शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

आठवण येता तुझी. \फक्त आभास आभास हा

अभा मसा परिषद शब्दभाव साहित्य 
आयोजित 
उपक्रमसाठी
आष्टाक्षरी काव्य लेखन
विषय - आठवण येता तुझी
  तुझ्या  आठवणीत

आठवण तुझी येता
दुःख  दाटते अंतरी
काही सुचेना मजला
काय करु सांग तरी

जाणे तुझे गरजेचे
घेण्या जीवनी भरारी
समजून सांगी मना
देत   मनास उभारी

आठवण येता तुझी
सारे जाते विसरून
वाट पहाते क्षणाची
 वाटे यावे परतून 

वाटे आलाची समीप
पण असेची तो भास
आठवण येता तुझी 
लागे  भेटण्याची आस

जीव होई वेडा पिसा
  मनी तुझाची  तो ध्यास
आठवांच्या कल्पनेत
  उरी अडकतो श्वास.

आठवण येता तुझी
नेत्र  पहा पाणावले
अश्रू सदा लपवित
जीणे प्राप्तची  जाहले

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


आभास हा 

मन धावे तुज पाशी
जरी तू गेलास दूर
नसता तू जरी जवळी
भासाने  भरे  मनी ऊर


जसे राधेला दिसे शाम
क्षणभर  चैन  नसे मनाला
जळी स्थळी दिसे तिजला
भासे जवळी तूची   आला 

 किती समजावू मनाला
 आहे  हा आभास सारा
 तरी   पाहे वळूनी वळूनी
  दिन रात खेळ चाले न्यारा

नको वाटे जीणे आभासाचे
येऊन दाखव तव मुख
तुज भेटीस मन आतुरले
मिळू दे मनाला सुख

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

स्वपरिचय काव्यातून


भारतीय  साहित्य  व सांस्कृतिक  मंच
आयोजित  उपक्रमासाठी
काव्य लेखन  स्व परिचय

     परिचय काव्य

नाव माझे वैशाली  वर्तक 
  जन्म भुमी कर्मभुमीचा मान
अहमदाबाद च्या गुजरातला तरी,
मराठी  भाषेचा मजला अभिमान

राहीले गुजरात मधे तरी
  मराठी माध्यम होते शिक्षणाचे
घरा बाहेर भाषा  गुजराथी 
तरी संस्कार जपले  माय भाषेचे

खेळाडू वृत्ती  आहे स्वभावी
 तरण पटू  शाळा काॕलेज पासून 
आंतरराष्ट्रीय व नॕशनल ची सहभागी
वरिष्ठ नागरिकमधे प्राविण्य अजून

अखिल भारतीय मराठी  सम्मेलनात
कवि कट्टयावर केले काव्यसादरीकरण
अंतर्मन काव्य संग्रह आहेची माझा
ब-याच मासिकात झाले साहित्याचे  प्रकाशन

छंद लेखनाचा बँकेच्या निवृत्तीकाळात
परीक्षणाचे काम पण केले आहे बरेचदा
बरीच प्रमाणपत्र प्राप्ती , साहित्य  समूहात
 सेवा भाषेची घडावी,  मनीच्छा सर्वदा.




लेखनाचा छंद जडला निवृत्तीकाळात
प्रशस्तिपत्रे मिळविली  अनेक स्पर्धेतून
 केलेय समूहात  परीक्षण काम साहित्याचे 
सेवा  घडो  मायभाषेची ही ईच्छा मनातून




वैशाली अविनाश वर्तक 
अहमदाबाद 
फोटो👇🏼

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...