शनिवार, २४ जुलै, २०२१

रूपे दिव्याची

मी मराठी  काव्य मंच
उपक्रम क्रमांक  21
विषय --- दिवा   दिपक ..दीप
    *रुपे दिव्याची*

पहा झाली सांजवेळ
 देवापाशी  स्थान दिपकाचे
 पडता उजेड,  होई दूर तिमीर
दिपक प्रतिक  असे प्रकाशाचे

दीपाची रूपे अनेक
आधी होती पणती
मंद  देई  प्रकाश 
अंधारात मिण मिणती

 आधी वापरे शेतकरी
   देण्या प्रकाश  अंधारात
 असे प्रिय तया दिवटी
  मागे पडली  ती कालांतरात

प्रकाशते  देवा जवळ
मांगल्याचे समई प्रतिक
मागे पडले कंदिल
होत गेली प्रगती जागतिक

आताआली बिजली
 उजळे  जग क्षणात
दिव्या शिवाय सारे कसे
विचार  सहन होत नाही मनात

दिवा  वा दिपक  दीप 
साधने  प्रकाश  देणारी
रुप   असो  कुठलेही
काम त्यांचे  तिमीर दूर करणारी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, २१ जुलै, २०२१

माझे माहेर पंढरपूर

स्पर्धेसाठी
माझी  लेखणी ( आम्ही वारकरी)काव्य मंच
ता शहापूर  जि ठाणे महाराष्ट्र 
आयोजित 
विषय - माझे माहेर पंढरपूर 


विठुराया माझी  माऊली
विठोबा वसे ज्या नगरी
संताना  सदैव वाटे
माहेरच असे पंढरी

करी दुःख  निवारण
दृढ विश्वास तयावरी
विठुला मानती माऊली
भक्तांचा संभाळ ती करी

एकच नाम सदा ओठी
तेच आमुचे मायबाप
असती माऊलीचे रुप
दूर सारण्या भवताप


सर्व  लेकरांची माऊली
देई  ममतेची छाया
सारे भक्त भाऊ भगिनी
विठुची सर्वांवर प्रेमळ माया

असेची मानीता  भक्तांना
वाटे  पंढरपूर   हेची माहेर
भक्तांचे रहाण्याचे स्थान
जिथे मिळे सुखाचा आहेर

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १९ जुलै, २०२१

भक्तीचा मळा

अ भा म सा प समूह  02
आयोजित 
उपक्रम 62
विषय -- भक्तीचा मळा
    
येता महिना आषाढ
सय येतेच वारीची
येते विठु नाम ओठी
दिसे मुर्ती माऊलीची         1

वारकरी होती गोळा
भासे  भक्तीचा तो मळा
चाले विठुचा गजर
हरी नामाचा  सोहळा        2

भजनात सारे लीन
भक्त गण होती दंग
एक मेकात पाही विठु
गाती तुक्याचे अभंग         3

चिपळ्यांच्या नाद कानी
दुम दुमली पंढरी
टाळ  बोलती  विठ्ठल
भक्ती रसाची नगरी          4


इंद्रायणी काठी पहा
   तुक्या ज्ञानाचा गजर
वैष्णवांचा जमे मळा     
सारे भक्तची हजर            5

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...