नसतोस घरी तू जेव्हा
" खर म्हणजे एक वेळ होती की जेव्हा नजरे आड झालेेला तू आवडायचा नाहीस .वाटे सदान् कदा तू माझ्या अवती भवती असावा. .जराही दोघांनी एकमेकान पासून क्षणभर पण दूर होऊ नये .
अर्थात हे कसे शक्य असणार .नोकरी... धंदा पाणी तर केलेच पाहिजेना .नाहीतर खाणार काय ? .... नुसते प्रेम... का आकर्षण ?
हो ..आता त्याला गोंडस नाव देतेय " आकर्षण " म्हणून
पण तेव्हा काही नाही हं . तेव्हा ते निव्वssळ प्रेमच वाटायचे.
एवढच काय ..तेव्हा एकमेकास
... "मन" वगैरे म्हणून काय म्हणायचे वा .. संबोधायचे.
तर असे होते ते दिवस. ह्यांना ऑफिस कामाने सतत बाहेर गावी जावे लागे. मग टूरला जायचे आले की ...आले ना पुन्हा विरहाचे दिवस.
खर सांगू ,"त्यावेळीं हे ऑफिस मधून आल्या आल्या , " चला उद्या पासून 3 मला दिवस टूरवर जायचे आहे ."असे यांनी म्हटले की . "तेव्हा क्षणभर मला रामायणातील सीता पण माझ्या पेक्षा सुखी वाटायची.
" निरोप कसला घेता माझा जेथे राधव तेथे सीता " म्हणून ती रामा बरोबर वनवासात पण गेली . पण मला मात्र घर सोडून, नोकरी सोडून, आणि त्यात मुलांच्या शाळा कोण पहाणार ? असो.
तर सांगायचे हे की त्या वेळी नसतोस घरी तू जेव्हा... खरच संदीप खरेच्या गाण्या सारsssखंच वाटायचे.
पण आता गेले ते दिवस .आता दोघे रिटायर्ड जीवन... अगदी सुखाने व्यतीत करत आहोत . कुठे जाण्याची घाई नाही ..सतत मस्त एकत्र असतो.दिमतीला वर कामास . बाई पण असते.त्यामुळे तसेही कामाचे परिश्रम नाहीत .जोडीला तोंडी लावयला म्हणा ...वा विरंगुळा म्हणून नातवंडे... त्यामुळे सुखी जीवन जगत आहोत .मला सांगा....... अजून काय पाहिजे सुखी जीवनाला.त्यामुळे

" हे " यांचे वाचनालय.. .. बागेत वरिष्ठ नागरिकात जाऊन बसणे, गप्पा मारणे... तसेच सोसायटी चे कमिटी मेंबर्स ... नुसतेच मेम्बर नव्हे तर तारक मेहताच्या सिरीयल मधील आत्माराम भिडे सारखे एकमेव सेक्रेटरी .त्यामुळे ..सोसायटीच्या मंडळीत बसणे ..वगैरे निमित्याने बाहेर जातात .
पण खर सांगू ..... आता त्याचे हे थोडे फार .बाहेर जाणे फार आवडते. "नसता घरी तुम्ही जेव्हा" ची ,.. ती पूर्वी ची हळहळ आता वाटत नाही.
या असल्या विचाराने कधी कधी वाटते आपले प्रेम तर कमी झाले नाही ना. ! पण छे sss छे मुळीच नाही , प्रेम तितकेच आहे . हे बाहेर गेले असता ठराविक वेळेच्या पेक्षा जरा उशीर झाला तर लगेच काळजी वाटते. हात मोबाईलकडे धाव घेतात. का बरे उशीर झाला असेल. ?...पण आता ते पहीले आकर्षण उरले नाही .. कारण , आता हे नसले की , ..मी व मोबाईल यांचे छा sन नाते जुळते. फेस बूकच्या व whatsapp च्या विविध समुहावर हजरी लावता येते. सतत चालणा-या स्पर्धेत भाग घेता येतो. व मनास एक अनामिक आनंद मिळतो. या विविध समुहाने किती ज्ञानात भर करिता येते. व चालू जगाशी जवळीक साधता येते.
हे घरी असले तर करता येत नाही असे नव्हे ..पण प्रत्येकाला स्पेस हवीच ना. आपापले छंद आवडी... विरंगुळा जोपायाला. तर, सांगायचे की , ते त्यांचे व मी माझे ...छंद जोपासत असतो. त्यामुळे "नसतोस घरी तू जेव्हा " तीळ तीळ तुटतो सारखी स्थिती नसते .जरा आपापले विचार करण्यास मस्त वेळ मिळतो .उलट एखाद दिवशी जर घरात हे असले तर फेस बूक सुटतय असे वाटते. कारण सहाजिकच थोडे फार इतर कारणाने , बोलण्याने वा विषयातंर होते .व अनाहुत पणे लिखाणात व्यत्यय होतो. मग उगीच चीड चीड होते. कधी विचारांची लिंक तुटते तर कधी whatsapp चे साहित्य ..म्हणा वा मित्र मैत्रिणीच्या गप्पात उगाच खंड पडतो.
आणि मधेच जे सर्वत्र whatdapp वर फिरत असलेले msg " हे "ऐकवत बसतात. मला त्यात जराही रस नसतो . कारण ते सर्वच ग्रुप मधून फिरत असतात.पण मी मात्र लिहीलेले ,वाचलेले ,यांनी ऐकावे असे वाटते .मग पुन्हा वाद. असो.
पण धरून ठेवले तरी त्रास ,सोडले तरी त्रास .पण डोळ्या समोर असावा सतत नजरेत असावा असे सतत वाटते. छान काही केले बनविले की लगेच आठवण येते. बर.... , छान गोष्टीचा, लिखाणाचा ,मनापासून नक्की केलेल्या व पूर्ण झालेल्या कामाचा, आनंद शेअर करण्यास "हे "च तर हक्काचे माणुस असतात ना. तर नसतोच घरी तू जेव्हांची उणीव सदा जाणवणार च ना.!

वैशाली वर्तक( अहमदाबाद )