शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

लेख. नेहमी खरे बोलावे ?








नेहमी खरे बोलावे?
विषयातून समजते की, विषय ,आपल्या वर सोडलाय. वा विचारलाय....की काय ते ठरवा नेहमी खरेच बोलावे का ?
किंवा नेहमी खरे बोलाणे जरुरी आहे का? असाही अर्थ अभिप्रेत होतो.
     तर बालपणीच्या केलेल्या,  घडविलेल्या संस्कारानुसार नेहमी खरे बोलावे हे योग्यच आहे.खोटे बोलणे वाईट असते.... ते पाप आहे हे संस्कार.जे मनावर बिंबवले गेले आहेत, त्यानुसार खरेच बोलावे.
मनाचे श्लोक पण तीच शिकवण देतात.जे बालपणी आपण शिकलो.
पण प्रत्यक्ष जीवनात कधी कधी असा प्रसंग येतो की उगाच  आपल्या खरे बोलण्याने वाद विवाद  होतील वा आपल्या खरे बोलण्याने समोरच्या माणसाच्या जीवास त्रास होईल ...त्रागा करेल. भांडणं तंटा होईल  अशा वेळी माहित असूनही नरो वा कुंजर वा
करणे योग्य ठरते.ज्याचे उदाहरण आपण महाभारतात अश्वत्थामा नावाचा
हत्ती मारला जाता  अश्वत्थामा हता हत: अशा आरोळीचा  कसा उपयोग झाला हे आपण जाणतोच.
     तर जीवनात पण कधी कधी असेच घडत असते. खरं बोलण्याने क्लेश
होत असेल तर खरं सांगत बसू नये
 म्हणजे खरं बोलणे टाळावे वा खोटे बोलावे असे नक्कीच होतं नाही,
      खरं बोलण्याने जीवनात फायदाच होतो. कारण खरं नेहमीच टिकून राहते
सत्याचाच नेहमी विजय होतो. खोटे बोलणे काही काळ जरी आनंद देतं.. तरी 
सत्य मात्र चिरकाल निरंतर आनंद दायीच असते. खरं बोलण्याने मनास समाधान मिळते की मी तर बाबा सत्य स्थिती सांगितली . व ते ऐकणारा खूष झाला आनंद पावला.
      खरं बोलणा-याचा जगी उदोउदो होतो . मान सन्मान प्राप्त करतो.तयास सत्यवचनी किताब मिळतो
तर खोटं बोलणा -या स खोटारडा म्हणून निंदला जातो कधी कोणी त्याच्या वर विश्वास ठेवत नाही 
जाऊदे यांचा काही भरवसा नाही हा खोटारडा आहे असे म्हणून अवहेलना होते. 
      पण जे बोलणे हानीकारक नाही वा समोरच्यास आनंद देणारं असेल ...असे खरं नसलेले बोलणे
खपते चालते.  जर आजारी माणसाला वा तबियत सुधारत आहे असे म्हणण्याने जर सकारात्मक भावनाने त्याच्य प्रकृतीत सुधारणा होत असेल तर ते बोलणे.  जरी खोटे असेल ते चालते.
       पण धंद्यात  खरे  कमीच चालते.. ज्या भावाने खरेदी त्याच भावात विक्री चालत नाही
वा तेथे खरं टिकत नाही  चालत नाही  नाही तर धंद्यात खोटंच नुकसान च येणार धंदा
करु शकणार नाही. तेव्हा आपणच ठरवायचे की खर नेहमी च बोलावं? कोठे कितपत नेहमी खरे बोलावे.

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

सुख दुःख




KAमराठी प्रेरणा प्रतिष्ठान
उपक्रम क्रमांक 60
विषय....सुख दुःख
अष्टाक्षरी
    शीर्षक. लपंडाव जीवनी

लपंडाव जणु चाले 
सुख दुःखाचा जीवनी
कधी सुख, तर दुःख
नका करू खंत मनी

जसे श्रावण मासात
ऊन पावसाचा खेळ
तसा चाले आयुष्यात 
 त्याचा बसवावा  मेळ

निशे नंतर प्रभात
नसे सदैव तिमीर
पहा कशा नव्या आशा
ऊषा दावण्या अधीर

 दुःख न चुकले कोणा
पुष्प हसते काट्यात  
उमलून विराजते
 गणेशाच्या चरणात

तप्त तापून धरती
बरसता जलधारा
 मग शोभिवंत होते 
  नव वधु सम धरा.

असा असे  नित्यक्रम 
  हेची सांगे  संत जन
 राम कृष्णे साहियले
जाणा हेची मनोमन

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...