बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

फुलपाखरु चित्र काव्य

आ भा म सा परिषद  समूह 02
उपक्रम  56
चित्र  काव्य -- 
       
शीर्षक ः *सुंदर फुलपाखरु*


किती सुंदर  फुलपाखरु
पाहताच  आकर्षते मनाला
सदा साठी मोहक दिसे
 लुब्ध करते सर्व जनाला

लाल रंगात  छटा भारी
ठिपक्यांची नक्षी त्यावरी
कोणीही सुंदर  नसे भुवरी
 पाहून तया वाटे क्षणभरी

चपळता किती पहा तरी
जागा बदली हर क्षणाला
म्हणूनच उपमा देती त्याची  
सारे जन तयांच्या मनाला

किती लहान जीव त्याचा
असे अल्पायुषी जरी
रंगात दावी   विविधता
आनंद देत सदा विहरी

सहजच देई संदेश जगाला
 जीवन नसे कदा निरर्थक
लुटावा परिमळ मोदाचा
तयातच जीवनाचे सार्थक

वैशाली वर्तक

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

मज राहवले नाही......ओढ

लेखणी माझी देखणी समूह आयोजित 
जेष्ठ गझलकार  स्व किरण जोगळेकर 
जयंती विशेष  काव्य लेखन  महास्पर्धा
फेरी क्र  .1

  ओळ काव्य -मज राहवले नाही

   शीर्षक - *ओढ*

भेट आपुली  पहिली
 *मज  नाही राहवले*
माझ्या  विचलित मना   
तूची   मज सावरले           1


पहिल्याच भेटीतला
वाटे अश्वासक   स्पर्श 
 दिले अनामिक सुख
देतो मना सदा हर्ष            2

छंद तुला  बघण्याचा
कसे आवरु मनाला
तुझाओझरता स्पर्श 
वेड लावितो जीवाला        3 

गंध तुझ्याच  प्रीतीचा
सदा   रहातो अंतरी 
रोज वसंत फुलेल       
 विश्वासाने ऊर भरी           4

सख्या येता सांजवेळ
उजळती आठवणी
मज नाही रहावले
प्रीत गंध स्मरे  मनी          5                             


LMD 37

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

सहाक्षरी क्षणभर थांब

काव्य स्पंदन  राज्यस्तरीय  समूह 02
काव्य स्पंदनी रविवारीय  स्पर्धा
काव्य प्रकार - षडाक्षरी 
विषय - क्षणभर थांब 

     *निवांत*
किती पळशील
 सदा जीवनात
क्षणभर थांब
जरा निवांतात      1

बघ उगवता
सूर्य  गगनात
न्याहाळ तयाच्या
प्रभा आनंदात       2

पहा झुळुझुळु
वाहे तो निर्झर
 निनाद ऐकण्या
थांब   क्षणभर      3

सांजवेळी बघ
नभातील पक्षी
किती मनोहर
दिसतेय नक्षी        4

येता रवि नभी 
कळ्या अलवार
फुलूनी डौलती
 फुले  हळुवार       5

मोहक मोगरा 
फुलला पानात
गंध दरवळे
पहा क्षणार्धात          6

सृष्टीची किमया
पहा  खरोखर 
क्षणभर थांब
आहे मनोहर          6
 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...