उपक्रम क्र 107
आला आला वसंत ऋतु
वृक्षांची संपली आता पनगळ
नटल्या बहरल्या लता वेली
निघून गेली सृष्टी ची मरगळ
थंड मंद झुळूक अल्हाददायी
सारे झाले प्रसन्न वातावरण
यावे लुटण्या सृष्टी चे सौंदर्य
पहा कसे निर्मळ पर्यावरण
निसर्गात करु म्हणून वन भोजन
धाब्याच्या भोजनाची मजा आगळी
देते आनंद वनभोजनाचा
असे रीत वनभोजनाची वेगळी
वैशाली वर्तक