शनिवार, ११ एप्रिल, २०२६

पाऊलखुणा

असतात उपयोगी जीवनी
पाऊलखुणा प्रत्येकास फार
तिच्या मुळे  लागतो ठाव
भुतकाळाचा  वारंवार 

 चालताना वाटसरू 
टाकत असतो पाऊल
मागच्या  वाटसरूला मिळे.
सहज दिशेची चाहुल.

उगा का म्हणती जन सदा
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
पाऊल खुणांना  अनुसरता
न उरतो  चुकण्याचा बहाणा

पाऊलखुणा रचती ईतिहास   
राखता संग्रही अनुभव
भविष्यकाळ होतो सुकर
आठवणीत घेत स्वानुभव 

पाऊलखुणा असती ठसे
 वर्तमानाचे मार्ग दर्शक 
सहज येती कामास 
 पथिकास दिशा सूचक

मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

अष्टाक्षरी. वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह 
उपक्रम 1391

दि 3/2/26
विषय. वही 

आनंदिले मनोमनी
वही पाहून  सुंदर 
गुज मनीचे सांगण्या 
मन धावे क्षणभर 

किती सुबक बांधणी
वही खुणावी मनाला 
घेऊनिया लेखणीला
मन सुरु  लिखाणाला.

 रेखांकित ओळीवर
 झरताची शब्द फुले 
पाने वहीची फुलली
आनंदाने मन डुले.

निळ्या शाईची अक्षरे
जणु मोतीयाच्या माळा
 करी  शोभित पानांना
मोद होतसे मनाला

झरझर उलटली
लेखणीने खूप पाने
 मन माझे  शांत झाले
 पूर्ण लिहीता गाणे,

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, ५ एप्रिल, २०२६

अक्षर रेषा करिती सुजाण

आला हाती कोरा कागद 
होतीच बाजूला  सखी लेखणी..
आले मनी विचार सहज 
उमटवली  अक्षरे  देखणी 

असतेच मैत्री दोघांत सदैव 
हृदयीचे भाव  कागद 
दावितो. खुलवून सदा
स्वतः च्या पटलावर अलगद

सखी लेखणी रेषांमधून
फुलवी अक्षरांचे मोती 
गुंफत जाते सुंदर माळ
वाचक वाचून सजाण होती

रेषांमधील मनीच्या भावना 
उमजता वाचकास
अक्षर शब्द वाक्ये बनून 
वाढे ज्ञानाचा हव्यास

को-या पाटीवरचे नशिबाचेअक्षर

*स्पर्धेसाठी* विशेषकाव्य लेखन स्पर्धा  दि 21/4/22 विषय - को-या पाटीवर नशिबाचे अक्षर *शिकस्त केली प्रयत्नाची* आस होती सुयशाची शिकस्त केली प्र...