लालित्य नक्षत्र वेल
आयोजित
उपक्रम
विषय.. एक प्रवास जीवनाकडे
खरच जीवन हा एक प्रवासच आहे. जन्म ते अंत काळ हा त्यांचा अवधी.. दिधला जन्म मानवाचा तयात मेंदू बहाल केलाय देवाने ,सारासार विचार करण्यास. दिल्या आयुष्याचे सार्थक करावे.. नाहीतर, जीवन काय पशु प्राणी पण जगतात.
पण हा जीवन प्रवास सार्थकी करता व आनंदे उपभोगता आला पाहिजे असे विचार
सहजची निवांतात बसली असता मनी आले. व मन व्यतित जीवन प्रवासाच्या काळात डोकावले.
खरच एक एक पाने उलगडता कळले प्रत्येक पान होते सुंदर. विचार करता वाटे किती ते मनोहर.बालपणीची ती निरासगता आठवून मन आनंदित जाहले.नव्हते त्या जीवन प्रवासात हेवेदावे वा नव्हत्या चिंता वा काळजी कुठल्याही क्षणाला.
यौवनात आले .होते ते पान तर गुलाबी तारुण्याचे.किती मोहक मनोहर रोजची नवी स्वप्ने . नवा दिवस ..नवी आशा आकांक्षा ..नव नव्या दिशा ..स्वप्न साकारण्यासाठी अंगी कर्तृत्वाची मनी अपेक्षा.
पुढे जीवन प्रवासात लाभलेला जीवन साथी. त्या बरोबर चे स्वप्नात रंगविलेले.....
स्वप्नात रंगले मी
चित्रा त दंगले मी
सत्यातल्या जगी या
झोपेत जागले मी
अशी भावगीतातल्या नायिके समान झालेला माझा जीवन प्रवास नजरेत आला.
कधी बागेत उगाच चाळा हाताला ..गवत खुडत ची ती स़ध्याकाळ तर कधी समुद्र किनारी वाळूत गप्पांच्या नादात रंगविलेली गुलाबी सांजवेळचा आनंददायी
यौवन प्रवास चलचित्रा प्रमाणे अनुभवला.
मग कर्तृत्वाचे कर्तव्याचे दिन आठवले व मनोमनी हर्षित झाले. जगी कसा मान मिळविला. आई बाबांचे संस्काराचे गाठोडे कसे कामास आले ,याची वेळोवेळी जाण झाली .या सा-या प्रवासातील अनुभवाचे गाठोडे घेत जीवन प्रवास करत होते
अनुभवाचे गाठोडे पुन्हा त्या चुका न करण्यास उपयोगी ठरलेले प्रवासातील दिवस.
असा जीवन प्रवास करत असता काय मिळविले तर समाधानी वृती. आता त्याच समाधानाचे जीवन प्रवासाचे पिवळे.. पण आनंद देणारे पान. या पर्यंत जीवन प्रवासात पोहचले. विधात्याने दिधले सारे काही. जीवन प्रवास आनंदी मनाने पार केला.
आणि पहाते तर खरंच सांजवेळ झाली होती. लगबगीने देवघराकडे वळले.
समईतील ज्योती कडे पहात सुखद जीवन प्रवासासाठी. देवास वंदन केले
देवास वंदन केले.