बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

वस्त्र mms mohnachya सांगण्याने

वस्त्र 

मानवाच्या मूलभूत 
अन्न  वस्त्र  व निवारा ,
असती तीन गरजा
त्याच्यासाठी हा पसारा.

वस्त्र हवे, अंग रक्षणा
वाढवी शोभा  तनाची 
किती असती विविध प्रकार,
हौस पुरविण्या मनाची.

रंगी बेरंगी सुंदर आकर्षक 
रोज नव नवीन शैली वस्त्रात,
ऋतूनुसार करीती परिधान
वस्त्र  वाढ करी,   व्यक्तीमत्त्वात


असूनही शेले भरजरी
सा ssधी चिंधी वस्त्र नसता
प्रेमा पायी फाडली पैठणी 
 बोटाची रक्ताची,   धार बघता

श्रीहरीने पुरविली वस्त्रे
लज्जा रक्षणार्थे द्रौपदीला
श्रीरामाने भक्त कबीराचा
  शेला पूर्णची  विणीला

असे  हे महत्त्व वस्त्राचे
गाजले ,   कोरोना काळात 
परिधान वस्त्राला  अनुरूप 
बांधले मुखी सर्वांनी जगात.



वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
8141427430

प्रेमातील गोडवा

सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित स्पर्धा 
स्पर्धा क्रमांक 1
काव्यप्रकार पारंपारिक 
विषय. ... प्रेमातील गोडवा

   शीर्षक...प्रेम भावना

प्रेमच असे उत्कट भावना
कसे करु  तिचे गुणगान
होत नाही  कधी किंमत प्रेमाची
प्रेम देई मनाला समाधान

अंतरी वाटे सदैव एकभाव
प्रेमात नसे कधी मी तू पण
जणु  असूनी दोन जीव 
वसती, जैसे एकच आपण

*प्रेमाचा गोडवा* दावी आपुलकी 
स्वार्थी भावाचा असे अभाव.
दिसे सर्वस्वाचा त्याग 
नसे आप मतलब ठाव

आपुलकीची भावना मनी
प्रेमात दिसे सदैव तत्पर
करुणा, दयेचे,  प्रेमळ झरे
वहाताती सदैव निरंतर

जशी नदी साहूनी कडे-कपारी
येता धावत  नसे खंत 
तिच भावना एकमेकासाठी
कष्ट करण्यात नसे उसंत

असा प्रेमाचा गोडवा 
वसे प्रेम  चराचरात
देई आनंद भरभरूनी
भरलेले प्रेम  चराचरात 

वैशाली वर्तक .
अहमदाबाद .
8141427430

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

सहाक्षरी. सोनेरी पहाट./ माहेर

विश्व लेखकांचे 
आयोजित उपक्रम 
षडाक्षरी काव्य लेखन 
विषय .. सोनेरी पहाट 


शशी मावळला
मंदावले तारे
थंड  ती लहर
झोंबे अंगा वारे


झाली झुंज मुंज 
 प्राची उजळली
रवीची किरणे 
नभी पसरली

केशराचे सडे
सोनेरी पहाट
पक्षी करितात
तो  किलबिलाट 


दरवळे गंध
सुमने फुलली
सोनेरी पहाट 
मंडळी जाहली.

वैशाली वर्तक 



अहमदाबाद*स्पर्धेसाठी* 
अभामसाप धुळे जिल्हा 
सहाक्षरी. काव्यरचना
विषय ... माहेर 
 *आवडीचे स्थान*

शब्दची माहेर 
करी आठवण 
उभे डोळ्यापुढे 
सारे बालपण.

प्रेमाचा तो हात
भासे अंगावरी
आईचा फिरला
पहा क्षणभरी

क्षणोक्षणी सय 
आजीची ती माया
मनात दडली
ममतेची छाया

दिन ते मौजेचे
ओढ सदैवाची
मनी लागलेली 
आस माहेराची


लेक सोडूनिया
स्वतःचे माहेर 
जणु सासराला
असे तो आहेर

खुशाली कळता
 जीव आनंदतो
तरी भेटीसाठी 
सदा आतुरतो.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

चित्र काव्य. सिंगापूर शब्दगंध

शब्दगंध सिंगापूर 7/10/24

भान

प्रसंग, घटना ,अस्तित्वाची
मानवाच्या चित्ताची  जाण
 वा, तयाच्या अंतर्मनातील 
एक जाणीव, ते असे भान

जाण,  लक्ष , ध्यान सारेची
दाखवीती   चित्ताचे भान
 मन असता एकाग्र कामात 
 मानव  विसरे देहभान 

 
रोजच्या दैनंदिन जीवनात 
वागताना जरूरी असे भान
आपापली कर्तव्ये समजून 
वागावे , न होता बेभान 

मराठी भाषेला मिळालाय
दर्जा अभिजात, ठेवून ती जाण
मराठी बोलून वाचून लिहून 
भाषेचे जतन करण्याचे राखू भान

 भक्तीत लीन मीराबाई 
 विसरूनिया देहभान 
विसर पडे काळ वेळेचा
 भक्तीरसात सदा  रममाण.

 
वैशाली वर्तक

भान. सिंगापूर शब्द गंध 28/10/24

शब्दगंध सिंगापूर 7/10/24

भान

प्रसंग, घटना ,अस्तित्वाची
मानवाच्या चित्ताची  जाण
 वा, तयाच्या अंतर्मनातील 
एक जाणीव, ते असे भान

जाण,  लक्ष , ध्यान सारेची
दाखवीती   चित्ताचे भान
 मन असता एकाग्र कामात 
 मानव  विसरे देहभान 

 
रोजच्या दैनंदिन जीवनात 
वागताना जरूरी असे भान
आपापली कर्तव्ये समजून 
वागावे , न होता बेभान 

मराठी भाषेला मिळालाय
दर्जा अभिजात, ठेवून ती जाण
मराठी बोलून वाचून लिहून 
भाषेचे जतन करण्याचे राखू भान

 भक्तीत लीन मीराबाई 
 विसरूनिया देहभान 
विसर पडे काळ वेळेचा
 भक्तीरसात सदा  रममाण.

 
वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...