शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

धुक्यात हरवली वाट

 शब्दांकुर साहित्य  समूहउपक्रमासाठी

*धुक्यात हरवली वाट*

     

    *धुक्याची वाट*

आले रवीराज नभी

दूर करीत  धुक्याची

सोनसळी शलाकांनी

शाल तलम  नभीची



जरी आभा पसरल्या

धुक्यात हरवली वाट

दूरवर दिसत नसे

सकाळचा रम्य थाट


चालत होते दूरवर

वाहे मंद शीतल वात

पक्षी गण पण विसरले

झालेली रम्य पहाट


अशा मंद धुंद  समयी

दवबिंदु  पानोपानी

 गुज सांगती पर्णांना

हळुवार  मनोमनी


मधेच हलकी सर 

 हळुवार  पावसाची

हरवलेली वाट दिसे

दूर  करिता  धुक्याची


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

बालकविता .... होडी

माझी  लेखणी = 2
माझी  लेखणी साहित्य  समूह 
आयोजित  उपक्रम 
काव्य लेखन
बालकविता
विषय - होडी

   *माझी जलपरी*

पावसात भिजण्याची
 पूरी करु आज हौस
सरीवर सरी येती
आला रे मोठा पाऊस


फाडा वहीची ती पाने
करु कागदाच्या  होड्या
सोडू पाण्यात  तयांना
मस्ती करु ,थोड्या खोड्या


पुढे गेली पहा कशी वेगात.     गेली पहा कशी वेगात 
नाही तिला अडवू शके वारा.    नाही जुमानत वारा
माझी  होडी चाले डौलात.      चाले होडी माझी डौलाने 
पडता  कितीही वर्षा धारा.      पडो कितीही वर्षा धारा

होडी माझी  पोहचली
सर्व  होड्यांच्या  अगोदर
बनवली होती तिला मीच
घेऊन कागद तो सुंदर 

नाव  मी  दिले तिला 
माझ्या  आवडीचे *जलपरी*
आहे ना खरोखर पहा
नावा प्रमाणे   जल सुंदरी

कसे केले मनोरंजन
छोट्याश्या   मम होडीने
या एकदा तुम्ही  पण
सफर करवीन सवडीने

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...