बुधवार, २५ जानेवारी, २०२३

असेअसावे नवे वर्ष/सुखयेवो नव वर्षी/ संकल्प नव वर्षाचा

अ भा म सा परिषद समूह  आयोजित काव् लेखन स्पर्धा 
विषय -- असे असावे नवे वर्ष

फार सोसले गतवर्षी
सदा जगलो चिंता ग्रस्त
नको आता तसे काही
जगुया सारे बिनधास्त

निसर्गाची मिळावी साथ
योग्य  प्रमाणात पडावे पाणी
हिरवी  शिवारे फुलावीत
 बळीराजा आनंदे गाईल गाणी

 कधी न व्हावी भृणहत्या
  राखावा नारींचा मान
  दिसावेत वृद्ध आनंदात
  तयांचा  होत असावा सन्मान

  आत्मनिर्भर होऊ सारे
  देशाची वाढो  जगती शान
 माणुसकी हाच धर्म खरा
 याची नागरिकांना राहो जाण
 
असे सारे घडावे नव वर्षी
आनंदाची वाहील सरिता
गतवर्षीची विसरुनी कटुता
उत्साहाची  लिहूया कविता

वैशाली वर्तक




अष्टाक्षरी
सुखी येवो नव वर्ष
स्पर्धेसाठी
    
कधी संपेल हा काळ
जन त्रासले अपार
सुख येवो नव वर्षी
हीच इच्छा मनी फार


घडो भेटी  त्या आप्तांच्या
सुख नांदो या जगती
येवो  उल्हास जीवनी
होवो जगाची प्रगती

करु नवीन संकल्प 
वाहो उत्साहाचे वारे
आत्म निर्भर बनूया
 सुखी सदा राहू सारे


नको कटु आठवणी
होवो सुखे सुरुवात
 सुख येवो नव वर्षी
आनंदाची बरसात

करु स्वागत नव्याचे
मोद मिळो या वर्षात
सारे जन जगातील
राहो सदाची हर्षात

वैशाली वर्तक
अहमदाबाद


सावली प्रकाशन  समुह 
विषय -- नववर्षाचा संकल्प
   
       *          *संकल्प*
    करु स्वागत  नव्या वर्षाचे
    हर्ष  उल्हासाच्या जल्लोषात
    उगवतीचा  भास्कर  देई रोज
    नव्या आशा अन् दिशा जीवनात 

    पर्यावरणाची घेऊ काळजी
    देऊया लक्ष वृक्षा रोपणी
   वसुंधरेची वाढवण्या शान
    करु नवे संकल्प  जीवनी
      
      जागवुया मानवता मनातूनी
      माणुसकी हाच धर्म खरा
      विसरुनी भेदभाव सारे
      संकल्पाने वाहेल झरा
      
       संकल्प नारी सन्मानाचा
       भृणहत्या नकोची कदा
       स्त्री  शिक्षणावर देऊ भार
       प्रगतीशील होवो देश सदा
     
वैशाली वर्तक
  
       

वैशाली वर्तक




सिद्ध साहित्यिक समूह आयोजित उपक्रम क्रमांक 540
काव्य प्रकार ..ओळ काव्यलेखन 
विषय..नवं वर्ष मनी हर्ष

*नव वर्ष मनी हर्ष*
आतुरता स्वागताची
चालू वर्ष संपताच
 दिसे उत्कंठा नव्याची


झाल्या चुकां सुधारूनी
नको त्यांची उजळणी 
ध्यानी घेऊया नव्याने 
शाळा अनुभवी  मनी

देऊ निरोप वर्षाला
नव्या हर्ष उल्हासाने
नव वर्ष स्वागताला 
उत्साहाच्या अत्तराने

करू नवीन संकल्प 
वाहो उत्साहाचे वारे
आत्म निर्भर बनूया
 सुखी सदा राहू सारे


नको कटूआठवणी
होवो सुखे सुरुवात
 सुख येवो नव वर्षी
आनंदाची बरसात

करू स्वागत नव्याचे
मोद मिळो या वर्षात
सारे जन जगातील
राहो सदाची हर्षात

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

गीत धाव दयाघना (कोरोनात)

धाव दयाघना

मरणाचे अंक ।   विचलित मन ।  
भयभीत  जन  । सर्वत्र ची     ।।        धृपद

उजाड नगरे ।  अवकळा आली । 
 झळाळी उडाली ।  नगरांची     ।। 
दिन निराशेचे  । आली अवदसा । 
दिसो कवडसा । आशेचा तो ।। 
         मरणाचे अंक  विचलत मन


काय मांडियला ।  विनाशाचा खेळ । 
कठिण ही वेळ । आणियली  ।। 
दुःखाची ही निशा  ।  संपवावी आता । 
चरणी हा माथा  ।  ठेवीतसे ।। 
      मरणाचे अंक  विचलत मन                 2


संयम राखण्या  ।  जनांना दे बळ । 
सहण्यास झळ । तूची देवा     ।। 
क्षणोक्षणी घाव ।  बिथरले गाव । 
मदतीस धाव । दयाघना    ।।
               मरणाचे अंक                        3

वैशाली वर्तक
अहमदाबाद
17/4/21

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...