शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

जोखीम

              **जोखीम**
खर पहाता  हे कामच नव्हे माझे
तरिही *जोखीम* उचललीच  नेटाने
बघावा तरी एक करुनिया प्रयत्न  
कसे ..कितपत , जमते  आपणास

पण लिखाणास हवी लेखणी सुरेख 
सुंदर  अक्षरे कागदावरी  उमटवेल
विचारांती शोधली , काळ्या शाईची पेन
"श्रीगणेश" लिहूनी आरंभ केला लिखाणास 

पण , पुढे काय लिहावे ? तेच सुचेना
काय विषयावर लिहावे?  तेही कळेना
शब्दगंध ग्रुपच , अंती आला कामास 
निदान शब्द  तरी मिळाला लिखाणास 


यमक वृत्त साधण्याचा केला  प्रयास 
अंती चारोळीच लिहावी केला विचार 
तरिही वर्ण संख्या   न जुळे  ओळीतून
पहिले पान , अखेरीस टाकले चुरगुळून

ठरविले शेवटी , लिहावे मुक्त छंदात
नसे यमकांचा खास त्रास तयात
तरिही विचार  करुनी , लिहीलीच की!
अष्टाक्षरी , काव्यांजली अन्  तरिही.....
लिहावयाची राहिली च की हो ....सुधाकरी


वैशाली वर्तक

शाळा. शारदा मंदिर

कमल विश्व  राज्य स्तरस्पर्धा
स्पर्धे साठी
विषय-- शाळा

           शीर्षक--**शारदा मंदिर* 

 येता जाता दिसे मला
माझे शारदेचे मंदीर
जिने घडविले परिपूर्ण 
जीवनात मला खंबीर


नाही म्हणत मी तिला
 शाळा म्हणून कधीच
असे ते माझे सदासाठी
 दैवता समान मनीच

  दिधला ज्ञान वसा गुरुंनी
केले  आत्मनिर्भर खरे
कधी बोलून  तर समजावून
वाहविले सदा  प्रेमाचे झरे


स्मरणात आहे याच  मंदीरात
मिळविली थाप कौतुकाची
मोठ्या आनंदाने खुश होऊनी
अजून मान नमविते आदराची

वैशाली वर्तक





सावली प्रकाशन समूह
उपक्रमासाठी अष्टाक्षरी रचना
विषय -- माझी शाळा
शीर्षक - *शारदेचे मंदीर*

जाता  येता दिसे मला
माझे ज्ञानाचे मंदीर
घडविले परिपूर्ण 
मला  जीवनी खंबीर             1

नाही म्हणत मी तिला
 शाळा म्हणून कधीच
  आहे दैवत समान 
माझ्या  मनातील तीच             2

 ज्ञान दिधले गुरुंनी
   आत्म निर्भरता खरे
कधी प्रेमाने रागाने
 वाहिवले प्रेम झरे               3

   अजूनही स्मरे मनी
  थाप  सदा कौतुकाची
 आनंदाने खुश होता
 मान नमे आदराची               4


आज मी जो दिसे उभा
 शाळेचेच श्रेय सारे        
 घडविले जडविले       
झालो चमकते तारे                   5


वैशाली वर्तक 
अहमदाबाद





शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

11 )नारीलगत1 उंच भरारी आकाशी(अष्टाक्षरी)/2तू ही लढ/ 3 तू आहे म्हणून शान मुलगी घराची भ



काव्य स्पंदन  राज्य स्तरीय समूह 02
काव्य प्रकार -- अष्टाक्षरी
1  विषय -- उंच भरारी आकाशी
 
आहे तुझ्यात कर्तृत्व  
घेण्या नभात भरारी
दाव सामर्थ्य  जीवनी
राहो मनात उभारी

प्रगतीच्या  पथावर 
सदा ठेव तू पाऊल
पहा ती झळकतील 
देण्या यशाची चाहुल

सर्व  क्षेत्रात दिपावी
तुझ्या  उन्नतीची किर्ती
 मिळो तव प्रयत्नांना 
पूर्णपणे  स्वप्नपूर्ती

नवी स्वप्ने नवी दिशा 
कर विश्व पादाक्रांत
जगज्जेता तू होशील
हरण्याची नको भ्रांत

आहे मोकळे आकाश 
करुनिया ती हिंमत
घेता नभात भरारी
जगा कळेल किंमत

वैशाली वर्तक
***********************************************
उनाड वारा साहित्य  परिवार  आयोजित  भव्य राज्य स्तरीय 
काव्य लेखन स्पर्धा 
काव्य प्रकार  - षडाक्षरी
2 विषय --  तू ही  लढ

दाखव कर्तृत्व 
घेण्यास  भरारी
दाविण्या सामर्थ्य 
मनात उभारी                1

होईल प्रगती
उचल पाऊल
दिसेल खचित  
यशाची चाहुल           2

रंगव तू स्वप्ने   
विश्व पादाक्रांत
जिंकशील जग
नको मनी भ्रांत               3

मोकळे  आकाश 
दाखव हिंमत
घेताची भरारी
कळेल किंमत             4

सर्व क्षेत्री वाढो
उन्नतीची किर्ती
 तव प्रयत्नांची 
होवो  स्वप्नपूर्ती               5

आठव जिजाऊ
नाही तू अबला
लढ तू फक्तची
आहेस सबला                6

वैशाली वर्तक
******************************************
ती आहे म्हणून
************[][]

ती आहे म्हणून (सहाक्षरी)

 दोघेही मिळूनी
संसाराचा रथ
हाकती नेटाने
सदा अविरत 

तीच्या अस्तित्वात 
असे लक्ष्मी वास 
तिच्या मुळे घेतो
सुखाचे ते श्वास

ती करी संस्कार 
मुलांवर भारी
म्हणून म्हणती
जगाला उध्दारी

सण म्हणताच
तिच्या उत्साहानं 
भरे सारे घर
सदा आनंदानं 

करी नियोजन 
सर्वची कामाचे
देतसे घराला
रुप मंदीराचे

नसता घरात
वाटे रीतेपण
तीनेच दिधले 
घरा घरपण

सुखात दुःखात
सदा देई साथ
राहते जोडीला
घरुनिया हात

वैशाली वर्तक 
******************************************************
शब्दसेतू साहित्य  मंच आयोजित  उपक्रम 126
साहित्य   प्रकार चारोळी
4 विषय --तीचे अस्तित्व

तीचे अस्तित्व *अन्नपूर्णेचे*
कुटुंब जनांना वाटे हवे
करी रोजच व्यंजन
भोजनात ती नवे नवे


दोन कुळे उध्दारिते
वंशवेल सांगा कशी
तीचे अस्तिवच नसता
बहरेल का  हो  अशी.

पै पाहुण्यांचा करते आदर
किती रुपात वसे *गृहिणी*
चिंता करी सा-या घराची
कधी बहिण ,आई, वा वहिनी


आधुनिक गृहिणी तर
आहे शिक्षीत कर्तृत्ववान
संभाळुनी  ती घरपणाला
जगात मिळवे सन्मान .

 गृही नसता गृहिणी
घर भासे लगेच भकास
जाते घराची शोभा
 कुटुंबजन होती  उदास


वैशाली वर्तक 

*****************************


अ भा म सा प स्वप्नगंध समूह आयोजित सराव उपक्रम
षडाक्षरी काव्य
    4.    विषय --  सशस्त्र महिला
*****************************************

जात्याच महिला
असते गंभीर
 वेळ प्रसंगात
मनाने खंबीर       1


घरात भक्कम 
तिच्यावर भार
सशक्त महिला
घराचा आधार       2

येवोत संकटे
करिते ती पार
सहज उचले
कुटुंबाचा भार        3

आनंदे सोसते
किती तरी कष्ट
कधीच न लागो
 तिजला हो दृष्ट         4

आजी आई लेक
किती रुपे न्यारी
सा-याच असती
सशक्तच नारी         5

असे दोन चाके 
संसार रथाची  
सशक्त महिला
एक महत्त्वाची            6

वैशाली वर्तक




यारियाँ साहित्य  कला समूह
       5.    विषय -- जर ती नसती तर

संस्कृती ची परंपरा
लेक सोडूनी माहेर
सावरते दोन कुळ 
सासरला तो आहेर

दोन कुळे उध्दारिते
वंशवेल सांगा कशी
जर *ती* नसेल तर
बहरेल काहो अशी

जर *ती नसती तर* 
कोण दावी रुपे न्यारी
भार्या बहीण  वहिनी
माया ममतेची सारी

स्वतः करुनिया  कष्ट
कुटुंबाला सावरते
राहुनिया सदा व्यस्त
घरदार प्रकाशते

*ती जर नसती तर 
 करणार  कोण माया
 कोण दावेल जगास
कशी मिळे छत्र छाया


वैशाली वर्तक






भा सा व सां मंच भंडारा
      उपक्रम 
   6  विषय - महिमा तुझा

            नारी
      जिथे पूजनीय असे नारी
     वसते देव देवता तिथे सदा
     मिळे सतत सौख्य सुख तया
      थारा नसे तिथे दुःखास कदा

       विविध रुपात दिसते नारी
        आई,ताई,वहिनी ,भार्या, मावशी
        सदा वाहे ममता हृदयातूनी
        सर्वच रुपातील ती वाटे हवी हवीशी

          बहिणीची तर मायाच वेडी
          आई च्या सम ताई वाटे
           वहिनी  पण प्रेमळ सदा
          तिच्यासाठी मनीं आदर प्रेम दाटे

          आजी तर करुणेचा  सागर
          तिचे प्रेम सर्वात आगळे
          मायेची ऊब सदाच मिळे
          आजीचे प्रेम तर जगा वेगळे

           अशा विविध रुपातूनी
          नारी असते देवी समान
           तिच्या विणा अशक्य जीवन
          कधी न  करावा तिचा अवमान

  ....,,,,वैशाली वर्तक  
          अहमदाबाद



व्हिडीओ द्वारे स्वरचित कविता सादरी करण स्पर्धा
 7.     विषय - जन्म बाईचा


असती  दोघे समाएन
घड्याळ आणि बाई
अविरत गुंग कामात
नसे उसंत,...सदैव घाई

 दिसे  होता सकाळ
 तिजला स्वयंपाक घर
चहा दुध नास्ता जेवण
यादी कामाची तयार

करती प्रेमाने संगोपन  
आपल्या पाल्याला रिझवित
लक्ष असे  घड्याळ्यात
सारी कामे संभाळीत

घड्याळ काट्यांच्या तालावर
कामे करिते प्रत्येक नारी
वेळ पाहून कामाचा राडा
नारी खुशीत उचलते भारी


 धन्य तो जन्म बाईचा
सर्व क्षेत्रात  घेते भरारी
घर -दार मुले- कुटुंब
संभाळण्याची मनी उभारी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद








 8.       नव्या युगाची जननी



आदि काळापासूनची

काय वर्णावी महती

कधी नव्हती अबला

सर्व जग ची जाणती 


नाव चमकले जगी

जेथे टाकीते पाऊल  

 सर्व  क्षेत्रात  यशाची

  तुज लागते चाहुल


आहे  सशक्त महिला

अशा अनेक सबला

झाशी मर्दानी होतीच

नका संबोधु अबला


 पहा देवीच्या रुपात

 मन होते सदा दंग

 *नव्या युगाची जननी*

 आगळाच तुझा रंग

 

आहे तुझ्यात कर्तृत्व  

घेण्या नभात भरारी

 नव्या युगाची जननी

राहो मनात उभारी



प्रगतीच्या  पथावर 

सदा ठेव तू पाऊल

पहा ती झळकतील 

देण्या यशाची चाहुल


सर्व  क्षेत्रात दिपावी

तुझ्या  उन्नतीची किर्ती

 मिळो तव प्रयत्नांना 

पूर्णपणे  स्वप्नपूर्ती


नवी स्वप्ने नवी दिशा 

कर विश्व पादाक्रांत

जगज्जेता तू होशील

हरण्याची नको भ्रांत


आहे मोकळे आकाश 

करुनिया ती हिंमत

घेता नभात भरारी

जगा कळेल किंमत


वैशाली वर्तक

अहमदाबाद



सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्रमांक 546
ओळ काव्य
अष्टाक्षरी रचना
 9.    ओळ... शान घराची मुलगी
   शीर्षक..

कन्या असतेच अशी
शान असते घराची
करी विचार  सर्वांचा
वाटे  सदैव मानाची 

दोन कुळे उध्दारिते  
वंशवेल सांगा कशी
तीचे अस्तिव नसता
बहरेल का  हो  अशी
    
 मिळविते प्रेमळता     
 सिद्ध होते तालमीत   
भासे  कर्तृत्वाची मूर्ती. 
कन्या आईच्या कुशीत      

माहेराची शिकवण 
दोन कुळांना उध्दारी
दावी धडाडी संसारी
प्रेम भाव  घरी दारी

कन्या रत्न  जे आजचे
वसे विविध रुपात
भार्या वहिनी बहिण
शोभा आणते नात्यात 

भाग्यवान असे घर.  
जेथे वाजती पैंजण
कन्या असता सदनी
येते घरा घरपण
 
शान असता घराची
कन्यादान सोहळ्यात
परंपरा चालविता
पाणी येते नयनात 



वैशाली वर्तक
अहमदाबाद
............................................
स्पर्धेसाठी
स्वप्न गंध साहित्य समूह आयोजित 
जागतिक महिला दिनानिमित्त विशेष स्पर्धा
स्पर्धा क्रमांक 43
विषय.. स्त्री तेव्हाची -आताची
...................................................................
 10.    शीर्षक. *आधुनिक स्त्री*
..............................................

रांधा वाढा उष्टी काढा 
होते जीवन  कंठणे
स्व-मताला नसे मान
फक्त , घर  संभाळणे.  1

शिक्षणाची नसे मुभा.
सारी हुशारी घरात 
सावित्रीच्या धडाडीने
झाली शिक्षित जगात.  2

 उपलब्ध होता विद्या
झाली विदुषी जीवनी
प्रगल्भता  विवेकाने
घेते भरारी गगनी.         3
  
 जाण मनी कर्तव्याची
 सांभाळून घरदार
 झाली सामर्थ्याने जगी
आज  स्री कर्तबगार.       4

अर्थ शास्त्र पारंगत
उभी रहाते जोडीने
हक्क समानता प्राप्ती 
केली साध्य, तडजोडीने.   5


दूर केली अंधश्रद्धा
चालीरीती झुगारून
समाजाचे परिवर्तन 
मान स्त्रीत्वाचा राखून  6

आता घडला बदल
तिचे तेजस्वी अस्तित्व
हर क्षेत्री नाव मिळे 
 जाणा  स्त्रीशक्ती महत्त्व. 7

वैशाली वर्तक
अहमदाबाद





काव्ययोग काव्यसंस्था पुणे
महाराष्ट्र राज्य आयोजित
8 मार्च महिला दिनानिमित्त आयोजित
*स्पर्धेसाठी* 
विषय.    कलाकार एक स्त्री 
..............................................
शीर्षक..*सारे आकाश माझे**

कुटुंबाच्या इच्छापूर्तीसाठी
संसारात कष्ट झेलते
देऊनी स्वतःला झोकून
आकाश पण सहज पेलते

मायेचा  सागर हृदयी
ममतेची असे सदा छाया
कठीण प्रसंग  जराही  येता
तत्पर असे झिजवण्या काया

घरदार मुले कुटुंबियांना
सुखी करणे विचार  ध्यानी
 घडविणे संस्काराने शिल्प
हीच कल्पना  सदा मनीं

सीतारमण संरक्षण मंत्री
भुषविले स्त्रीनेच मंत्री पद
अशा असता एकएक  नारी
शोभत नाही अबला पालुपद

घेते उंच भरारी जीवनी
धारणा मनी *माझेच आकाश*
घालीन गवसणी नभात
दावीन नारी शक्तीचा प्रकाश

स्त्री शोभते नाना रूपात
मातृत्व पदी शिल्पकार
जगी घडविते पाल्याला 
असे *स्त्री एक कलाकार*


वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात)
8141427430




जाग रणचंडीके

 वेळआली नारीशक्ती जागृतीची
सज्ज  हो  तू प्रतिकाराला
नव्हती कधीच तू अबला
आठव तुझ्यातील  नारी शक्तीला

फोड वाचा  अन्यायाला 
अधमांना दे कर्माचे फळ
होऊनी रण चंडीका तूची
दाखव तयांना मनगटाचे बळ

आठव काळ, मर्दानी लक्ष्मीबाईंचा
शौर्य ,धैर्य  अन् पराक्रमाचा
घेऊनी  हाती , कर वार शस्त्राने
राक्षसी दानवी  त्या क्रूर कर्माचा

मात करण्या संकटावरी
स्व-रक्षणाचे घे तू धडे       
नराधमांचा अंत करण्या
तुझे बळ कधी कमी न पडे

जाण्या  सामोरे  नराधमांच्या
धैर्याचे  ठेव सदा हत्यार
नकोच ती , कधी म्यानात
आत्मविश्वासाची तळपती तलवार

आदी काळातील तुझीच रुपे
 आठव दुर्गा ,काली , अंबिके
करण्या  दृष्टांचा संहार 
जागी हो , तू रणचंडीके

वैशाली वर्तक



ओढ कर्तव्याची

काव्य स्पंदन राज्य स्तरीय समुह 02
दैनिक उपक्रम 
काव्य प्रकार  -- दशाक्षरी
विषय - कर्तव्याची ओढ

माता पिता करिती संस्कार 
बालपणी प्रेमे पाल्यावर
असे ओढ त्यांना कर्तव्याची
घडविण्या  आत्म बलावर             1

तीच ओढ हवी कर्तव्याची
  भविष्यात ठेवुनिया  मनी
व्हावे पाल्यांनी आधार काठी
द्यावी प्रेमळ छाया जीवनी               2

असते सैनिकांना जाणीव 
रहाताती कर्तव्यात दक्ष
देश प्रेम हृदयात सदा  
देश रक्षणात त्याचे लक्ष              3 

गुरुंना मान असे देवाचा
नाते गुरु शिष्याचे महान
ओढ मनी सदा कर्तव्याची
म्हणूनच जगी त्यांचा मान              4

सर्व  सफाई कामगारांनी
जराही न दावीली उणीव
संकट कोरोना देशावर
दाविली कर्तव्याची जाणीव             5

नागरिकांना  हवी ती ओढ 
स्वसुरक्षिते च्या  बंधनाची
 करण्या देश  कोरोना मुक्त
कर्तव्ये पाळू सरकारची                    6

वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात )

(विडंबन काव्य). वाच ग घुमा/ आनंदी आनंद गडे

मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

vach g ghu ma vachu mi kash?

                                            
                                                वाच ग घुमा, वाचू मी कशी ?वाच ग घुमा वाच 
                                               
                     वाच ग  घुमा, वाचू मी कशी? वाच ग घुमा वाच.
                              बालपणी वाचली शालेय पुस्तकं ,
                              यौवनात वाचली स्टारडस न मासिकं
                                संगोपनात वाचली मुलांची पुस्तकं  
                       वाचू मी कधी ?वाचू मी कशी?वाच  ग घुमा  वाच 
                              सायंकाळ जाते मालिका पहाण्यात,
                               रात्री न पाहिलेल्या, दुपारी पहाण्यात,
                                इमेल वाचण्यात वा  पत्ते लावण्यात 
                        वाचू मी कधी? वाचू मी कशी?  वाच ग घुमा वाच  
                                समाजाचे वाचनालय आहे आज बंद, 
                                ब्रिटीश लायब्ररीची मी नाही सदस्य ,
                     पुस्तकं आणू  मी कशी ? वाचू मी कशी ?वाच ग घुमा वाच
                                  नकोच वाटते ' ते ' पेपर वाचन ,
                                 भरलेले नुसते हिंसा न राजकारण,
                                 वारंवार दिसते हे तर "आजतक" वर  ,
                   पेपर कशाला वाचू? वेळ कशाला दवडवू ?वाच ग घुमा वाच
                               वाचले पु. ल., व. पु .आणि वि. स.
                              वाचली विनोबांची गीता प्रवचन
                             पण शेवटी सांगते ऐका,वाचा नित्य गीता,
                             त्यातच दडलीय जीवनाची सत्यता (सफलता )
                      वाच ग  घुमा, वाचू मी कशी ? वाच ग घुमा वाच





*स्पर्धेसाठी*
स्वप्नगंध स्पर्धा समूह
विडंबन काव्य लेखन स्पर्धा
स्पर्धा क्रमांक 44
२\४\२४
विषय .. खोटे पुरस्कार 
आदरणीय गीतकार बालकवी ठोंबरे यांची क्षमा मागून प्रयत्न करते
मूळ कविता.   इकडे तिकडे चोहीकडे
                   आनंदी आनंद गडे 

इकडे तिकडे चोहीकडे 
खोटे पुरस्कार मिळवितात गडे.|धृवपद||

कुठलेही असो मग ते , क्षेत्र
नसता अंगीच्या गुणास पात्र
नितीमत्तेची चाड कधी न नडे
इकडे तिकडे चोहीकडे
खोटे पुरस्कार मिळवितात गडे.   १


कोणी चोरीतो साहित्य  कृती,
स्व-नावे देण्याची मनी न भिती.
सत्तेचा फायदा घेतात गडे,
इकडे तिकडे चोहीकडे,
खोटे पुरस्कार मिळवितात गडे.   २


भुल पडे क्षणभर मनाला,
काल पर्यंत  तर अजाण जगाला
रात्रभरात कसा गुणवंत घडे
इकडे तिकडे चोहीकडे
खोटे पुरस्कार मिळवितात गडे.        ३

 
सहज येतोच ना?, विचार मनी,
ख-या गुणी कलावंताचा त्या क्षणी.
किती भरले तयाने श्रमाचे घडे. 
इकडे तिकडे चोहीकडे
खोटे पुरस्कार मिळवितात गडे.        ४

सत्तेचा  फायदा घ्यावा तरी किती?
लाज लज्जा उरलीच न, जगती
गुणवंत असूनही मागे पडे
इकडे तिकडे चोहीकडे
खोटे पुरस्कार मिळवितात गडे.        5

वैशाली वर्तक
अहमदाबाद२\४\२४

 
                                                                                
                                                            

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

चित्र काव्य लोभस बालिका

**लोभस बालिका**

किती लोभस रुप पहा
मुखावरी भाव सोज्वळ
पूजेसाठी करी तयारी     
कयास तुमचा   प्रांजळ

भाळी लावियली उदी
कानी झुंबरे सुंदर  डुले
गळ्यात मोहक हार कसा
बालिकेचे रुप खुले


शोभून दिसे परकर पोलके
पारंपारिक वस्त्र परिधान
पहा कशी अवखळ बाळी
 वाटे  पाहून आगळे समाधान

भरली परडी  सुगंधित फुलांनी
लाल  रंगीत फुले डोकवली
पूजेला उणीव जयांची भासे 
 ती   तुळस पाने  पण खुडली


वैशाली वर्तक

नाते सासू सुनेचे

यारिया साहित्य  कला समुह 
विषय - नाते हे सासू सुनेचे

सूनेचे व माझे आहे नाते 
आई लेकीचे असावे जसे
जन म्हणती असावी सासू 
जशी मी आहे  आदर्श  तसे

 पाहूनीआम्हा विहीणींना 
जाते बोट डोळ्याला
लावीती काजळ काढूनी
न लागण्या दृष्ट नात्याला
        स्नुषांनी ही सहज घेतली
        घरची जवाबदारी स्वखुशीने 
        मुक्त केले मला जीवनात
        जगण्या माझ्या  आवडीने
सुना झाल्या मुली घरच्या
कौतुक करण्यात मज देती सुख
 किती गोड संबध आमच्यात
कधीच न देते  ती कोणास दुख         
         अशी मी भाग्यवान   गृहिणी 
         वसंत फुलविला त्यांनी सदनी
         सदा सौख्य लाभो माझ्या  सुनेला
         ह्याच शुभेच्छा तिला या जीवनी
अशा कन्याच लाभता मला
लाभले स्वर्ग  सुख मजला      
सदा मी राहीन ऋणी तयांची
मम घर संसार त्यांनीच सजला.

वैशाली  वर्तक

९ घट स्थापना ब्रह्मचारीणी !चंद्र घंटा ! कुष्मांडा !स्कंदमाताकात्यायनी कालरात्री

नवरात्री महा स्पर्धा



मनस्पर्शी साहित्य परिवार
साप्ताहिक उपक्रम
दि....३/१०/२०२४
सदर.... अंतर्मन
पुष्प क्रमांक....०३
शीर्षक.... शैलपुत्री


पहिली दुर्गा शैलपुत्री
मुलगी हिमालयाची
करती सारे पूजाअर्चा
मनोभावे या रूपाची.....

पूर्वजन्मी दक्ष कन्यका
नाव होते तिचे सती
वरले तिने श्रीशंकरांना
मानून आपले पती....

पार्वती अन् हेमवती
आहेत तिचीच नावे
दिव्य साध्वी पतिव्रता
सकलांनाच  ठावे.....

उजव्या हाती त्रिशूळ
वामकरात  कमळ
करती जागर भक्तीचा
घालुनिया  गोंधळ....

करती सारे संत महंत
सुरवात योगसाधनाला
बसून मूलाधार चक्रात
ठेवते स्थिर मनाला.....


सौ. मेधा घोंगे. 👏✒️
नागपूर.




शब्दरजनी साहित्य समुह आयोजित 
स्पर्धेसाठी
घटस्थापना

संपताच पितृपक्ष
आले नवरात्र समीप
शुध्द अश्विन प्रतिपदेला
तेजाळूया नंदादीप

शरद ऋतूच्या आरंभी 
वदती तया शारदीय
 दिन पहिला उजवुया
आली देवी वंदनीय

केली तयारी गृहिणींनी
पेरुनीया धान्य सात
फूल माळ अखंड दिवा
 लावुनिया हातो हात


हर्षभरे  झाले स्वागत 
झाली घटस्थापना घरोघरी 
धूप  दीप पुष्पे सुगंधी
प्रसन्नता दिसे क्षणभरी


नव दिवसांची नवरात्री
करतील देवीचा जागर
सौख्य आनंदे भरेल 
येता भक्तीरसाचा सागर

वैशाली वर्तक

=========================================_
स्वप्नगंध साहित्य समूह
आयोजित उपक्रम क्रमांक२
देवी.. ब्रह्मचारिणी पंचाक्षरी 
दुसरी माळ

नवरात्रीत
दुसरे दिनी
रूप दुर्गेचे
ब्रह्मचारिणी. 

असे स्वरुपी
ब्रह्मचारिणी
ती ज्योतिर्मय
तपश्चारिणी 

त्याग, वैराग्य
संयम, तप
होई प्राप्तता
करीता जप

प्रसादासाठी
ठेवू साखर
मिळे दिर्घायु
ते कणखर

नित्य करिता
मंत्र पठण 
होतात दूर
कष्ट सकळ

रुप देवीचे
पाहून मना
मिळे चित्ताला
आनंद जना

वैशाली वर्तक
अहमदाबाद

===============================================
स्वप्नगंध साहित्य समूह
आयोजित नवरात्री विषेश उपक्रम क्रमांक 3
विषय... देवी चंद्र घंटा

तिस-या दिवशी
करुया वंदन
माता दुर्गा रुपे
मातेचे स्मरण

अर्ध चंद्र घंटा
भाळी शोभतसे
नाव चंद्रघंटा
तीज वदतसे

सूर्य तेज रुपी
शोभनीय कांती
होता कृपादृष्टी
न उरते भ्रांती

अस्त्र शस्त्र हाती
दशभुजा धारी
संकट निवारी
दुष्टांना संहारी

महिषासुराचा
करण्यास नाश
दिले अस्त्र शस्त्र
केलाची विनाश

जगाच्या कल्याणा
घेतले हे रुप
आयुधे धरुनी
भक्तीचे स्वरूप

करु उपासना
 मिळते धैर्यता
संकट टाळण्या
भय निर्भयता.

वैशाली वर्तक
अहमदाबाद


=============================================

स्वप्न गंध साहित्य समूह आयोजित
नवरात्र विशेष उपक्रम क्रमांक 4
देवी    कुष्मांडा

मान आहे कुष्मांडाला
 सृष्टी करण्या  निर्माण 
  केली ब्रह्मांड  उत्पती 
  ऊर्जा निर्मितीचा मान
  
कुष्मांडाचे ते स्वरूप.     
भरलेय कोहळ्यात
सृष्टी निर्मितीचे काम
बीज रुपे आकारात.
  
ओळखती अष्टभुजा
सर्व सिद्धि होती प्राप्त 
 ठेवू मंत्र स्मरणात
 व्याधीतून होऊ मुक्त
   
 वसे सूर्य मंडळात
 माता कुष्मांडाचा वास
शक्ती क्षमता अपार
कांती सूर्यसम खास

करू मातेचे स्मरण
भक्ती भावे उपासना 
मिळण्यास सुख शांती
दु:ख सारण्या प्रार्थना 

वैशाली वर्तक
अहमदाबाद
==============================================
स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित
नवरात्री विशेष उपक्रम क्रमांक 5
देवी.. स्कंदमाता
भक्ती गीत
रंग पिवळा
        करु जयजयकार 
नवरात्री पर्वात ,पंचम दिनी
स्मरुया स्कंदमातेला मनोमनी   |धृवपद|

चतुर्भुजा नावे पण, संबोधती
मांडीवर कार्तिकेय विराजती
जयजयकार करु क्षणोक्षणी
स्मरुया स्कंदमातेला मनोमनी...१

मनोवांच्छित पूर्ण करी कामना
संतान प्राप्ती होण्यास आराधना
मातेला करू भक्तीची विनवणी
स्मरुया स्कंदमातेला मनोमनी.  २

नैवेद्यास अर्पूनिया केळ फळ
मिळते शक्ती युक्ती बुद्धीला बळ
शरणी जाऊया  मातेच्या चरणी
स्मरुया स्कंदमातेला मनोमनी.  ३

चतुर्भुजा बैसुनिया सिंहावरी
असे निवास तिचा गिरीकंदरी 
माया ममतेची असे ती जननी
स्मरुया स्कंदमातेला मनोमनी    ४

वैशाली वर्तक
अहमदाबाद

=============================================

स्वप्नगंध साहित्य समूह
आयोजित नवरात्री विशेष उपक्रम
मुक्तछंद काव्यरचना
विषय.. कात्यायनी
माळ सहावी
रंग ..हिरवा

कत नावे महर्षी प्रसिद्ध
कात्य  त्यांचा होता पूत्र
झाला याच कात्य गोत्रात
जन्मला कात्यायन महान
केली कठोर तपस्या  भगवतीची
 पावली भगवती  जन्म  घेऊनी 
करण्या दैत्यांचा संहार जगती.
पृथ्वीवर वाढला महिषासुराचा त्रास
ब्रह्मा विष्णू महेशांनी दिली ऊर्जा
नाश करण्या दैत्यांचा
कात्यायन ने केली प्रथम पूजा
नाव भगवतीचे जाहले कात्यायनी
चतुर्भुजा असती तिजला
अभय मुद्रा , वर दायीनी मुद्रा
एकहाती कमळ पुष्प, दुजे  ते शस्त्र
तेज झळके मुखावर 
सूवर्णमय कांती तिची
साधक करीती उपासना
प्राप्त होण्या अर्थ, काम, धर्म, मोक्ष
आराधना करीता
 लोप पावे दु:ख दारिद्र्य
देवी कात्यायनी कृपेने

वैशाली वर्तक
अहमदाबाद
===================================================
स्वप्न गंध साहित्य समूह
आयोजित नवरात्री विषेश उपक्रम
काव्य प्रकार.  काव्य प्रणाली 
सातवी माळ
देवी. कालरात्री

नवरात्र पर्वातील रुप
रूप खूपच क्रोधित 
क्रोधाने श्वासात अग्नी 
अग्नीमूळे  मन भयभीत  १

नवरात्रीचा  सातवा दिन
दिनी करुया पूजन
पूजा  अर्चना  करूया
करु कालरात्रीला वंदन   २

चार भुजा धारी असे देवी 
देवीचा सदैव हात
हात वरदानासाठी 
वर देता अभयाची साथ.  ३

त्रीनेत्र  कालरात्री देवीला
देवीला  वाहू अक्षता   
अक्षता संगे सुमने . 
सु- मने मिळे मना शांतता 

वैशाली अविनाश वर्तक
=======================================================
स्वप्न गंध साहित्य समूह आयोजित नवरात्री विशेष उपक्रम क्रमांक ८
 आठोळी लेखन
देवी.. महागौरी

     
महागौरी   गौरवर्णी
आरुढली बैलावरी. 
 वृषारुधा संबोधती
शुध्द शांत भाव अंतरी

कन्या पुजेचा दिवस
महागौरी रुपे आज
चतुर्भूजा कुमारिका
जांभळा चैतन्य साज

वैशाली वर्तक
अहमदाबाद


========================================================

स्वप्न गंध बंद समूह
आयोजित नवरात्री विशेष 
उपक्रम क्रमांक ९
देवी    सिध्दिदात्री
नवमी माळ 
रंग मोरपंखी


सिद्धिदात्री असे नववे दुर्गामातेचे स्वरूप 
सर्व अष्ट सिध्दीचे तेज झळाळणारे रुप.  

 देवीच्याच कृपेने शकरांना  प्राप्त सिध्दी 
  शिवशंकरांना अर्धंनारीश्वरची प्रसिद्धी

कमळावर देवी जाहल्या विराजमान
चतुर्भुजा सिध्दिदात्रीत सरस्वतीचा मान

हाती शंख ,चक्र ,गदा, सुदर्शन, कमळ
शांतसोज्ज्वळ भाव भासती सदा निर्मळ 

नवरात्री नवव्या दिनी भक्त करी पूजन
 विद्या अष्टसिद्धी प्राप्तीसाठी मंत्र पठण.

याच दिनी कन्याचेही  करिती पूजन
मोरपंखी रंगातील देवीचे  स्मरण

वैशाली वर्तक
अहमदाबाद
काव्यपुष्प समूह 
अभंग 
नवरात्री शारदीय 
२४\१०\२३

येता नवरात्री | देवीचा जागर. | 
भक्तीचा सागर | घरोघरी. ||. १

सुमनाच्या माळा |  तेजाळती दीप |
 देवीच्या समीप   | नऊदिन.    ||२

देवी आगमना ।   करीती  तयारी । 
  मनास उभारी  । तूची देशी ।। ३

आनंदे उत्साहे |   गरबा खेळती   
देवीचीमहती    |.    वर्णताती.  ४


दैत्यांच्या संहारा | देवीचा आधार  |
   उचलला भार | जगताचा

देवी ठेव कृपा   ।  तुजला सांगणे  । 
नुरते मागणे     ।  तुजलागी  ।। ६

मज अभय दे  ।  मजला दे शक्ती । 
करीन मी भक्ती । नित्यनेमे  ।।  ७

सहवासे तुझ्या  ।  जागतो विश्वास । 
लागलाची  ध्यास  । अंतरंगी  ।। ८



तितिक्षा इंटरनॅशनल काव्य लेखन महोत्सव 
स्पर्धेसाठी स्वरचित अभंग लेखन 
विषय ..योगेश्वरी योगेश्वरी योगेश्वरी योगेश्वरी योगेश्वरी 

योगेश्वरी नावे | आदिमाया रुप|
तांदुळ स्वरुप |  कुमारिका||

वैजनाथ संगे |. विवाह ठरला |
मुहूर्त टळला | जोगाईचा.     ||

न जाता माहेरी |. बीड गावी वसे |
रूप चित्ती ठसे | सदा साठी||

   दंतसूर   दैत्ये |  त्रासलेल्या जना |. 
   मोद दिला मना. | जोगाईने ||

आहे शिक्तीपीठ. | अंबेजोगाई चे |
भक्ति करण्याचे |. सदासाठी||

अंबेजोगाईस | माता तुझा वास |
भक्तांचा विश्वास|  मातेवरी. ||


वैशाली वर्तक 
अहमदाबाद


आदिशक्ती 
तितिक्षा इंटरनॅशनल आयोजित काव्यलेखन महोत्सव 
दहा दिवसीय विशेष काव्य लेखन स्पर्धा 
विषय ...ललिता पंचमी
पंचाक्षरी
   *ललिता देवी*ललिता देवी 

देवीचे रूप 
असे  सुंदरी 
कृपा औदार्य 
सदा अंतरी.  १

शुद्ध चैतन्य
महादेवाची 
ती समर्पित 
सदाशिवाची    २

असती खूप
देवी योगिक 
पैकी ललिता 
दैवी प्रतिक.      ३


दैवी शक्तीची
रुपाची खाण
शक्ती पिठात
सदैव मान.          ४

कामुक देवी
ईच्छा पूर्तता
सदा करिते
देवी ललिता.     ५


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
८१४१४२७४३०
 ७\१०\२४


मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

उंच भरारी आकाशी

काव्य स्पंदन  राज्य स्तरीय समूह 02
काव्य प्रकार -- अष्टाक्षरी
विषय -- उंच भरारी  आकाशी

   
आहे तुझ्यात कतृत्व
घेण्या नभात भरारी
दाव सामर्थ्य  जीवनी
राहो मनात उभारी

प्रगतीच्या  पथावर 
सदा ठेव तू पाऊल
पहा ती झळकतील 
देण्या यशाची चाहुल

सर्व  क्षेत्रात दिपावी
तुझ्या  उन्नतीची किर्ती
 मिळो तव प्रयत्नांना 
पूर्णपणे  स्वप्नपूर्ती

नवी स्वप्ने नवी दिशा 
कर विश्व पादाक्रांत
जगज्जेता तू होशील
हरण्याची नको भ्रांत

आहे मोकळे आकाश 
करुनिया ती हिंमत
घेता नभात भरारी
जगा कळेल किंमत


वैशाली वर्तक

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

बळीराजा (गझल स्वरूप )बळीराजाची व्यथा                 

सौदामिनी
लगागा लगागा लगागा लगा

जरी तू रहातो  सदा  पंढरी
पहातो तुला मी सदा अंतरी

कधी ऐकतो मी तुझी बासरी
पहातो सदाची अदा हासरी

कशाला बसावे सदा मंदिरी
खरा देव पहावा शिवारी तरी

कितीही  झिजतो शिवारी तरी
जलाची अपेक्षा  सदा अंतरी          

जरी ही निघाली पिके  ती बरी
भुकेलाच राही सदा तो तरी

अशी ती कहाणी बळीची खरी
नशीबी सुखाची नसे भाकरी

वैशाली वर्तक

सौदामिनी
लगागा लगागा लगागा लगा

जरी  धाम देवा तुझे पंढरी
पहातो तुला मी सदा अंतरी 

कधी ऐकतो मी तुझी बासरी
पहातो सदाची अदा हासरी

कशाला बसावे सदा मंदिरी
खरा देव पहावा शिवारी तरी

कितीही  झिजतो शिवारी तरी
जलाची अपेक्षा  सदा अंतरी          

शिवारे बहरली  बळीची जरी
तरी पोर पत्नी  उपाशी घरी

अशी ती कहाणी बळीची खरी
नशीबी सुखाची नसे भाकरी



वैशाली वर्तक
अहमदाबाद 
8141427430

शेतकरी दादा
24/5/21
शेतकरी दादा

येता कृष्ण मेघ नभी
बळीराजा  येतो मनी
झटकूनी  आळसाला
शेतकरी  उभा झणी

काळ्या मातीला कसूनी
करी शिवार तयार
वाट पहाती लोचने
मृग पावसाची फार

मृग धारा बरसता
तृप्त  होते काळी माय
कृपा होता वरुणाची
शेतकरी मागे काय

शोभिवंत भासे शेत
मोती जणू कणसात
देवाजीच्या प्रसादाने
सुख येते शिवारात

पीक येता भरघोस 
मोल मिळते कष्टाचे
दिसे दारी धान्य रास 
दिन येती आनंदाचे

जीवनात कष्ट फार
देश हा कृषीप्रधान
काम बळीचे   महान
  पोशिंद्याचा जगी मान

वैशाली वर्तक









बळीराजाची व्यथा
                  पडले मृगाचे पाणी 
अंकुरले बीज फोफावूनी
 मनीं आनंदिला राजा-बळी
 रंगविली स्वन्पे मनातूनी 

   वा-यावर डौलती चहूकडे  
 शिवारे हिरवी आखीव  
पाहता वाढली जोमाने 
 सुंदर दिसती रेखीव 

 पण वरुणराजा कोपला
 पाणी नाहीच बरसल 
सारे पीक कोमेजल 
हाती काहीच न गवसल

  सुकले ओढे, सा-या नद्या
  गुरांना पण न मिळे चारा 
 काळी भूभी भेगाळली
 जीवाला कसा मिळेल थारा

 बियाणाचे चढे कर्ज माथी 
बळीराजा कसा होईल!सुखी
 कणभर दाणा नसे
 घरी तयाचे जीवन झाले दुखी 


 रब्बीची कराया पेरणी 
पाणी आता येई डोळा 
कसे होणार आता चिंतेने
 दुष्काळ दिसे सर्वत्र काळा

 असे ह्या वरुण राजाने 
न देता दिन सुकाळाचे
 करूनीया कोप मातीवर 
दाविले दिन दुष्काळाचे .


. कधी येशी अवचित 
 कष्टी होई बळी मनी 
जाते वाहूनी हातचे 
दुःखी होई क्षणोक्षणी .....


 वैशाली वर्तक 



स्वराज्य लेखणी मंच
आयोजित उपक्रम
विषय.. उन्हाचे चांदणे व्हावे

        **कष्टाचे मोल*

काळ्या मातीला कसून
घाम गाळीतो शिवारी
परिश्रम घेतो सदा
पहाण्यास राशी दारी

वाट पाहतो जलाची
बरसण्या मृग धारा
करण्यास पेरणीला
सोसतो गर्म वारा

येता वेळेवर वर्षां 
पहा  माती अंकुरली
पाहुनीया  बीजांकुरे
बळी मने संतोषली

जसा पडता पाऊस
रोपे वाढली जोमाने
झाले उन्हाचे चांदणे
मन डोले आनंदाने

येता दिन ते सुगीचे
भासे उन्हाचे चांदणे
कष्ट आलेत फळाला
हेची देवास सांगणे

वैशाली वर्तक
अहमदाबाद


अ भा म सा प पुणेपश्चिम महाराष्ट्र
चित्र वरुन काव्य लेखन 

      बळीराजा 
दिन रात करी कष्ट
असो पाऊस वा ऊन
महेनत करी सदैव 
काळ्या मातीला कसून

येता अंबरात मेघ
करी शिवार तयार
घाम गाळून मातीत
केली कष्ट अती फार

आहे पोशिंदा जगाचा
हवी कृपा वरुणाची 
त्याच्या कष्टे मिळे भाकर
जाण ठेवूया कष्टाची

नका करू अन्नाचा व्यय
हवे तेवढे  घ्यावे पानी
गरजूंना द्यावे अन्न
 कष्ट ठेवू बळीचे ध्यानी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...