी.. उगाच का आम्हाला सत् पुरुषाची उपमा देतात
मी -- अहाहा.. बोलता बोलता तुझ्या फांद्या हलल्या व थंड वारा तू दिलास
किती छान वाटले . जून महिन्या नंतर तुझे रुप मोहक होईल ..मीच जरा तुझ्या
वर चिडले .. या आती गर्मीने
झाड - चल नियमीत बाकीच्या रोपांची वेलींची पण काळजी घे.
मी - हो मी आता कोप-यात पण एक कडुनींब लावीन म्हणतेय .
झाड - वा छान विचार आहे. आण आमलात लवकर . वाट पहाते.
वैशाली वर्तक
सखा साथी
असे आहे हे वडाचे झाड . नित्य नेमाने पारावर बसून गप्पांचा फड त्याच्या सानिध्यात रंगतो . कोणी वाटसरु दुपारी विसावतो. तर वरिष्ठ नागरिक वर्तमान पत्राच्या पानन् पानाचे वाचन करत सकाळ घालवितात. तर दुसरी मंडळीची मस्त राजकारणावर चर्चा रंगते. व मग आपापल्या घरी पांगतात. पुन्हा संध्याकाळी गप्पा असतातच. आणि या वृक्षाचे एकच काम छाया देऊन प्रेमळ माया करणे. जनांच्या गप्पा चवीने ऐकणे.
मंदीरात जसे खांब असतात त्या खांबाला टेकून भक्त जन माऊलीच्या देवाच्या सान्निध्यात विसावतात. तसे लोक वृक्षाच्या छायेत बसून एकमेकांना मनीचे गुज सांगतात. झाड सर्वांचे हितगुज ऐकून घेतो. कधी थकलेल्यास गारवा देऊन वा दुःखी कष्टी मनास थंड वारा देऊन दुःखाची झळ कमी करतो.
पक्ष्यांनीआपआपले घरटी कोट-या झाडाच्या खोबणीत तयार केल्या आहेत. व आपल्या पिलांना कोटरीत सोडून चारा पाणी आणण्यास जातात. संध्याकाळी कोटरीत परत येऊन पिलांशी चिवचिवाट करुन रात्री सुखाने निजतात.
असा आमचा सखा साथी वड सज्जन पुरुषा प्रमाणे आहे. व सर्वाचा सखा सोबती बनला आहे.
सकाळ होता थंड वा-याची झुळुक वड आपली पर्णे हालवून जन मनास सुखावतो व सकाळ कशी अल्हाददायी करतो . सुमनांचा परिमल आसमंतात पसरवितो. झाडावरच्या पक्षांची किलबिल साखर झोपेत गोड वाटते.
खरय, देवाने सृष्टी निर्माण केली , यात वनस्पती ची उत्पती केल्याने सृष्टी रमणीय झालीय.याची जाणीव त्याच्या कडे पाहून होते.
. सकाळचे वातावरण प्रसन्न .. त्यात झाडांच्या पानांची सळसळ... मंद झुळूक याचा आनंददायी अनुभव घ्यायला मिळतो.
असे सुख दायी वृक्ष जनांच्या सेवेत सदैव हजर असते. त्याच्या पारब्यांवर मुले झुलतात झोके घेतात. वटपौर्णिमेला तर त्याची वेगळीच शान दिसते. सा-या बायका पारावर येऊन विधीवत पूजा करतात. आता कोणी उगाच फांद्या कापणे असे कु कृत्य करत नाही. सर्वांना पर्यावरणची चांगलीच जाणीव आली आहे .उलट आधीपासून दुसरी 2/4 वृक्ष रोपण केली आहेत.
झाड आमच्या विस्तारातील एक कौटुंबिक सदस्यच झाला आहे. त्याची काळजी पण सारे घेतात. त्याचे या विस्तारात इतके महत्व की पत्ता सांगतांना पण त्या वडाचा उल्लेख केला जातो.
कुठे रहाता? विचारले तर
आपला सखा वड म्हणून त्याचा उल्लेख होतो.
आज 70 /75 वर्षा पासून सेवेत उभे आहेत. परवा तर त्या वट वृक्षास भेटण्यास
एक सद् गृहस्थ.... पूर्वी येथे रहायचे ते खास त्या वडाच्या झाडास पहाण्यास भेटण्यास आले. होते. तेथे 15/20 मिनीटे बसून त्याच्या मुळा कडील जागा स्वच्छ करुन .पार कुठे खंगला नाही ना आणि असेल ...तर नीट करायची व्यवस्था करुन घेतली व पुन्हा पाहून झाडास भेटून गेले.
खरच आहे वृक्षाची माया जडते. आपल्यातील एक बनते. जीव लागतो.
उगा का संत तुकारामांनी वृक्षाचे वर्णन आपल्या गीतात केले आहे.
काल तर एक आजी वडाला दृष्ट नको लागायला म्हणून दृष्ट काढत होत्या .
मी पण माझ्या जुन्या सोय-यास .. सख्यास.. वडास परवाच जाऊन भेटले. आणि काय सांगू त्याने पण आगतिक होऊन थंड वा-याने माझे स्वागत केले .मला आईने जसे
ये ग बैस बरेचदिवसांनी आलीस अशी विचारपूस केल्याची जाणीव झाली. असा परोपकारी आहे वड. वड नव्हे *सखा साथी*
शब्दसेतू साहित्य मंच
आयोजित साप्ताहिक उपक्रम क्र 4//22
विषय - झाड /वृक्ष
मित्र आपुला
या या मित्रांनो ,खेळू आपण सारे
झाड बोलावतोय ,ऐका त्याचे इशारे
पसरून पांघरूण, भले मोठे छायेचे
नको लागण्या झळ, पहा किती मायेचे
पाने हलवी बोलवण्या , जोर जोराने
जणू भासे हसतय ,मोठ ss मोठ्याने
वा-याच्या संगतीत, हलता डुलता
फुले पडलीत पहा , बघता बघता
दावी आनंद त्याचा, फुले फळे देऊन
नाही कधी रागावणे, सदा हसत बघून
आहेची मित्र आपला , उभा ऊन्हात सदा
देण्या छाया आपणास ,कंटाळत नाही कदा
या या लवकर सारे ,आहे दिन पर्यावरण
वाढेल आपला एक मित्र,करू वृक्ष रोपण
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सरत्या वर्षाने काय दिले
स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित झटपट काव्यलेखन स्पर्धा विषय सरत्या वर्षाने काय दिले विचार करता मनी काय मिळाले गत वर्षात दिले सुख आनं...
-
काव्य स्पंदन राज्य स्तरीय समूह 02 काव्य प्रकार -- अष्टाक्षरी 1 विषय -- उंच भरारी आकाशी आहे तुझ्यात कर्तृत्व घेण्या नभात भरारी दाव सामर...
-
सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम 348 विषय. नारळ कल्पवृक्ष स्थान फळांत मानाचे असे सदा नारळाला श्री उपपद लावून वदती ...
-
इथं इध बस ग चिऊ दाणा खा पाणी पी अन् बाळाच्या डोक्यावरून भुर्रsssकन उडून जा. असे म्हणत विभावरी बाळाला खेळवत होती. ...