शनिवार, १९ एप्रिल, २०२५

चित्र काव्य स्वप्न परी

 मोहरली लेखणी साहित्य समूह 

चित्र काव्य 

दि 25/3/25

शीर्षक ...स्वप्न परी


पाहताच सुंदरीला

प्राची झाली प्रफुल्लित 

काय नावे बोलावू तिज

मन झाले संभ्रमित 


कमनीय बांधा तिचा

भासे उतरली परी

मोहक तिच्या रुपानेी

झोप उडाली झडकरी 


सारूनिया पांघरूण 

नयन सुख घेऊ पाहे 

मोकळ्या त्या कुंतलाना

मन डोळा भरून पाहे


कशी आली अचानक 

 कसा  तिला पत्ता ठाव

माझे मलाच कळेना

कसे विचारावे तिज नाव


झाला गजर घड्याळाचा 

झालो स्वप्नातून जागा

बंद करण्यास हात जाता 

ध्यानी आला स्वप्नाचा धागा.


वैशाली वर्तक 

 अहमदाबाद

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

गीत ... सहचारिणी मी, मीच अर्धांगिनी

 काव्यस्पंदन राज्यस्तरीय  02

आयोजित  उपक्रम

18/4/25

ओळ काव्य - 

ओळ - सहचारिणी मी , मीच अर्धांगिनी



सहचारिणी मी मीच अर्धांगिनी

नभीचा शशी तू मी तुझी रोहिणी


नभी सांजवेळी , तव संगतीला

असे मीही तुझ्या, सदा सोबतीला

आपुल्या विणा शोभा, नसे नभांगणी

नभीचा  शशी तू,  शोभे  मी रोहिणी   1


 

संसार बागेत ,  भरिलास गंध

तुझ्याच नामाचा ,जडलाची छंद

तव अस्तित्वाने ,शोभे मी स्वामिनी

नभीचा शशी तू  ,शोभे मी  रोहिणी   2


 ओढ किना-याची, असेची लाटेला

तुला भेटण्याची , सदैव मजला

तूची माझा राजा, तुझी मीच राणी

नभीचा शशी तू  ,शोभे मी रोहिणी.       3

 

वैशाली वर्तक 

अहमदाबाद


चित्र काव्य/प्रणाम माझा भारत देशा /जपू एकात्मता /स्वातंत्र्य दिन |तिरंगाची गीत देशाचे

स्वप्नगंध साहित्य समूह
उपक्रम --चित्र काव्य

चार रस्यावर विकून झेंडे
शोधिली  ध्वज रोहणास काठी
रोवून झेंडा झाडा खाली बसली
ठेवले होते  ध्वज स्वतःसाठी

न मिळता ध्वज तीसरीस 
अंगी लेवून  झगा हिरवा 
केसरी कपडा पांढरा खोका
तयार झाला तिरंगा बरवा

अंगावरती वस्त्र फाटके
ध्वज तिरंगा हाती शोभे
न जाणिती मोल स्वातंत्र्याचे
पण स्वानंदाने वंदनास उभे

घेऊन हाती तिरंगा देशाचा
झाडा खाली झाली गोळा
नारा लावूनी भारत मातेचा
झाला स्वातंत्र्य  दिन सोहळा

वैशाली वर्तक

अभामसाप पुणे शहर आयोजित भव्य
राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा
१५-८-२३
स्पर्धेसाठी
विषय..प्रणाम माझा भारत देशा
शीर्षक... किती गाऊ थोरवी

प्रणाम माझा भारत देशा
 सदा मनी तुझा  अभिमान
प्राणाहूनी असे मज प्रिय
तुला गौरविण्यात  माझी शान

असुनिया जाती धर्म अनेक 
वसे समतेचा भाव जनात
रहाती एकोप्याने देशवासी
असा देश नसे , कुठे जगात

एकता नांदे माझ्या  देशात
विलीन केलीत संस्थाने अनेक
राखुनिया मान शब्दांचा
घडविला अखंड भारत एक.

अशी नांदे विविधतेत एकता
स्वातंत्र्य वीरांची किती गावी गाथा
लाल ,बाल ,पालांची स्मृती जागता
नागरिकांचा  उंचावतो माथा

अभिमान वाटे शास्त्रज्ञांचा
 नव्या युगाचा बदल घडविण्यात 
 प्रगतीशील  भारत देश माझा
टाकिले त्याने पाऊल अंतरिक्षात

असा संपन्न समृद्ध भारत
थोर संत वीरांची असे खाण
कला संस्कृतीचे करी जतन
विश्वात शोभता ,मिळे बहुमान



वैशाली वर्तक
अहमदाबाद







भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच रत्नागिरी
आयोजित
विषय ...जपू  राष्ट्राची एकता


जिथे दिसे समता भाव सर्वत्र
असुनिया जाती न् धर्म अनेक
न करी कधी भेद भाव तयात
तोचि असे  असे भारतीय  एक.

अभिमान हा , आपणा संस्कृतिचा
बाळकडू प्यायलेला संस्काराचा
परोपकारी जीव सदा तयाचा
भाव वसे सदा विश्व बंधुत्वाचा.

रक्ताचा एक ,थेंबही न सांडिता
विलीन केलीत संस्थाने अनेक
राखूनिया केवळ शब्दांचा मान
घडविला अखंड भारत एक.

अशी नांदे विविधतेत एकता
स्वातंत्र्य वीरांची किती गावी गाथा
लाल -बाळ-पालांची स्मृती जगता
भारतीयांची जी , उंचाविते माथा

घडविण्या बदल नव्या युगाचा
पाऊल भारतीयांचे पुढे सदा
आली कितीही परकीय संकटे
न डगमगे मन , तयांचे कदा. .

अशी आहे संस्कृतीची शिकवण
तिचेच करु सदा जतन
जपू  राष्टाची एकात्मता
घेउ सारे नागरिक मिळूनी वचन

वैशाली वर्तक
अहमदाबाद 

..


अभाम हा प ठाणे जिल्हा 2
आयोजित उपक्रम क्रमांक 518
काव्य लेखन
विषय..स्वातंत्र्य दिन
शीर्षक..मोल जाणा स्वातंत्र्य दिनाचे

गौरवास्पद दिन आजचा
स्वातंत्र्य दिन भारताचा
दिन भासे सोनियाचा
आनंद सोहळा करण्याचा

बराच झालाय  प्रगत
देश आपला भारत जगात
नव्या युगाचा नव्या जोमाने 
शोभून दिसतोय भारत विश्वात 

झाले उदार जीवावर स्वातंत्र्यासाठी
दिन   असे  तयांना स्मरणाचा
दिले बलिदान वीर  क्रांतीकारींनी 
मोल स्वातंत्र्याचे जाणण्याचा

घेत काळजी पर्यावरणची
 राखण्या स्वच्छ सुंदर भारत
 दावू भाव समानतेचा बनविण्या
आत्मनिर्भर करु प्रयत्न अविरत

वैशाली वर्तक
अहमदाबाद
देशभक्त गीत
सिद्ध साहित्यिक समूह 
आयोजित उपक्रम 
विषय ... देशभक्ती गीत 




माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान
प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान


भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक
नसे भेद- भाव जना ,असा देश जगी एक
काय असे किती वर्णू , भारताचे गुणगान 
प्राणाहून असे  प्रिय , तयाच्या  गौरवात शान


पहा किती एकात्मता, होती संस्थाने अनेक
मान ठेवून शब्दांचा  ,अखंडित  झाली  एक
वल्लभभाईंच्या शब्दांचा,  दिधला जगी  मान
प्राणाहून असे  प्रिय  तयाच्या गौरवात शान


देश हा आत्म निर्भर, येता प्रसंग तो बाका
स्वावलंबी होती जन, येता मदतीच्या हाका
विश्वात शोभून दिसता, उंचावते अभिमाने मान
प्राणाहून असे  प्रिय तयाच्या  गौरवात शान

माझ्या भारत देशाचा मला  सदा अभिमान
प्राणाहून असे  प्रिय तयाच्या  गौरवात शान

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद


बुधवार, १६ एप्रिल, २०२५

विलीक्षण. .... पहिली कविता

कल्याण डोंबिवली महानगर २
आयोजित
उपक्रमासाठी
विषय ... विलक्षण


झाला *विलक्षण* आनंद
करु कसे वर्णन  शब्दांत 
मन  डोले आनंदाने
लेखणीची किमया लेखनात 


जपलीय  मनात मी
माझी पहिली कविता
अगणिक जरी रचल्या
तीच ठरली *गर्विता*

केले होते वर्णन तयात
माझ्या  बागेतील फुलांचे
एका एका फुलांनी वर्णिले
महत्त्व  आपापले स्वतःचे

लिहीली होती कन्येसाठी
भावली  तिला अतिशय
सहज केली तिने तोंडपाठ 
समजून घेऊन आशय

साध्या सोप्या शब्दात 
केली शब्दांची  मांडणी
बालभारती पुस्तकासाठी
आली की हो! तिजला मागणी

 विलक्षण भारावले मनातून 
पहिली रचिली, कविता सहज 
रंगवूनी  भावना  मनीच्या
तिचे गुण गाण्याची नुरली गरज

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, १३ एप्रिल, २०२५

ताई एक वरदान





स्वराज्य लेखणी मंच आयोजित 

कवयित्री सुनीता कपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य लेखन स्पर्धा 

उपक्रम १

काव्य प्रकार  अष्टाक्षरी

दि १३\४\२५

विषय... ताई...एक वरदान 

*स्पर्धेसाठी*

शीर्षक...*ताई तू दुजी आई*


माया तुझी आई सम

तुझी सय  सदा  राही.                             

किती केले लाड तूच

विसरणे शक्य नाही      1


होता कधी चूक माझी

तूची घेई सावरून  

तुझ्या  पदराच्या आड

बसलेला , मी लपून.         2


परीक्षेला पण, जाता 

तुझ्या आशीषाचा हात

असे सदा शिरावर 

यशासाठी  तुझी  साथ.    3



आई बाबांची काळजी       

किती तू कर्तृत्ववान 

झाली तूची आई त्यांची

वाटे ताई मज वरदान         4



 *ताई ...एक वरदान*

 तिच दुजी  असे आई

सदा ऋणी जीवनात 

कसा होऊ  उतराई.            5



ऋण तुझे जन्म भर

कसा होऊ उतराई. 

पूर्ण कर आस देवा

जन्मोजन्मी हीच ताई.         6


वैशाली वर्तक.

 अहमदाबाद.

८१४१४२७४३०


. अष्टाक्षरी ....शेती माती

साहित्य लीला पेपरात २९\७\२५

पंच काव्य रत्न महास्पर्धा
स्पर्धा फेरी क्रमांक २
१३ एप्रिल २०२५
अष्टाक्षरी रचना
विषय .... शेती माती
शीर्षक.. माती अन्नदाती 

माती विणा नसे शेती 
जोड गोळी ती शब्दांची 
शेती साठी हवी माती
काळी माय कृषीकांची.

झळा उन्हाच्या साहूनी
काळी माती  भेगाळते,
वाट पहाते मृगाची
पाण्यासाठी आसुसते.

वाट पाही बळीराजा
काळ्या मेघांना पाहूनी,
नजरेत दिसे  आस              
दावी सदा विनवूनी.

कष्ट करीन उन्हात.  
काळ्या मातीला कसीन,
नांगरुन काळी  माती
घाम तयात गाळीन.

बरसता जलधारा 
माती पहा अंकुरली
सखा वरुण भेटता
भासे  वधूच नटली.

पावसाच्या प्रीतीनेच 
बीजे, शेतीची रूजली
पूर्ण जाहले डोहाळे,
माती, पिकाने सजली.

जोडगोळी माती-शेती
माती असे अन्नदाती,
उगा का ! जन करिती
नित्य वंदन प्रभाती.


वैशाली वर्तक .
अहमदाबाद.

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...