शब्दरजनी साहित्य समुह
कमळविश्व राज्य स्तर स्पर्धा समूह आयोजित
राज्य स्तरीय मासिक काव्य लेखन स्पर्धा
कमळविश्व राज्यस्तर स्पर्धेसाठी
विषय -- पानगळ
शीर्षक - *नियम सृष्टीचा*
येते ऐकू एका वेळी
सळसळ ही पानांची
सुरु होता *पानगळ*
शोभा जाते त्या वृक्षाची
होता पाने ती पिवळी
जागा करी हिरव्यास
नियमच तो सृष्टीचा
होत नाहीत उदास
घेत गिरक्या पडते
पान पिवळे भु -वरी
मिसळूनी मातीतूनी
खतासाठी काम करी
सहा ऋतूंचे सोहळे
अपूर्वाई निसर्गाची
वर्षा दावी हिरवाई
सृष्टीवर तारुण्याची..
शरदात पानगळ
निस्तेजता वृक्षावरी
पाचोळ्याचा पसा-याने
पीत रंग भुभीवरी
येतो वसंत डौलाने
संपतेच मरगळ
बहरती वृक्ष पुन्हा
विसरुनी पानगळ
........ वैशाली वर्तक
अहमदाबाद 7/1/2021
पानगळ
निसर्गच शिकवतो
कसे जगायचे हसत
येतो पानगळ नंतरच
ऋतू बहरण्या वसंत
देत जागा हरित पर्णा
निखळे पिवळे पान
मनी असे प्रबळ आशा
पुन्हा नव्याने बहरीन छान
सोडता फांदी न खंत मनी
घेते पर्ण गिरकी मजेत
जीवन चक्र चालणार
हजर होऊ नव्याने सेवेत
असे सार जीवनाचे
मानवाने घ्यावं ध्यानात
ओलाव्यात बहरायचे
जीवन मंत्र सदा मनात
वैशाली वर्तक
अहमदाबाद
.