महाराष्ट्र साहित्य सुगंध
विषय - वैशाख वणवा
सुरु होताची वैशाख
भासे ग्रीष्माचा वणवा
आग ओकितो आदित्य
लुप्त होतासे गारवा
सारी सृष्टी ची हरिता
जाळी ऊन वैशाखाचे
सृष्टी दिसते उजाड
दिन आले ऊन्हाळ्याचे
गाई गुरे निवा-यास
शोधी वृक्षाची सावली
रस्ते सारे सुमसान
कुठे माणसे हरवली
अती उष्णतेने पहा
जीव होतसे घाबरा
सूर्य अस्ताला गेल्याने
थंड होई जरा धरा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
संपे पानगळ वृक्षांची
वृक्षांची पाने पाही वाट
चैत्र पल्लवी अंगोपंगी
अंगोपंगी दिसेल थाट
संपली पानगळ आता
आता निसर्ग बहरेल
लेवूनिया कोवळी पर्णे
पर्णे सृष्टीला खुलवेल
थंड वा-याची ती झुळूक
झुळूक शहारेल अंग
फुले फुलतील मोहक
मोहक रंगी होऊ दंग
मोहरेल बहावा पळस
पळस दिसे वनोवनी
वसंताचे नव चैतन्य
चैतन्य पहा मनोमनी
चैत्र महिना चैतन्याचा
चैतन्याचा नव वर्षाचा
मनी उभारी देत असे
असे चैत्र मास हर्षाचा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
येथे एप्रिल १०,