शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

सांजवेळी चांद्रयान चंद्रावरी

अखंडित कल्याणकारी काव्य समूह आयोजित उपक्रम क्रमांक 42
काव्यलेखन
विषय ..सांजवेळी चंद्रयान चंद्रावरी

वेळेला पक्के होते चंद्रयान
वेध लागले प्रत्येक नागरिकास
त्याच्याच कडे नजर लावून
प्रतिक्षेत बसले तया पाहण्यास

सांजवेळी चांद्रयान चंद्रावरी
 निहाळती  तुज जन  आनंदूनी
गौरवाने अभिमानाने गजर
भारत मातेचा करी आवर्जूनी

भुवरी टाळ्यांचा कडकडाट 
दिवा देवाजवळ यशाचा
तेजाळती नारी आनंदाने
  विक्रम चंद्रयानच्या विजयाचा

उतरणार चंद्रयान चंद्रावर
दिन ठरणार सोनियाचा
विश्वात शोभून दिसणार भारत
आत्म विश्वासाने केलेल्या कामाचा

 आणि,फडकला तिरंगा चंद्रावर
वेळेवर टाकिले अचूक पाऊल
विजय पताका झळके जगावर
विक्रम घेतोय दक्षिण ध्रुवावर चाहुल 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

ओघळ. शब्द गंध सिंगापूर


 ओघळ 

दि 23-8-23

बालकाचे रडणे पाहून

मातेच्या मनी उठे खळबळ

हुंदके देत देत रडताना 

गालावर चे पुसते ओघळ


पापण्यांच्या कडा वर 

अडलेला अश्रुंचा ओघळ.       

हळुच गालावर घसरता

चेहरा लपविता उडे गोंधळ


निसर्ग निर्मित ओधळ

दिसती सदैव विलोभनीय 

कडे कपारीतून वर्षा धारांचे

भासे शुभ्र दुग्ध धारा रमणीय


संपता लग्न सोहळा आनंदात

येता प्रसंग  वधू पाठवणी

येती डोळा अश्रूंचे ओघळ

अनावर होती मनी साठवणी


काळ्या मातीला कसून

बळी  गाळीतो घामाचे ओघळ

येता दिन सुगीचे शिवारी

भरतो सुख समृद्धीची ओंजळ


सुख दुःख  भावनांचे

वाहती जीवनी ओघळ

जीवन असे जणु कविता 

शब्दांनी भरते ओंजळ .

सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

अवखळ मोहक ( फुल पाखरु)


दि.20\8\23
... फुलपाखरू
शीर्षक..*अवखळ मोहक*

भिरभिरते फुलपाखरू
बसले क्षणी फुलावर 
अलवार स्पर्शे फुलास
लगेच उडाले दुजावर.       1

रंग तयांचे किती सुंदर
जणु पाकळ्याच मोहक
कोणते पाखरु ?, कुठलं फुल?
दोघेही चित्ताला वेधक.         2

 करी  हितगुज फुलांशी
थांबण्या नसे वेळ पळभरी
झुळूके सरशी फुल डौलता
उडून गेले की  क्षणभरी    3

किती प्रकार किती जाती
लहान मोठी विविध रंगात
काहीं वर  ठिपके बारीक
पंख हलवते क्षणा क्षणात.        4

अंडी ,अळी, कोष, पाखरू
चार अवस्था करुन पार
घेते  अवखळ मोहक रूप. 
भिरभिरण्या झाले तयार.         5

वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात)

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

भाकर चटणी

भाकर चटणी*

गोल चंद्रा समान
ताजी पाहून भाकरी
भुक माझी चाळवली
आनंद भाव मुखावरी

त्यावर चविष्ट चटणी
कुटलेली खलबत्त्यात
वाट पहाती हात
 कधी जाईल मुखात

किती असो पंच पक्वान्ने
सजलेली  ती ताटात
भाकर चटणी समोर
भासती फिकी भोजनात

 अशा भोजनाची मजा
घ्यावी  जाऊन शिवारी
 देत तृप्तीची ढेकर 
मजा येते लई भारी. 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

श्रम अनुभव श्रम

अभा ठाणे जिल्हा समूह १
उपक्रम 202
विषय - श्रम

श्रम करावे जीवनी
हवे जर. Have यश पदरी
नसे उध्दार जगती
श्रम महिमा अधरी

सर्व  थोर सांगताती
विना श्रम नसे फळ
होण्या यशस्वी  जगी
श्रमाचेच हवे बळ

किटक मुंगी करी श्रम
जगण्याचा आहे  मंत्र 
परिश्रमा विणा नसे
संपतच नसे तंत्र 

पक्षी करिती गोळा
श्रम करिती बांधण्या घर
बळीराज करे श्रम
आपणा मिळण्या भाकर


हातावर हात ठेवूनी
बसत नसे कोणी
प्रत्येकाला  हवे काम
तरच मिळे खाण्या लोणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

श्रम

अभा ठाणे जिल्हा समूह १
उपक्रम 202
विषय - श्रम

श्रम करावे जीवनी
हवे जर यश पदरी
नसे उध्दार जगती
श्रम महिमा अधरी

सर्व  थोर सांगताती
विना श्रम नसे फळ
होण्या यशस्वी  जगी
श्रमाचेच हवे बळ

किटक मुंगी करी श्रम
जगण्याचा आहे  मंत्र 
परिश्रमा विणा नसे
संपतच नसे तंत्र 

पक्षी करिती गोळा
श्रम करिती बांधण्या घर
बळीराज करे श्रम
आपणा मिळण्या भाकर


हातावर हात ठेवूनी
बसत नसे कोणी
प्रत्येकाला  हवे काम
तरच मिळे खाण्या लोणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...