शनिवार, १० एप्रिल, २०२१

चैत्र चाहुल

सिध्द लेखिका समूह 
विषय - चैत्र  पालवी

 संपे पानगळ वृक्षांची 
 वृक्षांची पाने पाही वाट        
 चैत्र  पल्लवी अंगोपंगी 
अंगोपंगी दिसेल थाट    


संपली पानगळ आता
आता निसर्ग बहरेल
लेवूनिया कोवळी  पर्णे
 पर्णे  सृष्टीला खुलवेल


थंड वा-याची  ती झुळूक
  झुळूक   शहारेल अंग
फुले  फुलतील  मोहक     
  मोहक रंगी होऊ दंग

मोहरेल बहावा पळस
 पळस दिसे वनोवनी
 वसंताचे  नव  चैतन्य
  चैतन्य  पहा मनोमनी


चैत्र महिना चैतन्याचा
चैतन्याचा नव वर्षाचा
मनी उभारी देत असे
असे चैत्र  मास हर्षाचा


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

अष्टाक्षरी देव नाही देवालयी *वसे चराचरात

काव्य सम्राट साहित्य  मंच
विषय - देव नाही देवालयी

अष्टाक्षरी 

    *वसे चराचरात

सदा करावे सत्कर्म
देव वसतो कर्मात
तेथे असतो देवच
देव नसे देव्हा-यात


नको पूजा जप ताप ,
देव वसे आपल्यात 
 नका शोधू देव्हा-यात
वसे तो चरा चरात    


देता गरीबास अन्न ,
 दोन आपुले कवळ   
तृप्त होऊनी हसला 
 आला असता जवळ


ओळखला नाही तया
 तोची जेवला सुखात
नका शोधू देव्हा-यात 
 वसे तो चरा चरात        



कळी पहा उमलली
   सुगंधाने गंधाळली
वा- यासंगे डौलताना 
उषा हसत लाजली   


सारी देवाची  करणी  
घडवितो दिनरात
देव वसे तो फुलात
शोधा तया निसर्गात 


वैशाली वर्तक

अहमदाबाद

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

गर्व

सावली प्रकाशन समूह
विषय - गर्व

स्वभावाचे असती पैलू
क्रोधी , लोभी , निरागस
कोणी अभिमानी वा गर्वीष्ठ
तर कोणी निष्पाप लोभस

स्व अभिमान हा हवाच
तया वदती स्वाभिमानी
घेता गर्वाने जागा मनात
होतो स्वभाव अभिमानी

गर्व नेतो जीवन लयास 
जैसे गेले  बलाढ्य रावणाचे
प्रकांड पंडित शिवभक्त जरी
गर्वहरण झाले त्याच्या पराक्रमाचे

गर्व करु नये   कदापि पैशाचा
रहात नाही समाजात मान
लक्ष्मी च ती असते चंचल
ठेवावे सदा तियेचे भान

गर्व असावा मायबोलीचा
 पुरविते ज्ञानाची तहान
तोच गर्व असावा मायभूमीचा
जिच्या कुशीत होतो महान

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
5/4/2021







लोभ, मोह मद दूर सारा
दिली संतानी शिकवण
गर्वाने, मदाने न फुलता
जगावे ह्याची ठेवावी आठवण.

बालपणात ऐकलेल्या गोष्टीचे 
ध्यानी ठेवावे जीवनी  सार
न करिता गर्व जीवनात
ह्या ज्ञानाचा घ्यावा आधार

दुर्योधनाच्या मनीचा अती  गर्व
ठरला त्याच्या विनाशास कारण
असूनी शूर महा योध्दा ज्याने
अंगीकारले नाही सुनीतीचे धोरण

गर्व  कशाचाच नसावा मनी
सदा राखावा माणुसकीचा धर्म
आज असे उद्या  नसे रुप पैसा
हेच जाणून घ्यावे जीवनाचे मर्म








कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...