शनिवार, ३० जानेवारी, २०२१

अष्टाक्षरी...मावळत्या दिनकरा

काव्य स्पंदन 02 राज्यस्तरा 
उपक्रम अष्टाक्षरी
विषय -- मावळत्या दिनकरा

दिनभर  प्रकाशूनी
सूर्य  निघाला अस्ताला
क्षणभर घे विश्रांती 
सृष्टी  सांगे आदित्याला

जाता जाता दिनकरे
रंगविले नभांगण
जशी सकाळी   प्राचीला
केशराची उधळण

दाही दिशा  हळदीच्या
संधी प्रकाशे धुंदल्या
मंद थंड पवनाने
तप्त झळा निवळल्या

गाई चालल्या गोठ्यात
नभी मोहक ती नक्षी
दिनकर मावळता
परताती सारे पक्षी

अर्ध्यदान देती जन 
दोन्ही करांना जोडून 
 सांजवात वृंदावनी
माय नित्याने लावून

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

अभंग अधीर

अधीर  झाले मी ! तव दर्शनास  
मनी एक ध्यास ! सदासाठी             1

मुखी नाम घेते ! करिते रटण
दाखव चरण! तूची आता                 2

कसे आले दिन ! गाठ भेट नाही 
मन वाट पाही  ! भेटण्याची              3

आप्त जना साठी ! जीव हा तुटतो
धीर हा सुटतो  !सदाकाळ                 4

 काय वेळ आली! कशी महामारी !
 कोण आम्हा तारी !तुजवीण              5

 कसा राखू धीर  !  मन  हे अधीर
 जरी मी सुधीर !   ठेवूकैसे               6

करीती प्रयास ! जरी सारे जन
निराशले मन! सकळांचे  !                    7


मन हे अधीर !ये ना उध्दाराया  !
तूच रामराया ! जगताला      !!            8    



वैशाली वर्तक

साथ देवाची

शब्दरजनी साहित्य  समूह 
विषय --- साथ


साथ तुझी असेल तर
नसे जगी काही अशक्य
फक्त तू हवा पाठीशी
 मला होईल सारे शक्य

येवोत कितीही संकटे
होणार नाही मी भयभीत
यश मिळणार मला खचित
विश्वासाने राहीन उल्हासित

तुझ्यावरचा दृढ विश्वास
देतो मनी सदा प्रेरणा
अपयशाला नसे थारा
तूची देतो मनाला चेतना

येवो किती महामारी
सर्व होऊनी आत्म निर्भय
तूझी साथ तर असणारच
नाही आम्हाला कशाचे भय

साथ तुझी असेल तर
 भय चिंता नुरते उरी
कठीण न वाटे मनी
कितीही आपत्ती आली तरी

म्हणती जन तुझ्या कृपेने
पंगु पण सहज चढे गिरी
साथ तुझी असेल तर
जीवन नौका नेशील पैल तीरी

काय सांगू देवा तुजला
तूची आमुचा कर्ता करविता
साथ तुझी सदैव राहो
शरण तुजला भगवंता

वैशाली वर्तक

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

स्फुट लेखन ,.,,,,, रुसवा फुगवा

रुसवा फुगवा
  रुसवा फुगवा ही सर्व  सामान्य  मानसिक स्वभावाची वृत्ती .लकब .! 
  ती मानवातच आढळते असे नव्हे..तर पशु पक्षात पण,... दिसते. ....!  
आणि अगदी देव देवता पासून ती दृष्टीत ., पहाण्यात आलेली आहे. 
बालपणी हटृ पुरे  करुन घेताना दिसते. रुसून   फुगून बसता हवी ती गोष्ट प्राप्त  करण्याचा जालीम उपाय असतो. तसे तर रुसणे -फूगणे तरुण पणात तर पदोपदी चालते. व त्या रुसण्याच्या मोहक लाडिक अदेवर  खुश होऊन रुसव्याचा फुगवा होण्याची वेळ पण कितीदा येत नाही. तर रूसवा फुगवा यात गोडवा असे पर्यत मजा असते. नाहीतर पुढे  वाद विवाद होतो. .



वैशाली वर्तक

सहाक्षरी..गणतंत्र दिन

काव्य स्पंदन 02 राज्य स्तर  स्पर्धे साठी
विषय - गणतंत्र दिन

गणतंत्र दिन
भारत देशाचा
साजरा  करीती 
 जन  आनंदाचा

असती विविध
जाती भाषा धर्म 
परि  समानता 
हेच खरे मर्म

लोकांचे लोकांनी 
हा संविधनाचा
लोकांसाठी असे
 भारत देशाचा

हक्क कर्तव्याची
ठेवती जाणिव
सारे नागरिक
ठेवू न  उणिव

देश असे प्रिय
ऐका तिच्या कथा
 किती गाऊ तिच्या
गौरवाच्या गाथा

केला आनंदाने
दिन तो साजरा
राष्ट्रीय सणाचा
 जल्लोष  हसरा

वैशाली वर्तक

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...